सीबीएसईकडून सहावी ते आठवी सामाईक परीक्षेचा निर्णय मागे

पुणे  : केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच सामाईक परीक्षा घेण्याचा निर्णय मंडळाने मागे घेतला आहे. याबाबत बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आयोगाच्या सुचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

bagdure

विद्यार्थ्यांना एकदम दहावीची परीक्षा देण्याचा ताण येतो. त्यामुळे सहावी ते आठवी देखील वर्षाची एकच सामाईक परीक्षा घेण्याचा विचार सीबीएसईकडून करण्यात येत होता. मात्र हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याला धरून नाही आणि अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर ताण येतो असा आक्षेप घेण्यात आला. बाल हक्क आयोगाकडे या निर्णयाबाबत तक्रार करण्यात आली होती. आयोगाच्या सूचनेप्रमाणे मंडळाने सामाईक परीक्षेचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता सहावी ते आठवीसाठी दोन सत्रांत प्रत्येक विषयाची शंभर गुणांची परीक्षा असणार आहे.

You might also like
Comments
Loading...