धाकधुक वाढणार ! CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

10th result

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल उद्या बुधवारी (15 जुलै) जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

cbse.nic.in, www.results.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

असा पाहा निकाल :
– सर्वप्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट वर जा.
– वेबसाईटवर देण्यात आलेल्या दहावी निकाल या लिंकवर क्लिक करा.
– आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक ती माहिती द्या
– निकाल पाहता येईल. डाऊनलोड करता येईल.

दहावीची 18 लाख मुले त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेकडून तसेच डिजीलॉकरकडूनही त्यांचे गुणपत्रक मिळू शकेल.

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची मागणी

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर