सीबीआयचा प्रोग्रामरच निघाला तत्काळ तिकीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड

टीम महाराष्ट्र देशा: रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याच उघड झाल आहे. या प्रकरणी सीबीआयने अजय गर्ग नावाच्या प्रोग्रॅमरला अटक केली आहे. घोटाळ्याचा मास्टर माइंड असणारा गर्ग हा दुसरा तिसरा कोणी नसून सीबीआयचा प्रोग्रामरच आहे.

सीबीआयमध्ये काम करण्यापूर्वी अजय गर्ग हा आयआरसीटीसीमध्ये प्रोग्रॅमर होता. त्याने 2007 पासून 2011 पर्यंत त्याने नोकरी होती. याच दरम्यान गर्गने रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेबसाईटमधल्या त्रुटी ओळखल्या आणि नवं सॉफ्टवेअर बनवून घोटाळा केला.

सीबीआयच्या माहितीनुसार अजय गर्ग हा तयार केलेलं सॉफ्टवेअर अनिल कुमार गुप्ता नामक व्यक्तीच्या मार्फत बुकिंग एजंटपर्यंत पोहोचवत होता. त्यामुळे कोणालाच त्याची माहिती नसायची. मागील एक वर्षापासून हा सर्व घोटाळा सुरु होता. दरम्यान या घोटाळ्यातील रकमेचा वाटाही गर्ग हायटेक पद्धतीने कधी बीकॉईनने तर कधी हवाला मार्फत घेत होता.

You might also like
Comments
Loading...