SSR प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, आशिष शेलरांचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पत्र

Ashish Shelar

मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आता अनेक धागे-दोरे समोर येत असून यात अनेक बढया लोकांची नावे समोर येत आहेत. तर, सुशांत च्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी नुसार बिहार मध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याची जवळची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने देखील अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

त्यामुळे, रियाच्या तसेच अंकिताचे जबाब नोंदवण्यासाठी बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस तपास करण्यास सक्षम आहे असे सांगितले असले तरी बिहार पोलिसानी मात्र अनेक प्रश्न उभे केले आहेत.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी – विखे

याच पार्श्वभूमीवर आता, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील ट्विट करत या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांकडे पत्राद्वारे केली आहे. ट्विट मध्ये ते म्हणतात, ‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे प्रश्न उपस्थित होत असून वेगवेगळी माहिती समोर येतेय, कुटुंब,मित्र-मैत्रिणींचे म्हणणे यात तफावत,बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत?सोशल मिडियावर मोठमोठ्या लोकांची नावे घेतली जात असल्याने सीबीआय चौकशीच व्हावी!’

ठाकरे सरकारच्या भवितव्याबाबत राज ठाकरेंचे भाकीत,म्हणाले…

तर, याआधी राष्ट्रवादीचे नेते व अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. घेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी देशाच्या भावना बघता सीबीआय कडे तपास द्यावा अशी मागणी अनिल देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी ट्विटर द्वारे दिली होती.

नागपुरात कोरोनाने थैमान घातले असताना राजकीय श्रेयवादासाठी नेत्यांची धडपड सुरूच

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी, मोदींकडे एका पत्राद्वारे केली होती. मोदींनी स्वामींच्या या पत्राची दखल घेतल्याने आता या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शक्यता वाढली आहे. स्वामींचे  सहकारी व वकील इशकरण सिंह भंडारी यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले होते.