CBSE १२ वीचा निकाल; करिश्मा अरोरा, हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 83.4 टक्के लागला आहे. मुझफ्फरनगरची करिश्मा अरोरा आणि हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे.

Loading...

यंदाचा निकाला ८३.४ टक्के लागला आहे.कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाची १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२ वीची परीक्षा झाली होती. सीबीएसईचा निकाल cbse.nic.in या संकेतस्थळावर हा पाहता येणार आहे.

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बोर्डाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची माहिती दिली गेली. यंदा सुमारे13 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 83.4% निकाल लागला आहे. मुलींनी यंदा निकालामध्ये बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 79.5 टक्के इतकं आहे.

यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला.Loading…


Loading…

Loading...