न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी होणार का?

टीम महाराष्ट्र देशा – न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रतील पत्रकार बी. आर. लोणे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू १ डिसेंबर २०१४ रोजी झाला होता. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याच्या मागणीची चीफ जस्टिस दीपक मिश्रा आणि जस्टिस ए. एम. खानविलकर, डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दखल घेतली. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी राज्यभरातून वकिलांचे, विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले.

न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सर्वत्र चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणात प्रामुख्याने भाजप अध्यक्ष अमित शहा आणि अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावं घेण्यात येत आहेत. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका ८ जानेवारी रोजी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर २३ तारखेला हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.