सातारा–देवळाईवासियांनो सावधान… कोरोनाचा संसर्ग वाढतोय

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी तर ३१ कुटूंबातील ८० जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कातून हे रुग्ण वाढले असल्याचे बाब समोर आली असल्याचे औरंगाबाद महानगर पोलिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडाळकर यांनी गुरुवारी सांगितले.

शहर तसेच ग्रामीण भागामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सातारा–देवळाई भागामध्ये अंदाजे एकाच कुटूंबामधील चार–पाच व्यक्ती बाधीत होत आहेत. त्यामुळे मनपाच्या वतीने आरोग्य पथके पाठवून तपासणी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिसरात सध्या ३१ कुटूंबांना संसर्ग झाले आहेत. त्यातील तब्बल ८० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह निघाले असल्याचेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले. औरंगाबाद शहरासह परिसरातील नागरिकांनी सॅनेटायझरचा वापर करावा, मास्क घालूनच घराच्या बाहेर पडावे, जमाव जमवू नये, अथवा जमावामध्ये जाऊ नये. स्वच्छ हात धुवावेत असे आवाहन मनपा आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी या वेळी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या