१०० कोटी वसुली प्रकरणात तपासाला वेग; सीबीआयला ही हवाय वाझेचा ताबा

sachin waze

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून उच्च न्यायालयाने या आरोपांची सीबीआयने १५ दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे पथक त्वरित मुंबईत दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची चौकशी करण्यासाठी सीबीआयने कस्टडी मागितली आहे. सीबीआयने एनआयए कोर्टात वाझेच्या ताब्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात मुख्य संशयित आरोप म्हणून वाझेची चौकशी करणे महत्वाचे आहे. त्यामुळे सीबीआयला वाझेचा ताबा मिळाल्यास काही महत्वाच्या सुगावे त्यांच्या हाती लागणार का ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, वाझेने दिलेल्या माहितीनुसार मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर आणि लॅपटॉप अशा महत्वपूर्ण गोष्टी एनआयएच्या हाती लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या