होय ‘त्या’ बदल्यात लाच मिळाली; पीएनबी माजी व्यवस्थापकाची कबुली

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदी घोटाळा प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याच्या बदल्यात मोठी लाच मिळाल्याची कबुली पीएनबी बँकेचा माजी व्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीनं याने दिली आहे. काल सीबीआयनं माजी व्यवस्थापक शेट्टीसह मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना अटक केली होती.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदीने तब्बल ११ हजार ३६० कोटींचा चुना लावला आहे. यामध्ये काही बँक कर्मचाऱ्यांनीच त्याला मदत केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता गोकुळनाथ शेट्टीच्या कार्यकाळातच नीरव मोदीच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आल्याच समोर आल आहे.

कसा झाला घोटाळा ?
देशविदेशात व्यापार असणाऱ्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक मुंबई शाखेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याची कंपनी असणाऱ्या आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सच्या खरेदी विक्रीसाठी LOU मिळवला. LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला देण्यात येणारी टाईम गॅरंटी. म्हणजेच एखद्या बँकेने कोणत्याही व्यक्तीला अशी गॅरंटी दिली असेल आणि त्याच्या विश्वासावर दुसऱ्या बँकांनी कर्ज दिल्यास ते संबंधित व्यक्तीने परतफेड न केल्यास गॅरंटी देणाऱ्या बँकेला ते भरावे लागते. याच गॅरंटीच्या भरवशावर भारतीय बँकाच्या विदेशी शाखा असणाऱ्या AXIS बँक, इलाहाबाद बँक आणि युनियन बँक यांनी नीरव मोदीला क्रेडीट लोन दिले. हा घोटाळा समोर आल्यानंतर आता सरकारकडून सर्व बँकांना त्यांचे बॅलन्सशीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोण आहे नीरव मोदी
नीरव मोदी हा मुळचा बेल्जियमचा राहणारा हिरे व्यापारी. १९९९ मध्ये त्याने आपल्या कंपनीची सुरुवात केली. फोर्ब्स मासिकानुसार मोदी याची आजची सं पत्ती ११ हजार कोटींच्या आसपास आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचा ८४ व क्रमांक लागतो. त्यांचे ज्वेलरी शोरूम लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापुर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहेत. भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत त्याचे बुटिक आहेत.

पंजाब नॅशनल बँकेला करावी लागणार भरपाई
पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांना ह्ताशी धरून नीरव मोदीने हा सर्व घोटाळा केला आहे. यामध्ये या बॅंकेच्या बनावट LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) चा वापर केला गेला. त्यामुळे आता इतर बँकाची देणी हि पंजाब नॅशनल बँकेला भरावी लागणार आहेत. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आल असून त्यांची चौकशी केली जात आहे.

You might also like
Comments
Loading...