सीबीएसई बोर्डचा बारावीचा निकाल जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला.गाझियाबादच्या मेघना श्रीवास्तव हिने देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. यंदा सीबीएसईचा निकाल 83.01 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक टक्क्याने वाढ झाली आहे. मागच्या वर्षीचा निकाल 82.02 टक्के होता.

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण 11, 86, 306  विद्यार्थी बसले होते. 4, 138 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. पेपर लीकमुळे ही परीक्षा वादात सापडली होती.