राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी पालक ‘कृष्णकुंज’वर

राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीबीएसईच्या बारावी आणि दहावीच्या पेपरफुटीमुळे होणारी फेरपरीक्षा न देण्याचं आवाहन पालकांना केलं होतं. तसंच आपण सगळ्या विद्यार्थी आणि पालकांच्या सोबत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथं भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूनं भूमिका घेतली आणि त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी राज ठाकरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.