fbpx

दाभोळकर हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांच्यासह एकाला अटक

dabholkar murder case

टीम महाराष्ट्र देशा : दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक केली आहे. याशिवाय पुनाळेकरांना गौरी लंकेश हत्या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरूनही अटक करण्यात आली आहे. संजीव पुनाळेकरांसोबत विक्रम भावे यांनाही सीबीआयने अटक केली आहे.

दाभोलकर हत्येचा आजतागायत छडा न लागल्याने उच्च न्यायालयाने अनेकवेळा शासनावर तसेच तपास यंत्रणेवर ताशेरे ओढलेले आहेत. संजीव पुनाळेकरांचा दाभोलकर हत्येशी संबंध कसा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पुन्हा एकदा सनातनशी संबंधित वकिलाला अटक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.