12वीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर, 1 जुलैला असणार पहिला पेपर

exam

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले होत्या. त्याबाबतचे नवीन वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. 1 जुलैला पहिला पेपर होणार असून शेवटचा पेपर हा 15 जुलैला असणार आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी तारीख पत्रक शेअर केले आहे.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता CBSE बोर्डाने 12वीच्या परीक्षा रद्द करून अनिश्चित काळासाठी त्या पुढे ढकलल्या होत्या. मात्र आता बोर्डाने नवीन वेळापत्रक काढले असून त्या वेळापत्रकानुसार पहिला पेपर हा 1 जुलैला असणार आहे. होम सायनस या विषयाचा पहिला पेपर असणार आहे. त्यांतर सलग इतर विषयांचे पेपर असणार आहेत.

लॉकडाऊनमुळे सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षा मार्चमध्येच थांबविण्यात आल्या. यानंतर सीबीएसई सचिव अनुराग त्रिपाठी यांनी दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान जाहीर केले होते की दहावी बोर्ड परीक्षा होणार नाहीत. परंतु बारावी बोर्डाच्या उर्वरित परीक्षांपैकी 29 मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

दुसरीकडे सीबीएसईने यापूर्वी परीक्षा घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपुस्तकांचे मूल्यांकन सुरू केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 50 दिवस लागू शकतात. डॉ.निशांक यांनी सांगितले होते की, 29 विषयांची परीक्षा अद्याप बाकी आहे, परंतु 173 विषयांची चाचणी घेण्यात आली होती.