fbpx

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर सीबीआयचे छापे

टीम महाराष्ट्र देशा- हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्रसिंह हुडा यांच्या घरावर आज रोहतक आणि इतर ठिकाणांवरील घरांवर सीबीआयने छापे मारले आहेत.दिल्ली आणि हरयाणातील एकूण ३० ठिकाणी छापेमारी सुरू आहे.

मानेसर इथं 912 एकर जमीन वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्याच प्रकरणी CBIनेही कारवाई केली असं स्पष्ट झालं.  ही कारवाई सुरू असताना भुपेंद्रसिंह हुड्डा आणि त्यांचे पुत्र दिपेंद्रसिंह हेही निवासस्थानी उपस्थित होते.

2016 साली हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आले होते. काँग्रेसचे आणखी एक बुजुर्ग नेते मोतीलाल व्होरा हे देखील या प्रकरणातील एक आरोप आहेत. या दोघांविरूद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून अधिक तपासासाठी हे छापे मारण्यात आल्याचं कळतंय.