Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Wed, 12 Dec 2018 05:16:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 २४ तासानंतर निकाल जाहीर, मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभा https://maharashtradesha.com/madhya-pradesh-assembly-election-result/ Wed, 12 Dec 2018 05:15:28 +0000 https://maharashtradesha.com/?p=49361 कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशमध्ये अखेर शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाचा १०९ जागांवर विजय झाला असून समाजवादी पक्षाचा १, बहुजन समाज पक्षाचा २ आणि अपक्ष उमेदवारांचा ४ जागांवर विजय झाला आहे. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा- मध्य प्रदेशमध्ये अखेर शिवराजसिंह चौहान यांना हादरा बसला असून या राज्यातील मतमोजणी जवळपास २४ तासांनी संपली. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाचा १०९ जागांवर विजय झाला असून समाजवादी पक्षाचा १, बहुजन समाज पक्षाचा २ आणि अपक्ष उमेदवारांचा ४ जागांवर विजय झाला आहे.

15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला खाली खेचण्यात काँग्रेसला यश आलं.मात्र असे असले तरी बहुमतचा आकडा मात्र त्यांना गाठता आला नाही. मॅजिक फिगरपासून ते अवघे दोन आकडे दूर आहेत. पण हे दोनचं अंतर पार करण्यासाठी मध्य प्रदेशात ‘घोडेबाजाराला’ ऊत येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49361
हा तर सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव – धनंजय मुंडे https://maharashtradesha.com/dhananjay-munde-comment-on-five-states-election-result/ Tue, 11 Dec 2018 14:53:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=49358 dhananjay-munde..

टीम महाराष्ट्र देशा : आज लागलेल्या पाच राज्यांच्या निकालानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी “येणाऱ्या निवडणुकांत महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ आहे. हा सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. “मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या चितेवर श्रीमंतांसाठी विकासाचे महाल बांधू पाहणाऱ्या भाजपचा मनोरा कोसळला आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातही […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
dhananjay-munde..

टीम महाराष्ट्र देशा : आज लागलेल्या पाच राज्यांच्या निकालानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी “येणाऱ्या निवडणुकांत महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ आहे. हा सुज्ञ जनतेचा विजय अन् सर्वसामान्यांना गृहीत धरणाऱ्या गर्विष्ठ भाजपचा पराभव आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या चितेवर श्रीमंतांसाठी विकासाचे महाल बांधू पाहणाऱ्या भाजपचा मनोरा कोसळला आहे. केंद्र आणि महाराष्ट्रातही आगामी काळात सत्ता परिवर्तन अटळ आहे.” असा विश्वसा मुंडेंनी व्यक्त करत राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस आघाडीचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान भाजपला अजूनही संधी आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तीन राज्यात काँग्रेसचं नाव बदलून भाजप ठेऊन त्यांच्या भक्तांच सांत्वन करू शकतात असे म्हणत मुंडेंनी भाजपच्या नामांतर मोहिमेवरून त्यांना चिमटा काढला.

या पराभवातून धडा घेत कमीत कमी उर्वरित काळात तरी भाजप, खास करून महाराष्ट्रातील भाजप निवडणूक मोड मधून बाहेर येत सामान्यांसाठी काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी, कामगार, युवा वर्ग, विविध समाज घटकांना भाजपने अनेक स्वप्न दाखवत सत्ता काबीज केली होती. पण, सत्य शाश्वत असते. जनता एकदा फसू शकते वारंवार नाही. भाजपचा बेगडी चेहरा छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील जनतेने वेळीच ओळखला आहे. त्यामुळे आगामी काळात वंचित घटकांना सोबत घेऊन केंद्रात आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49358
भाजपा खासदाराने दिल्या मनसे जिल्हाध्यक्षाला आमदारकीच्या शुभेच्छा https://maharashtradesha.com/bjp-mp-wishes-mlas-to-the-mns/ Tue, 11 Dec 2018 14:17:04 +0000 https://maharashtradesha.com/?p=49354

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे : मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे हे लवकरच ‘आमदार’ होणार हे निश्चित आहे.परंतु नेमकं कोणत्या मतदारसंघातून ते आमदार होणार हे भाकीत करणे माञ अवघड असल्याचे सांगून भाजपचे खा.सुनिल गायकवाड यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष  डाँ.भिकाणे  यांना  ‘आमदारकी’च्या शुभेच्छा दिल्या. निमित्त होते डाँ.भिकाणे यांच्या लातूर येथील ‘मातृकृपा क्लिनिक’च्या शुभारंभाचे .त्यावेळी ते बोलत होते.डाँ.नरसिंह भिकाणे हे मुळचे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे : मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे हे लवकरच ‘आमदार’ होणार हे निश्चित आहे.परंतु नेमकं कोणत्या मतदारसंघातून ते आमदार होणार हे भाकीत करणे माञ अवघड असल्याचे सांगून भाजपचे खा.सुनिल गायकवाड यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष  डाँ.भिकाणे  यांना  ‘आमदारकी’च्या शुभेच्छा दिल्या.

निमित्त होते डाँ.भिकाणे यांच्या लातूर येथील ‘मातृकृपा क्लिनिक’च्या शुभारंभाचे .त्यावेळी ते बोलत होते.डाँ.नरसिंह भिकाणे हे मुळचे मानखेड ता.अहमदपूर येथील.परंतु मुंबई  येथून बी.ए.एम.एस.ही वैद्यकीय शास्ञाची पदवी संपादन केल्यानंतर डाँ.भिकाणे यांनी २००७ पासून निलंगा या शहरात वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. अहमदपूरचे पहिले आमदार अँड निवृत्ती रेड्डी यांचे नातू असल्यामुळे डाँ.भिकाणे यांना राजकीय क्षेञ खूणावू लागले.त्यामुळे साहजिक त्यांनी मनसेत प्रवेश केला.मागील १४-१५ वर्षापासून ते मनसेत कार्यरत असले तरी राजकारणाला  त्यांनी ख-या अर्थाने समाजकारणाची जोड दिल्यामुळे निलंगा तालुक्यासह ते जिल्हाभर परिचित आहेत.

पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी अभिनव आंदोलने करुन सामान्य जनतेला न्याय दिला आहे.तर आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना त्यांनी मोठा दिलासा दिला आहे.त्याचबरोबर प्रवचनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रबोधन करतात.

डाँ.भिकाणे यांच्या या  कार्याची दखल घेवून त्यांना विविध सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देवून वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या विविध प्रतिष्ठित पुरस्कारामुळे डाँ.भिकाणे यांची ‘पुरस्कार फेम डाँक्टर’अशी जिल्हाभर विशेष ओळख निर्माण झाली आहे.डाँ.भिकाणे यांच्या या सामाजिक,राजकीय व अध्यात्मिक कार्यामुळे मागील काही महिन्यापासून त्यांच्या नावाची आमदारकीसाठी जोरदार चर्चा ऐकावयास येत आहे.

त्यामुळे ते  आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी जन्मभूमी असलेल्या अहमदपूर मतदारसंघाची निवड करतात की कर्मभूमी असलेल्या निलंगा मतदारसंघाची निवड करणार हा पत्ता माञ डाँ.भिकाणे यांनी अद्याप खुला केला नाही.त्यामुळे सदरील पार्श्वभूमीचा धागा पकडत  डाँ.भिकाणे यांचे काम पाहता ते आमदार होणार हे निश्चित  आहे पण कोणत्या मतदारसंघातून ते आमदार होतील हे सांगणे अवघड आहे असे म्हणत खा.सुनिल गायकवाड यांनी यावेळी बोलताना गुगली टाकून दिली.या गुगलीची माञ राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे हे माञ निश्चित !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49354
सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीची नवी जबाबदारी https://maharashtradesha.com/ncps-new-responsibility-for-supriya-sule/ Tue, 11 Dec 2018 14:01:28 +0000 https://maharashtradesha.com/?p=49350 Supriya-Sule

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपद तारीक अन्वर यांच्याकडे होते. तारीक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्याजागी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहे. आपल्या संसदीय कारकीर्दीत सुप्रिया सुळे यांनी अभ्यासू खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Supriya-Sule

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपद तारीक अन्वर यांच्याकडे होते. तारीक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्याजागी खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहे. आपल्या संसदीय कारकीर्दीत सुप्रिया सुळे यांनी अभ्यासू खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळविले आहे. लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती, सर्वाधिक प्रश्न विचारणे, आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणे. हा त्यांचा स्वभाव आहे.

यामुळे उत्तम कामगिरीच्या जोरावर संसदरत्नसह विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. या त्यांच्या कामगिरीसाठी आजवर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून अगदी अलीकडेच युनिसेफ या जागतिक संघटनेचाही पुरस्कार त्यांना मिळाला आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची बाजू लोकसभेत मांडण्याची जबाबदारी आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49350
सरकारी जाचाला कंटाळूनच उर्जित पटेल यांचा राजीनामा : जयंत पाटील https://maharashtradesha.com/jayant-patil-on-urjit-patel/ Tue, 11 Dec 2018 11:36:51 +0000 https://maharashtradesha.com/?p=49332 jayant patil

टीम महाराष्ट्र देशा- भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला यांनीही राजीनामा दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी अर्थकारणाकडे दुर्लक्ष करून वाटेल तसे निर्णय घेते आहे. रघुरामराजन यांनाही भाजपानेच घालवले होते. भारतातल्या स्वायत्त संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
jayant patil

टीम महाराष्ट्र देशा- भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला यांनीही राजीनामा दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी अर्थकारणाकडे दुर्लक्ष करून वाटेल तसे निर्णय घेते आहे. रघुरामराजन यांनाही भाजपानेच घालवले होते. भारतातल्या स्वायत्त संस्थांमध्ये सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप वाढतो आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

रिजर्व्ह बँकेच्या साठ्यातुन पैसे काढण्याचा डाव केंद्र सरकारने आखला होता. रिजर्व्ह बँकेने तो हाणून पाडल्याने गव्हर्नरांवर दबाव आणण्याचं काम सरकारने केलं. म्हणूनच उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षकांनी मानले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार…

निलंगेकरांच्या गडाला राष्ट्रवादी सुरुंग लावणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49332
भाजपच्या पराभवामुळे शिवसेनेचा आनंद गगनात मावेना, भाजपला दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला https://maharashtradesha.com/shivsema-mp-sanjay-raut-on-bjp/ Tue, 11 Dec 2018 10:59:15 +0000 https://maharashtradesha.com/?p=49324 shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी झाली असून या निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. भाजपच्या पराभवाने शिवसेनेला भलताच आनंद झाल्याचं पहायला मिळत आहे. पाच राज्यातले विधानसभाचे निकाल हा काँग्रेसचा विजय नसून लोकांचा राग आहे. भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. दिल्लीत मंगळवारपासून हिवाळी अधिवेशनाला […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी झाली असून या निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. भाजपच्या पराभवाने शिवसेनेला भलताच आनंद झाल्याचं पहायला मिळत आहे. पाच राज्यातले विधानसभाचे निकाल हा काँग्रेसचा विजय नसून लोकांचा राग आहे. भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.

दिल्लीत मंगळवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून संसदेबाहेर संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘निकालातून स्पष्ट संदेश मिळतोय’, असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना ‘कोणासाठी संदेश?’ असा प्रश्न विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, समझदार को इशारा काफी है. आत्मचिंतनाची गरज आहे. मोदी सरकारला उद्देशून त्यांनी हे विधान केले.

ही जादूची झप्पी नाही तर मोदींसाठी मोठा धक्का आहे – संजय राऊत 

लोकसभेची सेमीफायनल- मध्य प्रदेशात मायावतीच किंगमेकर

भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा भाजप खासदाराचाच आरोप, खासदार पदाचा राजीनामा

खा. संजय राऊतांना मानाचे पान, शिवसेनेच्या संसदीय प्रमुखपदी नियुक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49324
सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी बेळगावात गेलेल्या धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल https://maharashtradesha.com/case-registered-against-ncp-leader-dhananjay-munde-in-belgaum/ Tue, 11 Dec 2018 10:36:36 +0000 https://maharashtradesha.com/?p=49320 धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल बेळगावात दाखल झाले. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल बेळगावात दाखल झाले. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.

गेली साठवर्षाहून अधिक काळ बेळगाव सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरही बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी झालेला नाही, हे दुर्दैव आहे. या लढ्याला आता तरुणांनी हाती घ्यावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

मात्र , महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटकी पोलीस प्रशासनाने खरा रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगीच नसताना तो घेतला असे कारण देत महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरु असताना संबंधित जागेच्या मालकाकडून, तसेच संबंधित सरकारी कार्यालयातून परवानगी आवश्यक होती, मात्र ती घेतली नाही असा आरोप धनंजय मुंडेंसह सर्वांवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49320
जाणून घ्या ओवेसीच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराचं काय झालं ? https://maharashtradesha.com/owaisi-wins-from-chandrayangutta-constituency-shivsena-candidate-got-197-votes/ Tue, 11 Dec 2018 10:32:13 +0000 https://maharashtradesha.com/?p=49313 Shivsena

टीम महाराष्ट्र देशा- चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा टीआरएस सत्तेत येणार आहे. तेलंगणामधील प्रचारादरम्यान ओवेसी बंधूंची भाषणे कायमच चर्चेत राहिली. तेलंगणामध्ये टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे.या निवडणुकीमध्ये अकबरुद्दीन ओवेसी हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. १९९९ पासून या मतदारसंघामध्ये एमआयएमने कायमच आपले वर्चस्व राखले आहे. म्हणूनच ओवेसींपुढे टीआरएस सारख्या बड्या पक्षाच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Shivsena

टीम महाराष्ट्र देशा- चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा टीआरएस सत्तेत येणार आहे. तेलंगणामधील प्रचारादरम्यान ओवेसी बंधूंची भाषणे कायमच चर्चेत राहिली. तेलंगणामध्ये टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे.या निवडणुकीमध्ये अकबरुद्दीन ओवेसी हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत.

१९९९ पासून या मतदारसंघामध्ये एमआयएमने कायमच आपले वर्चस्व राखले आहे. म्हणूनच ओवेसींपुढे टीआरएस सारख्या बड्या पक्षाच्या उमेदवारासहीत काँग्रेस, भाजपा, शिवसेनेबरोबरच कोणत्याही अपक्ष उमेदवारांचा निभाव लागला नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये नोटा हा पर्याय पाचव्या स्थानी राहिला. नोटाला १००९ मते मिळाली.

ओवेसी हे तेलंगणातले मोठे मुस्लिम नेते आहेत. ते मुसलमानांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात. जुन्या हैदराबादमध्ये असलेल्या सहा विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे हा विजय मिळवताना चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवोसी यांनी आपल्या विरोधात उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याइतके घवघवीत यश या निवडणुकीत मिळवले आहे. ओवोसी बगळता चंद्रयानगुट्टा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून यामध्ये शिवसेनेच्या  सुदर्शन मलकान यांना केवळ १९७ मते मिळाली आहेत.

एमआयएमची धुळे-जळगाव मध्ये एंट्री

लोकसभेची सेमीफायनल- चावलवाला बाबांना धक्का, छत्तीसगड मध्ये कॉंग्रेस आघाडीवर

लोकसभेची सेमीफायनल- अटलबिहारींच्या पुतणीनेच वाढवली चावलवाला बाबांची धाकधूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49313
हा फसवेगिरी विरोधात लोकांनी दिलेला निकाल – पृथ्वीराज चव्हाण https://maharashtradesha.com/prithviraj-chavans-reaction-on-five-state-election-result/ Tue, 11 Dec 2018 10:29:48 +0000 https://maharashtradesha.com/?p=49312

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसला मिळालेलं यश हा भाजपची धोरणं, फसवेगिरी याविरोधात लोकांनी दिलेला निकाल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन महत्त्वाची राज्ये भाजप गमावण्याची शक्यता आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हाणाले, “राहुल गांधी अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्व ट्रेंड बदलला होता. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले. सर्व काँग्रेस नेते एकत्र येऊन हे यश मिळवलं आहे. देशात कोणी कोणत्या पक्षाला संपवू शकत नाही”.

याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आम्ही सर्व काँग्रेस नेते जोमाने काम करु. राज्यात आता राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत येतील हे नक्की आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49312
मोदीजी जानेवाले है , राहुलजी आनेवाले है ! – अशोक चव्हाण https://maharashtradesha.com/congress-mp-ashok-chavan-after-five-state-election-result/ Tue, 11 Dec 2018 10:20:00 +0000 https://maharashtradesha.com/?p=49310 Ashok Chavan

टीम महाराष्ट्र देशा : “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही काही महिन्यांसाठीच असेल”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आज अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Ashok Chavan

टीम महाराष्ट्र देशा : “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही काही महिन्यांसाठीच असेल”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आज अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं.

यावेळी अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांनी तीन राज्यातील विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं. तसंच भाजपवर तुफान हल्लाबोल केला.

अशोक चव्हाण म्हणाले, “महागाई, अत्याचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. भाजपने उद्योगपतींसाठी सत्ता वापरली. तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा, धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. लोकविरोधी भाजप सरकारविरोधात हा जनतेचा कौल आहे, हा लोकशाहीचा विजय आहे”
दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपलाही आव्हान दिलं. राज्यातील फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांसाठी हे सरकार असेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

49310