fbpx

कधीकाळी ज्या इमारतीचे उद्घाटन केले, आज तिथेच चिदंबरम यांना बंदी व्हावे लागले

टीम महाराष्ट्र देशा : आय़एनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री दोन तास चाललेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर चिदंबरम यांना अटक झाली. अटकेनंतर त्यांना सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आले. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री असताना २०११ मध्ये पी. चिदंबरम यांच्याच हस्ते सीबीआयच्या या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. येथेच आता त्यांना बंदी म्हणून रहावे लागत आहे.

बुधवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई केली. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने पी. चिदंबरम यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.

कोर्टाने अटकपूर्व जमीन नाकारल्यानंतर गेल्या ७२ तासापासून ईडी आणि सीबीआय त्यांचा शोध घेत होती. अखेर काल रात्री पुढे येत चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आपल्यावरील सर्व आरोपांचे खंड केले. पत्रकार परिषद संपताच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या अटकेसाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले, मात्र कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या गराड्यात चिदंबरम यांनी घरी पळ काढला. अखेर रात्री १० : १५ च्या सुमारास अटक केली.

सीबीआय मुख्यालयाच्या तळमजल्यावर असणाऱ्या क्रमांक पाचच्या खोलीत चिदंबरम यांना रात्रभर ठेवण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या