CBSE: १० वीचे निकाल जाहीर; केरळची भावना एन. शिवदास देशात पहिली

टीम महाराष्ट्र देशा- सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल घोषित केले आहेत. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १०वीचे निकाल घोषित करत सीबीएसईने सरप्राइझ दिले आहे. आज निकाल घोषित करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती.

यंदा निकाल एकूण ९१.१ टक्के लागला आहे. निकालामध्ये त्रिवेंद्रम (९९.८५ टक्के), चेन्नई (९९ टक्के) आणि अजमेर (९५.८९ टक्के) हे पहिल्या टॉप ३ मध्ये आहेत. तर केरळची भावना एन. शिवदास हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला ५०० पैकी ४९९ गूण मिळाले आहेत. यंदाही मुलीनी बाजी मारली आहे.

सीबीएसई दहावी परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गूण मिळवून गूणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. तर २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गूण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर ५८ विद्यार्थ्यांनी ४९७ गूण मिळवून तिसरे स्थान मिळवले आहे.

परिक्षेसाठी बससेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट www.cbse.nic.in. वर जाऊनही निकाल पाहू शकता. याशिवाय cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.