मोठी बातमी : डॉ दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला पाच वर्षांनंतर अटक

नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनेच रचला दाभोळकरांच्या हत्येचा कट

टीम महाराष्ट्र देशा : डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे, दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हत्या करण्यात आली होती. सकाळी 7 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी दाभोळकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यामध्ये त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता. मागील पाच वर्षांपासून तपास यंत्रणांकडून त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत होता.

दरम्यान, गेल्या आठवड्यात नालासोपारा येथे स्फोटक प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईनंतर सचिन अंधुरेचे धागेदोरे सापडले. नालासोपारा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनेच दाभोळकरांच्या हत्येचा कट रचल्याच एटीएसच्या तपासणीत पुढे आले आहे.

या सर्व प्रकरणाची तपासणी करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने ही माहिती सीबीआयला दिली. यानंतर दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंधुरेला अटक करण्यात आली आहे, दरम्यान सीबीआयकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे.

पुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार

You might also like
Comments
Loading...