सीबीआयकडून पुन्हा एकदा राबडी देवींची चौकशी

पाटना – सीबीआयकडून पुन्हा एकदा आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यात आली. नोटाबंदीच्या काळात बँकेत १० लाख रुपये जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सीबीआयकडून राबडी देवी यांची चौकशी करण्यात आली.

bagdure

राबडी देवींनी नोटबंदीच्या काळात बिहार अवामी सहकारी बँकेत सुमारे दहा लाख रूपये जमा केल्याप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सांगण्यात येते. पाटणा येथील १०, सर्क्युलर रस्त्यावरील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले. सुमारे २० मिनिटे या पथकाने राबडीदेवींची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी राबडी देवींना मनी लाँड्रिंगप्रकरणी सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्याबाबतच राबडीदेवींची चर्चा झाल्याचे आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीस भोला यादव यांनी सांगितले.

सध्या लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत आहेत. तर दुसरीकडे त्यांची पत्नी राबडीदेवी, मुलगी मिसा भारती आणि लहान मुलगा तेजस्वीप्रसाद यादव यांच्यावर रेल्वेमध्ये हॉटेलच्या बदल्यात भूखंडासह इतर प्रकरणांत सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे.

You might also like
Comments
Loading...