रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी

नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा: नुकतीच नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आणि खासकरून मराठवाड्यातील आमदार आणि खासदारांच्या ‘कामा’च्या पद्धतीवर टीका केली होती.या पार्श्वभूमीवर कंत्राटदाराला रोडची कामे योग्यरित्या करण्याची मुभा मिळावी यासाठी नितीन गडकरी यांनी सीबीआय संचालकाकडे राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई विभागातील काही आमदार आणि खासदार यांच्या विरोधात चौकशी करण्याची शिफारस केली होती. यामध्ये आता १२ पेक्षा जास्त आमदार आणि ७ पेक्षा जास्त खासदारांची सीबीआय चौकशी होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये रस्याचा विकास करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केंद्रीय सडक परिवहन मंत्रालय करत असतो. राज्यामध्ये रोड विकासाची कामे करत असताना अनेक आमदार आणि खासदार रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागतात अशी तक्रार अनेकवेळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे काही कंत्राटदारांनी केली होती.

Loading...

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या खासदार आणि आमदारांची सीबीआय चौकशी करु,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते.अनेक खासदार आमदार कंत्राटदारांना त्रास देतात. याबाबतच्या अनेक तक्रारी सीबीआयच्या संचालक कार्यालयात येतात. त्यामुळे सीबीआय संचालकला कार्यालयात बोलवून याबाबतची चौकशी करावी, अशी शिफारस गडकरींनी केली आहे. त्यानंतर सीबीआयचे संचालकांनी संबंधित आमदार खासदारचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार