Leg cramps- पायात गोळे येतात?

Leg cramps

वारंवार पायात गोळे येणे हे शरीरातील सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि पाण्याच्या कमतरतेचं प्रमुख लक्षण आहे. या पोषण घटकांअभावी मांसपेशींमध्ये ताण उत्पन्न होतो आणि गोळा येतो. ही समस्या असणार्‍यांनी भरपूर पाणी प्यावं. आहारात मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियमयुक्त घटकांचा समावेश करावा. पायात गोळे आलेले असताना स्ट्रेचिंग केल्यास आराम मिळतो. हॉट शॉवर घेतल्यासही वेदनांपासून मुक्ती मिळते. नारळपाणी घेतल्यास त्वरीत पोषणमूल्यांचा पुरवठा होऊन वेदनांपासून मुक्ती मिळते.