सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. ही परीक्षा एकूण 16.88 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेचा निकाल 88.67 % इतका लागला आहे.

या परीक्षेत प्रखर मित्तल, रिमझिम अगरवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी या चौघांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांना प्रत्येकी 500 पैकी 499 मार्कस मिळालेत. तर दिव्यांग श्रेणीत गुडगावची अनुष्का पांडा देशात पहिली आलीय. या वर्षीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. सीबीएसई दहावीचा निकाल cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे.