CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर ; या वेबसाईटवर पहा तुमचा निकाल

टीम महाराष्ट्र देशा : CBSE (Central Board of Secondary Education) म्हणजेच सीबीएसईचा आज १२ वी चा निकाल दुपारी लागणार आहे. cbse.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

आज दुपारी १ च्या सुमारास बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली गेली. तर त्यानंतर काही वेळातच वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सुमारे13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ८३.४ % निकाल लागला आहे. मुलींनी यंदा निकालामध्ये बाजी मारली आहे. ८८.७  टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ७९.५ टक्के इतकं आहे.