Marathwada – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Wed, 23 Jan 2019 05:27:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Marathwada – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे भाजपला आव्हान  https://maharashtradesha.com/jayant-patil-challenges-bjp/ Tue, 22 Jan 2019 05:34:58 +0000 https://maharashtradesha.com/?p=52857

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा औरंगाबाद येथील गंगापूरमध्ये दाखल झाली तेव्हा नागरिकांनी या सभेला भरघोस प्रतिसाद दिला. राज्य सरकारवर ५ लाख कोटीचं कर्ज आहे. ईव्हीएम हॅक होत असल्याच्या बातम्या टीव्हीवर येत आहेत. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी, असे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत बोलताना दिले. मनुस्मृती […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा औरंगाबाद येथील गंगापूरमध्ये दाखल झाली तेव्हा नागरिकांनी या सभेला भरघोस प्रतिसाद दिला. राज्य सरकारवर ५ लाख कोटीचं कर्ज आहे. ईव्हीएम हॅक होत असल्याच्या बातम्या टीव्हीवर येत आहेत. जर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी, असे आव्हान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत बोलताना दिले.

मनुस्मृती जाळली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली मात्र भारताची घटना जाळली तर भाजप सरकारने त्यांना अटक नाही केली. डोंबिवलीचे भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला मात्र ते भाजप पक्षाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना मोदींनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. मोदी जनतेला १५ लाख देण्यावरून जनता संतप्त झाली असून उपस्थितांपैकी एकाने पन्नास पैसे देखील मिळाले नसल्याचा राग मुंडेंसमोर व्यक्त केला. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल गौरवगान गात आहे. मात्र आरक्षण मिळण्यासाठी स्व. काकासाहेब शिंदे आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आरक्षण मिळण्याबाबत संपूर्ण श्रेय सकल मराठा समाजाचे आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
52857
…त्यामुळे दानवे काहीपण बरळायला लागले आहेत – अर्जुन खोतकर https://maharashtradesha.com/arjun-khotkar-criticize-raosaheb-danave/ Thu, 17 Jan 2019 05:10:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=52292 danave vr khotkar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून एकमेकांच्या विरोधात राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरलेत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागलेली लढत म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर. अर्जुन खोतकरांनी दानवेंच्या टीकेला उत्तर देताना जोरदार हल्ला चढवला आहे. आपले […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
danave vr khotkar

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाल्याने राज्यातील मात्तबर नेते हे दंड थोपटून एकमेकांच्या विरोधात राजकीय कुस्तीच्या आखाड्यात उतरलेत आहेत. अशातच राज्याचे लक्ष लागलेली लढत म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर. अर्जुन खोतकरांनी दानवेंच्या टीकेला उत्तर देताना जोरदार हल्ला चढवला आहे.

आपले कोण, परके कोण, हे समजायला दानवे तयार नाहीत. आम्ही एवढी वर्षे त्यांच्यासाठी मदतच करीत गेलो आहोत. एवढं करुनही त्यांना कळत नसेल, तर निश्चितपणे ही निवडणूक आणि निवडणुकीचे वातावरण त्यांना कळून चुकलेले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली दिसते. त्यामुळे ते काहीपण बरळायला लागले आहेत. अस अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंवड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आले असता, त्यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार याच्यावर टीका केली होती. त्याला अर्जुन खोतकर यांनी जोरदार उत्तर दिल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
52292
तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी ! https://maharashtradesha.com/tulajai-stree-shakti-award-news/ Mon, 14 Jan 2019 07:00:51 +0000 https://maharashtradesha.com/?p=51981

तुळजापूर- श्रीतुळजा भवानी मंदीर संस्थानच्या वतीने महाराष्ट्रात सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिला जाणारा पण मागील पाच वर्षांपासून रखडलेला तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा पुनश्च सुरु करण्याची मागणी होत आहे. श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान चा वतीने श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध क्षेत्रात सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देवून […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

तुळजापूर- श्रीतुळजा भवानी मंदीर संस्थानच्या वतीने महाराष्ट्रात सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिला जाणारा पण मागील पाच वर्षांपासून रखडलेला तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा पुनश्च सुरु करण्याची मागणी होत आहे.

श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान चा वतीने श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध क्षेत्रात सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देवून स्ञी शक्ती देवता दारी गौरवुन सन्मानीत करण्यात येत होते याचे स्वरुप श्रीतुळजाभवानी मातेस नेसवलेला शालु महावस्ञ रोख रक्कम ऐकावन्न हजार रुपये व मान पञ असे होते.

2010सालापासून हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला पहिला पुरस्कार समाजसेविका साधनाताई बाबा आमटे ना तर दुसरा पुरस्कार 2011ला आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा ऐक्सप्रेस कविता राऊत यांना दिला या पुरस्कार प्राप्त महिलांनी हा आमचा सर्वाकृष्ट पुरस्कार असेल व राहील अशी प्रतिक्रिया जाहीर रित्या दिली होती. तिसरा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेञी सुलोचना यांना जाहीर केला होता. त्यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास येण्यासाठी तात्कालिन जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांना समंती दिली होती.माञ काही मंडळी नी या सोहळ्यास दुष्काळाच्या नावाखाली आक्षेप घेतल्याने मंदीर संस्थान ने तो स्थागित ठेवला आज पाच वर्षापासून हा पुरस्कार सोहळा रखडला आहे.हा पुरस्कार सुरु होण्यासाठी महायुती सत्ता काळात ही प्रयत्न केले गेले नाहीत त्यामुळे मोठी नाराजी  वाढली आहे.

या पुरस्कार ने राज्यात अल्पावधीतच मानाचे स्थान पटकावले असल्याने  तो पुनश्च सुरु करुन देवीदारी महिलांच्या सन्मान करण्याची प्रथा परंपरा सुरु करण्याची मागणी भाविकांसह समस्त महिला वर्गाकडून केली जात आहे. पुरुषांना दिला जाणारा पुरस्कार असा रखडवला गेला असता का अशा संतप्त प्रतिक्रिया महिला प्रतिनिधी म्हणून व्यक्त होत आहेत.आघाडी सत्ता काळात बंद पडलेला तुळजाई पुरस्कार महायुती काळात तरी सुरु व्हावा अशी मागणी होत आहे.

अध्यक्ष व प्रशासकीय आधिकारी पदावर असल्याने पुरस्कार सुरु होण्याची आशा!
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्षपदी दिपा मुधोळ मुंढे व प्रशासकीय अधिकारी पदी तहसिलदार तथा विश्वस्त योगिता कोल्हे या दोन्ही पदावर महिला असल्याने हा पुरस्कार पुनश्च सुरु होवून स्ञीशक्ति देवता दारी महिलांची सन्मान करण्याची रखडलेली परंपरा सुरु होईल अशी आशा महिला वर्गातुन व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
51981
श्रीतुळजाभवानी च्या शाकंभरी नवराञोत्सवास सोमवार पासुन आरंभ ! https://maharashtradesha.com/tulajabhavanis-shakranti-navaratyotsav-started-from-monday/ Sun, 13 Jan 2019 15:32:16 +0000 https://maharashtradesha.com/?p=51966

तुळजापूर : महाराष्ट्राची आराध्यदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञोत्सव सोमवार दि.१४  दुर्गाष्टमी पासुन श्रीगणेश ओवरीत दुपारी १२ वा घटस्थापना करण्यात येवुन आरंभ होणार आहे.जलयाञा सोहळा शुक्रवार दि.१८  जानेवारी ला आहे. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

तुळजापूर : महाराष्ट्राची आराध्यदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञोत्सव सोमवार दि.१४  दुर्गाष्टमी पासुन श्रीगणेश ओवरीत दुपारी १२ वा घटस्थापना करण्यात येवुन आरंभ होणार आहे.जलयाञा सोहळा शुक्रवार दि.१८  जानेवारी ला आहे.

प्रत्येक वर्षी पौष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्या करिता तुळजापूरला येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान संस्थानाच्या वतीने नाटक, संगीत जलसा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

श्री तुळजाभवानीचे शाकंभरी नवराञातील धार्मिक विधी पुढीलप्रमाणे

  • मित्ती पौष शु.८ सोमवार दि१४ रोजी श्री तुळजाभवानी मातेची पहाटे सिहांसनावर प्रतिष्ठापना तसेच ठीक दुपारी १२-०० वाजता श्रीगणेश ओवरीत शाकंबरी देवी प्रतिमा समोर घटस्थापना शाकंभरी देवीची मंगल आरती रात्री ७:०० वाजता , रात्री छबिना.
  • मित्ती पौष शु. ९ मंगळवार दि १५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा , व रात्री छबिना
  • मित्ती पौष शु. १० बुधवार दि १६ रोजी श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजानंतर रथ अलंकार महापूजा रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु११ गुरूवारदि १७ रोजी मुरली अलंकार महापूजा, रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु. १२ शुक्रवार दि १८रोजी सकाळी ७:०० वाजता पापनाश तिर्थकुंडा पासुन जलयात्रा आरंभ ती संपल्यानंतर मंदीर संस्थानच्यावतीने ,सुवासानीची ओटी भरणे श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा ,शेषशाही अलंकार महापुजा, रात्री छबिना
  • मित्ती पौष शु १३ शनिवारदि १९रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, व रात्री छबिना
  • मित्ती पौष शु १४ रविवार दि २० रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, रात्री ७:०० वाजता व रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु. १५ शके १९४० सोमवार दि २१रोजी शाकंभरी पोर्णिमा नित्योपचार पुजा, दुपारी १२ वाजता , घटोत्थापना पुर्णाहुती व रात्री छबिना ,जोगवा .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
51966
बार्शीचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश करण्याची नसती उठाठेव.. https://maharashtradesha.com/article-on-barshi-is-included-in-osmanabad-district-written-by-jivandatta-argade/ Sat, 29 Dec 2018 08:05:13 +0000 https://maharashtradesha.com/?p=50374

नगरपरिषदेचे नेते श्री राऊत हे नरेंद्र मोदींचा स्थानिक अवतार असून त्यांनी परिणामांचा विचार न करता हुकूमशाही प्रवृत्तीने नोटबंदी केली तर हे जिल्हाबंदी करताहेत.कन्यादान करताना जावयाचे कुळ मूळ गोत्र चारित्र्य तपासून घ्यावे लागते बँकेत ठेव ठेवताना बँकेची कामकाजाची रीत सामाजिक प्रतिष्ठा व्यवस्थापन संचालकांचे स्वभाव हे दुर्लक्षित करता येत नाहीत तद्वतच प्रचलित नेतृत्वावरील नाराजीचा राग आला म्हणजे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

नगरपरिषदेचे नेते श्री राऊत हे नरेंद्र मोदींचा स्थानिक अवतार असून त्यांनी परिणामांचा विचार न करता हुकूमशाही प्रवृत्तीने नोटबंदी केली तर हे जिल्हाबंदी करताहेत.कन्यादान करताना जावयाचे कुळ मूळ गोत्र चारित्र्य तपासून घ्यावे लागते बँकेत ठेव ठेवताना बँकेची कामकाजाची रीत सामाजिक प्रतिष्ठा व्यवस्थापन संचालकांचे स्वभाव हे दुर्लक्षित करता येत नाहीत तद्वतच प्रचलित नेतृत्वावरील नाराजीचा राग आला म्हणजे अपात्र असंस्कृत असभ्य माणसाकडे सत्ता देणे कदापि उचित ठरत नाही.. त्याचीच प्रचिती सद्य स्थितीत बार्शीतील जनतेला येत आहे…शहाण्याचा नोकर व्हावे पण वेड्याचा मालक होऊ नये असे जुने लोकांची प्रचलित म्हण या प्रसंगी खूप बोलकी वाटते.

गांधील माशी डोक्यावर घोंगावते तिचा घोंगावण्याचा आवाज व तिचा दंश याची अनामिक भिती बाळगलेल्या एखाद्या प्राण्याने त्या गांधील माशीच्या भितीपोटी आपले डोके माशीला अद्दल घडवण्याच्या रागात मोठ्या गाडीच्या चाकाखाली डोके घातल्यासारखी परिस्थिती आहे.त्यात माशी तर मरतच नाही पण त्या प्राण्याच्या मस्तकाचा चेंदामेंदा मात्र जरूर होतो. तशीच काहीशी परिस्थिती बार्शी तालुक्यात निदर्शनास येते. विद्यमान आमदारांचे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था यात नकोसे झाले त्यांच्या भोवती असलेल्या केवळ लाळघोटेपणा व चापलुसी व टक्केवारी अचूक पोहोचवून बक्षीस मिळवणे याच एकमेव निकषाला प्राधान्य देऊन नगरषरिषदेसारख्या सत्तेत कारभारी म्हणून बसवून नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या घटनात्मक पदांची उंची कमी करून चमचेबहाद्दर व जनतेतील अप्रिय माणसांच्या हाती नेतृत्वाने सोपवलेल्या कारभाराची इतकी उबग बार्शीकरांना आली की त्या रागात आपण आंधळा नकोसा झाला म्हणून बहिरा जवळ केला तर जेव्हा तो हात खाजवू लागला तेव्हा कळाले की हा नवा खेळाडू फक्त बहिरा नाही तर याला चक्क खरुजही आहे त्यामुळे आगीतून फोफाट्यात पडतोय आपण ही बाबच बार्शीकरांच्या लक्षात आली नाही.

दुर्धर रोग झाल्यावर प्रतिजैविक औषध घ्यावे लागते पण ते प्रतीजैवीक औषध हे किती प्रतिकूल परिमाण घडवून जीवघेणे ठरेल व किडनी खराब करेल याचा नेम नाही. सत्ता बदल करताना जनतेच्या काही अपेक्षा असतात त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण कराव्यात कचरा व्यवस्थापनाबाबत तीच राष्ट्रवादीच्या काळातील परिस्थिती कायम, पाणी पुरवठ्याबाबतीतही तीच राष्ट्रवादीच्या काळातील परिस्थिती कायम ते तर बरे नव्हतेच पण ते बिनमिठाचे लाल तिखट होते हे नवे तिखट तर डोळ्यात पाणी आणणारे काळा मसाला (इसूर )ठरतेय..सुधारित तिखट …बार्शीकरांनी विकासाच्या वचनाम्यावर मतदान नाही केले व ते जर फक्त ईर्षा व द्वेष आसूया यावर केले तर अनादीकाळापर्यंत युगानुयुगे सगळे बदलेल पण बार्शी बदलनार नाही..प्रगती तर सोडाच जी होईल ती अधोगतीच..त्याचाच एक नुकताच नमुना म्हणून नसती उठाठेव करण्याचा प्रयत्न केला जातोय.. बार्शी तालुक्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश..

चला विचार करूया बार्शीचा समावेश जर उस्मानाबाद मध्ये केला तर काय परिणाम होतील
१) बार्शी भविष्यात कधीही जिल्हा होऊ शकणार नाही.. जो बार्शी जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव १९८५ साली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष स्व. नामदेवराव जगताप यांनी प्रस्तावित केला होता..

२)  आपले विभागीय शहर जे आत्ता पुणे आहे ते न राहता औरंगाबाद होईल.
३) शैक्षणिक बोर्ड पुणे न राहता औरंगाबाद होईल
४) जिल्ह्याला असलेले सोलापूर विद्यापीठ हाकेच्या अंतरावरचे सोडून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठात शिक्षण घ्यावे लागेल. त्याचीच पदवी घ्यावी लागेल.ते २३२ किलोमीटर आडवळणी जावे लागेल पुण्यासारख्या सरळ मार्गी रस्ता नाही व दळणवळणाची साधने नाहीत. ट्रेन ची सोया नाहीत व पुरेशा बसेस नाहीत.
५) पुण्याला गेलेला माणूस काही कामे काढून पुढे सरळ मुंबईला जातो किंवा मुंबईहून येताना पुण्याला थांबू शकतो.. त्यामुळे निम्मे अंतर राज्याच्या राजधानीचेही कमीच होते.
६) पुणे या शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा आहे. देशातील सर्वात संपन्न शहर होऊ पाहतेय पुणे.आय.टी पार्क बाजारपेठ नोकरी उद्योग धंद्याला सोयीचे शहर पुणे आहे. व पुढे जवळच मुंबई.
७) उच्च न्यायालय मुंबई ना राहता औरंगाबाद होईल.. त्या याचिका जी अपिले सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामध्ये दिलेली लाखो रुपयांची वकील फी पुन्हा नव्याने औरंगाबादच्या वकिलांना द्यावी लागेल..कारण मुंबईतील वकील औरंगाबादला जाऊन टी प्रकाराने चालवणे शक्य नाही.
८) पश्चिम महाराष्ट्र ही समृद्ध ओळख पुसून आत्महत्येसाठी चर्चेत असलेल्या मराठवाड्याची मानसिकता बार्शीकरांवर लादली जाईल..
९) देशात कुठेही गेले तर लोक म्हणतील मराठवाड्यातून आला आहे म्हणजे अकारण दया दाखवणार जसे काय उपकार करीत आहेत.मग विचारणार तुमच्याकडे लोक कसे काय आत्महत्या करतात.
१० ) उस्मानाबाद जिल्ह्यात एका विशिष्ट जातीचे प्राबल्य आहे त्यामुळे इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक मागास वर्गीय समाज राजकीय धोरणी व सत्ता केंद्रात सहभागी होताना निष्प्रभ व दुर्लक्षित होऊन अमराठा समाजाची उपेक्षा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सामाजिक न्यायाच्या व समतेच्या दृष्टीने असे घडणे उचित ठरणार नाही. त्या तुलनेत
११ ) मराठवाड्यातील मानस ख-या अर्थाने खूप मायाळू देवभोळी व माणुसकीची आहेत. श्रद्धाळू आहेत धार्मिक आहेत.पण शैक्षणिक सांस्कृतिक उद्योजकतेच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र जसा पुढारलेले आहे तसा मराठवाड्यात विकास नाही. रस्ते सोडले तर मराठवाड्यात काहीच लोभस नाही.तेही सगळे विलासरावांनी केलेल.विलासराव स्वतः पुण्यात शिकले कायम पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वासोबत राहिले त्यांच्यावर संस्कार सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस ची तटस्थ भूमिका म्हणजे मूरदाडपणाने दिलेली मूकसंमतीच …

असा महत्वाचा पण आगंतुक विषय नगरपरिषदे च्या सभागृहासमोर आल्यावर लोकशाही प्रक्रियेमधील राष्ट्रवादी काँग्रेस ची तटस्थ भूमिका म्हणजे मूरदाडपणाच…बघ्याची भूमिका म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणे असा प्रकार झाला आहे त्यामध्ये नगरसेवक व गटाचे नेतृत्व करणारे गटप्रमुख यांना या बाबतीत एक तर गांभीर्य नसावे किंवा अक्कल ..गांभीर्य असते तर विरोध केला असता.. अक्कल असती तर गांभीर्याने घेतले असते.. दोन्हीही नसल्याने बार्शीची जनता मुकी बिचारी कुणीही हाका अशी परिस्थिती झाली आहे.

राष्ट्रवादीची जनमत मागणीची भूमिका मागणीची भूमिका म्हणजे केवळ अज्ञान नव्हे तर मूर्खपणा …
जनतेने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जनमत देऊनच सभागृहात पाठवले आहे.. भले ती मते काही ठिकाणी १००० ते ५००० एवढ्या पडेल त्या किमतीला लुटीच्या पैशातून जनतेने वसूल करून दिली असतील.. पण एकदा जनतेच्या मतावर एखादा माणूस सभागृहात जातो त्या ठिकाणी त्याने मांडलेले मत हे जनतेचा प्रतिनिधी म्हणूनच असते ..ते जनतेचीच मत असते त्यामुळे पुन्हा अशा प्रकारचे जनमत घेण्याची कायदीशीर प्रक्रियाच अस्तित्वात नाही असेल तर ती सभागृहात रेकॉर्डवर कशी येईल. कायम नगरपरिषदेत पडीक असतानाही अजून प्राथमिक ज्ञान नसलेल्या व प्रक्रियेबाबत अज्ञान असलेल्या लोकांच्या अशा प्रकारे तटस्थ वगैरे राहिलो म्हणजे चक्क गैरहजरच राहिलो असे म्हणायला पाहिजे.. म्हणजे जनतेच्या हित विरुद्ध एखादा निर्णय घेताना मौन धरणे म्हणजे लोकशाहीवर बलात्कार होत असताना सुम्भासारखे बघत राहणे म्हणजे ती मूकसंमती होते..

आडातला बेडूक सांगतो समुद्रातल्या गोष्टी .. यामागे नेमका कावा काय आहे .. कोणता मनसुबा आहे.. फक्त २० किलोमीटर प्रवास लांब पडतो हे एकमेव कारण नाही. त्यामागे असा प्रस्ताव आणण्याचा फक्त वैयक्तिक राजकीय स्वार्थ आहे तो असा की
उस्मानाबाद जिल्ह्यात एका विशिष्ट जातीचे प्राबल्य आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक मागास वर्गीय समाज राजकीय धोरणे व सत्ता केंद्रात सहभागी होताना निष्प्रभ व दुर्लक्षित होऊन अमराठा समाजाची उपेक्षा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सामाजिक न्यायाच्या व समतेच्या दृष्टीने असे घडणे उचित ठरणार नाही.

त्या तुलनेत सोलापूर शहर हे मोठ्या लोकवस्तीचे शहर असून या शहरामध्ये कोणत्याही एका विशिष्ट जातीचा पगडा नाही अल्पसंख्यांक समाजाचा मागास वर्गीय समाजाचा कोणताही माणूस निवडून येणे व इतर सामाजिक समता प्रस्थापित झालेली आहे त्यामुळे कोण्या एका विशिष्ट जातीची मक्तेदारीने नाही.त्यामुळे सामाजिक समता या दृष्टीने हे सोयीचे आहे. त्यामुळे ज्या शक्ती बार्शी तालुक्याला उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ठ करा ही मागणी करतात त्यांना त्यांच्या जातीवर आधारित व निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणे दुरापास्त आहे याची खात्री झाली आहे. त्याच प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठमोठे दिग्गज नेते आहेत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब विजय दादा, दिलीप माने, बबन दादा, संजय मामा शिंदे , तानाजी सावंत त्यामुळे अशा व्यक्तींसमोर आपण सूर्यासमोर काजवा किती तेज ओकणार म्हणून काजवा त्याचा उजेड पाडण्यासाठी आडोशाला अंधारात जाऊन म्हणू पाहतोय बघा मी किती तेजपुंज आहे..बघा माझा किती उजेड पडतोय.. त्यात त्या काजव्यांची आशेची धारणा आहे की आपल्या तेजाने अंधारात आपण उठून दिसू व आपल्याला राजकीयेय महत्व येईल भविष्यात जिल्ह्याचे नेतृत्वही करता येईल. कारण सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात बडे उदयोजक व नव्या फळीत प्रभावी राजकीय नेते नाहीत. त्यामुळे संबंधितांचा मनसुबा हा जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा आहे.

सोलापूर जिल्ह्यात असतानाही बार्शी कायम प्रभावी व महत्वाचा तालुका ठरतेय त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात बार्शीला आणखीही महत्व येईल व त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठीच हा खटाटोप चालला आहे..बाकी यामागे काही वेगळा उदात्त व सामाजिक हेतू नाही.. व अशी बिनबुडाची आगंतुक व गैरसोयीची मागणी कोणी जनतेने कधीच केलेली नाही. त्यामुळे जनतेची मागणी आहे असे संबंधितांचे म्हणणे कुचकामी आहे.व ते हास्यास्पदही आहे..संबंधिताने अशी धूळफेक करणे थांबवावी जनतेने तुम्हाला ज्या कामासाठी निवडून दिले ते आद्यक्रमाने करा .. तुम्हाला प्लम्बर म्हणून बोलावले तर तुम्ही धरण बांधून टाकू म्हणजे नळाला पाणी नाही आले तरी चालेल अशा वल्गना करता आहेत. आदराला बेडूक समुद्रातल्या गोष्टी सांगू लागला तर काय होती त्याचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.

जनतेची मागणी कुठे आहे..? की तुम्हाला तुमच्या सोयीच्या सगळ्याच बाबी जनतेच्या सोयीच्याच  वाटतात..
अजिबात असले नसती उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत ..रस्ते प्रवास सुरक्षित नाही. बार्शी कुर्डुवाडी च्या ३५ किमीच्या महीन्यात पाच माणसे अपघातात मेली. म्हणजी सरासरी दार तीस किलोमीटरला प्रती सहा दिवसाला एक माणूस अपघातात मरतोय …. ट्रेनच्या अपघाताची संख्या अशी नाही. त्यामुळे औरंगाबादला तुमच्या हट्टापायी जर अशी कार्यालये गेली तर २६२ किलोमीटरला दरमहा ४६ माणसे रस्ते अपघातात मरतील त्यातले ३५ जण दरमहा बार्शीकर मरतील म्हणजे वर्षात तब्ब्ल ४२० जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतील एवढ्या लोकांचा जीव घेऊन तुम्हाला काय साध्य होणार आहे. नसलेल्या सगळ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे.

औरंगाबादला एका दिवसात जाऊन परत येता  येत नाही मुक्काम करावा लागेल. परिणामी खर्च वाढेल. तसे पुण्याला सकाळी जाऊन सायंकाळी माणूस परत येऊ शकतो.. बार्शीचे रेल्वे स्टेशन जसे तुमच्या हट्टाने तुमच्या सोयींनी उस्मानाबादच्या शिवाराजवळ नेले तसेच आणखी  बार्शी सुद्धा उस्मानाबाद मध्ये नेण्याचे तुमची मानसीकता ही स्वार्थापोटीच आहे…
शेतक-यांना मराठवाड्यात गेल्यावर फार मोठा लाभ मिळेल ही अशा फोल आहे.. राज्यात योजना सर्वाना सारख्याच असतात..आणि नापिकी व दुष्काळ अतिवृष्टीचा सर्वे प्रशासनाकडून कसा जातोय याच्यावर राजकीय नेत्यांनी लक्ष ठेवले म्हणजे शासकीयय मदतीचा ओघ येताच असतो त्यासाठी आपण मराठवाड्यात जाऊ असे म्हणणे उचित ठरणार नाही त्यामुळे कृपया असल्या खोड्या जबाबदार माणसांनी कृपा करून करू नयेत ही विनंती..

या कामी काँग्रेसचा तीव्र विरोध राहील..बार्शीकरांनी काँग्रेसच्या विचारांवर  विश्वास ठेऊन आम्हाला या विषयी साथ द्यावी .. स्थानिक मुर्दाड विरोधकांकडून काही होईल ही अपेक्षा नाही. नगरपरिषदेचे नेते श्री राऊत हे नरेंद्र मोदींचा स्थानिक अवतार असून त्यांनी परिणामांचा विचार न करता हुकूमशाही प्रवृत्तीने नोटबंदी केली तर हे जिल्हाबंदी करताहेत.

– जीवनदत्त आरगडे (अध्यक्ष -बार्शी शहर काँग्रेस कमिटी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
50374
‘शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यापेक्षा हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे’ https://maharashtradesha.com/open-letter-to-aaditya-thackeray-from-imtiyaj-jaleel/ Sun, 23 Dec 2018 06:43:44 +0000 https://maharashtradesha.com/?p=50064

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्र पाठवलं आहे. शिवसेनेकडून पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचं या पत्राच्या माध्यमातून अधोरखित केलं असून बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी महाराष्ट्रात नाव होईल, […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्र पाठवलं आहे.

शिवसेनेकडून पैशांची उधळपट्टी सुरु असल्याचं या पत्राच्या माध्यमातून अधोरखित केलं असून बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी महाराष्ट्रात नाव होईल, असे एक भव्य हॉस्पिटल किंवा ग्रँड म्युनिसिपल स्कूल बांधू शकत नाही का असा सवाल उपस्थित केला आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यापेक्षा हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहुयात इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंसाठी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं –
प्रिय आदित्य,

सुसंस्कृत व शैक्षणिक दृष्ट्याप्रगत असलेले तरुण सध्या राजकीय परिस्थितीवर बोलत आहेत व ती परिस्थिती सुधारावी अशी इच्छा बाळगत आहेत,अशा तरुणांपैकी आपण एक सुसंस्कृत तरुण आहात.

मी आपले औरंगाबाद शहरात स्वागत करतो.

औरंगाबाद शहर हे आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे आणि विकसनशील शहर आहे. असे असले तरी, सध्या हे शहर बकाल अवस्थेत आहे. कोणाच चुकतंय? कोण चूक करत आहे? आणि हे कोणामुळे घडत आहे? हे सर्वश्रुत व बहुचर्चीत प्रश्न सध्या औरंगाबाद मधील सर्वच नागरिकांना पडलेले आहेत. हे प्रश्न नागरिकांना का पडले आहेत, कारण ते या शहरावर निस्सीम प्रेम करतात.

आज हे जाहीर खुले पत्र मी आपणास लिहीत आहे, कारण मला माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. या माझ्या एकट्याचा भावना नसून तमाम औरंगाबादकरांच्या आणि औरंगाबादवर निस्सीम प्रेम करणार्‍या नागरिकांच्या आहेत.

मला हे संपूर्णपणे माहिती आहे की, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहात, बाळासाहेब ठाकरे हे स्वतः एक वलय होते आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

आपल्यात आणि माझ्यात राजकीयदृष्ट्या आणि पक्षीय दृष्ट्या मतभेद असतील, यात काही वाद नाही. आपल्या दोघांचेही ध्येय, धोरण, पक्षीय विचार सर्व गोष्टी भिन्न असतील. एवढेच काय आपण राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधकही असू, पण आपण एक सुसंस्कृत तरुण आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असल्याने आणि आपण नागरिकांची नाळ ओळखून असल्याने मी हे जाहीर खुले पत्र आपणास लिहीत आहे.
औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे.आपल्याला असे नाही वाटत का, की शिवसेना औरंगाबादच्या बकाल अवस्थेत जबाबदार आहे? औरंगाबाद शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहर “कचराबाद” होणे,हे योग्य वाटते का? महापालिकेच्या शाळांची तर अत्यंत दुरवस्था आहे. ह्या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे? औरंगाबाद शहराचे नाव दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. औद्योगिकदृष्ट्या व जागतिक पर्यटनाच्यादृष्टीने एकेकाळी प्रगत असलेले, नावाजलेले हे शहर आज प्रगत शहरांच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर आहे, त्याची क्रमवारी घसरली आहे व सातत्याने घसरतच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटक येईनासे झाले. पर्यटकांची संख्या सातत्याने रोडावत आहे. हे असे का होत आहे? उत्तर अतिशय साधे व सरळ आहे. आदित्य, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना या शहराच्या विकासाच्यादृष्टीने “टॉप प्रायॉरिटीज” काय असाव्यात? याचे भान राहिलेले नाही. कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे? त्याची किती जबाबदारी घ्यायची? याचे भान देखील राहिलेले नाही. त्यांच्यादृष्टीने “सत्तेत असणे” म्हणजे केवळ आपल्या झोळ्या भरणे आणि आपला स्वार्थ साधणे हा आहे. शहराचे काय वाटोळे झाले तरी चालेल, असे त्यांचे वागणे असते.

मी, महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, मुलांना उद्याने मिळण्यासाठी, मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यासाठी , गरिबांना आरोग्यसुविधा सुलभ आणि अखंडित पणे मिळावी ह्यासाठी, गल्लोगल्ली (मोहाला-आधारित) क्लिनिक सुरु करावे ह्यासाठी, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र ह्याला खोडा घातला जातं आहे.

मी शहर विकासाचा प्रयत्न करीत आहे. परंतु हा विकास आपण पक्षीय विरोध विसरून एकत्रपणे केला तर अधिक सोयीचे होईल. आपण दोघे, कोणत्या दोन भिन्न राजकीय पक्षाचे आहोत, याकडे दुर्लक्ष करून या विकासाच्या वाटेवर सामुदायिक प्रयत्न करणेच आवश्यक आहे असे मला वाटते.

माझे असे ठाम मत आहे की, बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि जर त्यांना विचारले गेले असते की,त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर स्मारक बांधायचेय तर त्यांनी त्यास पूर्णपणे नकार दिला असता.पण, औरंगाबादमध्ये आपल्याच पक्षातील पदाधिकार्यांनी तब्बल 25 एकर सरकारी जमीन त्यांच्या स्मारकाससाठी नियोजित केली आहे. आपण स्मारकाऐवजी महाराष्ट्रात नाव होईल, असे एक भव्य हॉस्पिटल किंवा ग्रँड म्युनिसिपल स्कूल बांधू शकत नाही कां आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ शकत नाही कां? अहो जर तुम्ही घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की,शहराला आणखी एका चांगल्या रुग्णालयाची किंवा चांगल्या भव्य महापालिका शाळेची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी मला असे कळले की,क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी महापालिका 1.50 कोटी रुपये रोख खर्च करणार आहे. हे योग्य आहे कां? छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या हृदयात राहतात असे तुम्हाला वाटत नाही कां? त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवून त्यात कोणता फरक पडेल. हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे. किंवा तरुणाईला आपल्या महान राष्ट्रीय नायकांचा इतिहास, साहस आणि त्यांची शिकवण देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाऊ शकत नाही कां?

आदित्य,
मी आपल्याला विनंती करतो की, आपण आपल्या पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सूचना कराव्यात की, त्यांनी महापालिकेत बसून नागरिकांच्या हितसंबंधाचे निर्णय घ्यावेत.

जसे लाखो शिवसैनिक तुमच्याकडे आस लावून पाहत आहेत, एका आशेने पाहत आहेत, तशाच माझ्याही भावना आहेत.
आपण शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहात, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय मोठी आहे, म्हणूनच आपल्याकडे आम्ही बदलाच्या दृष्टीने पाहत आहोत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे अधिक समर्पक ठरेल असे मला वाटते.

एमआयएम पक्षाचा नेता, एमआयएम पक्षाचा आमदार असूनही मी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला अर्थात तुम्हाला हे खुले पत्र दिले आहे. यावरून माझ्यावर टीकास्त्र सोडले जाईल, मला अद्वातद्वा बोलले जाईल, ह्यात काही शंका नाही, पण विश्वास ठेवामी फक्त माझ्या या शहरासाठी केले. कारण मी व माझ्यासारखे असंख्य औरंगाबादकर या “औरंगाबाद”शहरावर प्रेम करतो.

जय हिंद

इम्तियाज जलील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
50064
‘औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले याला शिवसेना जबाबदार नाही का ?’ https://maharashtradesha.com/imtiyaj-jalils-open-letter-to-aaditya-thackeray/ Sun, 23 Dec 2018 06:36:14 +0000 https://maharashtradesha.com/?p=50061

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्र पाठवलं आहे. औरंगाबादमधील नागरिक ज्या समस्यांचा सामना करत आहेत त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- औरंगाबाद महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांचे उदघाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये आहेत. हीच वेळ साधत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला असून आदित्य ठाकरेंना एक खुलं पत्र पाठवलं आहे. औरंगाबादमधील नागरिक ज्या समस्यांचा सामना करत आहेत त्यासाठी शिवसेना जबाबदार नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यापेक्षा हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहुयात इम्तियाज जलील यांनी आदित्य ठाकरेंसाठी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं –
प्रिय आदित्य,

सुसंस्कृत व शैक्षणिक दृष्ट्याप्रगत असलेले तरुण सध्या राजकीय परिस्थितीवर बोलत आहेत व ती परिस्थिती सुधारावी अशी इच्छा बाळगत आहेत,अशा तरुणांपैकी आपण एक सुसंस्कृत तरुण आहात.

मी आपले औरंगाबाद शहरात स्वागत करतो.

औरंगाबाद शहर हे आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे आणि विकसनशील शहर आहे. असे असले तरी, सध्या हे शहर बकाल अवस्थेत आहे. कोणाच चुकतंय? कोण चूक करत आहे? आणि हे कोणामुळे घडत आहे? हे सर्वश्रुत व बहुचर्चीत प्रश्न सध्या औरंगाबाद मधील सर्वच नागरिकांना पडलेले आहेत. हे प्रश्न नागरिकांना का पडले आहेत, कारण ते या शहरावर निस्सीम प्रेम करतात.

आज हे जाहीर खुले पत्र मी आपणास लिहीत आहे, कारण मला माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. या माझ्या एकट्याचा भावना नसून तमाम औरंगाबादकरांच्या आणि औरंगाबादवर निस्सीम प्रेम करणार्‍या नागरिकांच्या आहेत.

मला हे संपूर्णपणे माहिती आहे की, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहात, बाळासाहेब ठाकरे हे स्वतः एक वलय होते आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

आपल्यात आणि माझ्यात राजकीयदृष्ट्या आणि पक्षीय दृष्ट्या मतभेद असतील, यात काही वाद नाही. आपल्या दोघांचेही ध्येय, धोरण, पक्षीय विचार सर्व गोष्टी भिन्न असतील. एवढेच काय आपण राजकीय दृष्ट्या एकमेकांचे विरोधकही असू, पण आपण एक सुसंस्कृत तरुण आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असल्याने आणि आपण नागरिकांची नाळ ओळखून असल्याने मी हे जाहीर खुले पत्र आपणास लिहीत आहे.
औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे.आपल्याला असे नाही वाटत का, की शिवसेना औरंगाबादच्या बकाल अवस्थेत जबाबदार आहे? औरंगाबाद शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहर “कचराबाद” होणे,हे योग्य वाटते का? महापालिकेच्या शाळांची तर अत्यंत दुरवस्था आहे. ह्या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे? औरंगाबाद शहराचे नाव दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. औद्योगिकदृष्ट्या व जागतिक पर्यटनाच्यादृष्टीने एकेकाळी प्रगत असलेले, नावाजलेले हे शहर आज प्रगत शहरांच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर आहे, त्याची क्रमवारी घसरली आहे व सातत्याने घसरतच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटक येईनासे झाले. पर्यटकांची संख्या सातत्याने रोडावत आहे. हे असे का होत आहे? उत्तर अतिशय साधे व सरळ आहे. आदित्य, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना या शहराच्या विकासाच्यादृष्टीने “टॉप प्रायॉरिटीज” काय असाव्यात? याचे भान राहिलेले नाही. कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे? त्याची किती जबाबदारी घ्यायची? याचे भान देखील राहिलेले नाही. त्यांच्यादृष्टीने “सत्तेत असणे” म्हणजे केवळ आपल्या झोळ्या भरणे आणि आपला स्वार्थ साधणे हा आहे. शहराचे काय वाटोळे झाले तरी चालेल, असे त्यांचे वागणे असते.

मी, महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, मुलांना उद्याने मिळण्यासाठी, मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यासाठी , गरिबांना आरोग्यसुविधा सुलभ आणि अखंडित पणे मिळावी ह्यासाठी, गल्लोगल्ली (मोहाला-आधारित) क्लिनिक सुरु करावे ह्यासाठी, महानगरपालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र ह्याला खोडा घातला जातं आहे.

मी शहर विकासाचा प्रयत्न करीत आहे. परंतु हा विकास आपण पक्षीय विरोध विसरून एकत्रपणे केला तर अधिक सोयीचे होईल. आपण दोघे, कोणत्या दोन भिन्न राजकीय पक्षाचे आहोत, याकडे दुर्लक्ष करून या विकासाच्या वाटेवर सामुदायिक प्रयत्न करणेच आवश्यक आहे असे मला वाटते.

माझे असे ठाम मत आहे की, बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि जर त्यांना विचारले गेले असते की,त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर स्मारक बांधायचेय तर त्यांनी त्यास पूर्णपणे नकार दिला असता.पण, औरंगाबादमध्ये आपल्याच पक्षातील पदाधिकार्यांनी तब्बल 25 एकर सरकारी जमीन त्यांच्या स्मारकाससाठी नियोजित केली आहे. आपण स्मारकाऐवजी महाराष्ट्रात नाव होईल, असे एक भव्य हॉस्पिटल किंवा ग्रँड म्युनिसिपल स्कूल बांधू शकत नाही कां आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ शकत नाही कां? अहो जर तुम्ही घाटी हॉस्पिटल किंवा सरकारी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की,शहराला आणखी एका चांगल्या रुग्णालयाची किंवा चांगल्या भव्य महापालिका शाळेची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी मला असे कळले की,क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यासाठी महापालिका 1.50 कोटी रुपये रोख खर्च करणार आहे. हे योग्य आहे कां? छत्रपती शिवाजी महाराज लोकांच्या हृदयात राहतात असे तुम्हाला वाटत नाही कां? त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवून त्यात कोणता फरक पडेल. हे पैसे हॉस्पिटल आणि शाळांमध्ये खर्च करायला हवे. किंवा तरुणाईला आपल्या महान राष्ट्रीय नायकांचा इतिहास, साहस आणि त्यांची शिकवण देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाऊ शकत नाही कां?

आदित्य,
मी आपल्याला विनंती करतो की, आपण आपल्या पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सूचना कराव्यात की, त्यांनी महापालिकेत बसून नागरिकांच्या हितसंबंधाचे निर्णय घ्यावेत.

जसे लाखो शिवसैनिक तुमच्याकडे आस लावून पाहत आहेत, एका आशेने पाहत आहेत, तशाच माझ्याही भावना आहेत.
आपण शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहात, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी अतिशय मोठी आहे, म्हणूनच आपल्याकडे आम्ही बदलाच्या दृष्टीने पाहत आहोत. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे अधिक समर्पक ठरेल असे मला वाटते.

एमआयएम पक्षाचा नेता, एमआयएम पक्षाचा आमदार असूनही मी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला अर्थात तुम्हाला हे खुले पत्र दिले आहे. यावरून माझ्यावर टीकास्त्र सोडले जाईल, मला अद्वातद्वा बोलले जाईल, ह्यात काही शंका नाही, पण विश्वास ठेवामी फक्त माझ्या या शहरासाठी केले. कारण मी व माझ्यासारखे असंख्य औरंगाबादकर या “औरंगाबाद”शहरावर प्रेम करतो.

जय हिंद

इम्तियाज जलील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
50061
शेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको ! https://maharashtradesha.com/for-the-farmers-questions-stop-fast-roads-and-railways/ Fri, 21 Dec 2018 08:16:22 +0000 https://maharashtradesha.com/?p=49950

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : नाशवंत शेतीमाल हमीभाव धोरण, शेतकरी आत्महत्या,जमीन हक्क व दुष्काळ प्रश्नी दिनांक 8 जानेवारी रोजी किसान सभेच्या वतीने राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको करत तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  8-9 जानेवारीच्या अखिल भारतीय संपाला किसान सभा सक्रिय पाठिंबा देणार आहे.  पुणे येथे संपन्न झालेल्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  राज्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही केंद्राच्या चुकीच्या दुष्काळ संहितेमुळे शेकडो गावे दुष्काळाच्या यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळण्यात आली आहेत. दुष्काळी गावांना अद्याप कोणतीही मदत पोहचविण्यात आलेली नाही. फसवी कर्जमाफी व नाकारलेल्या विमा, बोन्ड आळी नुकसानभरपाईमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.  वारंवार आश्वासने देऊनही कसत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. जमीन अधिग्रहणाचा कॉर्पोरेट धार्जिणा कार्यक्रम मात्र राज्यात नेटाने राबविला जात आहे.  या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.

राज्यातील तीव्र दुष्काळ व वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी तातडीने मराठवाड्याचा दौरा करावा व आत्महत्याग्रस्त विभागांसाठी विशेष मदत जाहीर करावी यासाठी किसान सभेच्या वतीने परभणी येथे राज्यव्यापी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

कांद्याच्या पडलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये, म्हणजेच प्रति टन २००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अनुदानाचा फायदा राज्यातील ७५ लाख टन कांद्यास मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यानुसार मदत करावयाची झाल्यास किमान १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. घोषणा करताना तरतूद मात्र केवळ १५० कोटी रुपयेच तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ही मदत केवळ १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासच मिळणार आहे. अगोदर व नंतर कांदा विकला त्यांना अनुदान मिळणार नाही.

शेतकरी कांदा वर्षभर विकतात. केवळ दीड महिन्यात ७५ लाख टन कांदा विकत नाहीत. असे असताना दीड महिन्यातील कांद्यासाठी केवळ १५० कोटींची मदत जाहीर करायची व त्यातून ७५ लाख टन कांद्यास मदत मिळणार असल्याचा दावा करायचा ही शुध्द फसवणूक आहे.

सरकारने २०१६ मध्येही कांद्यासाठी अशाच प्रकारे प्रति क्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आज दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. सदरच्या बाबी पाहता सरकारची ही घोषणाही नवा जुमलाच ठरेल अशीच शक्यता अधिक आहे.

अशा पार्श्वभूमीवर कांदा, टॉमेटो, बटाटा, भाज्या व फळांसारख्या नाशवंत मालाला रास्त भावाचे संरक्षण मिळावे यासाठी भाव स्थिरीकरण कोष, साठवण व्यवस्था, माल तारण योजनेसह एक देशव्यापी धोरण आखण्याची किसान सभेची मागणी आहे. केंद्र सरकारने यासाठी 500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. मात्र प्रत्यक्षात या बाबत काहीच प्रगती झालेली नाही.

अशा परिस्थितीत सर्व कांदा उत्पादकांना कोणत्याची जाचक अटीशिवाय तातडीने मदत द्या व नाशवंत शेतमालाला रास्त भावाचे संरक्षण देण्यासाठी धोरण निश्चित करा या मागण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिल्ली येथे तातडीने भेटणार असून राज्यात या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये तीव्र रस्ता व रेल रोको आंदोलने करण्यात येणार आहेत. पुणे येथे संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिल बैठकीत या संघर्षाचे नियोजन करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49950
कोणत्याही शाही विवाहाला मागे टाकणारा महाराष्ट्रातील सामुदायिक विवाहसोहळा https://maharashtradesha.com/lokmangal-samudayik-vivah-sohla/ Wed, 19 Dec 2018 10:52:05 +0000 https://maharashtradesha.com/?p=49798

उस्मानाबाद : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कन्येचा विवाहसोहळा सध्या देशासह जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अंबानींच्या घरातील सोहळा असल्याने झालेला खर्च हा शेकडो कोटीमध्ये आहे. एवढ्या पैशात आपल्या राज्यातील एक शासकीय योजना पूर्ण होईल. असो शेवटी वैयक्तिक कार्यक्रम कोणी कसा करावा हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. परंतु प्रत्येकालाच आपल्या मुला-मुलीचा विवाह आशा शाही […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

उस्मानाबाद : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कन्येचा विवाहसोहळा सध्या देशासह जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अंबानींच्या घरातील सोहळा असल्याने झालेला खर्च हा शेकडो कोटीमध्ये आहे. एवढ्या पैशात आपल्या राज्यातील एक शासकीय योजना पूर्ण होईल. असो शेवटी वैयक्तिक कार्यक्रम कोणी कसा करावा हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. परंतु प्रत्येकालाच आपल्या मुला-मुलीचा विवाह आशा शाही थाटात करणे शक्य होत नाही.

आपल्याकडे विवाह सोहळा म्हंटल की आकर्षक सजावट असणारा भव्य मंडप, बँडबाजा, घोडा, हजारो वऱ्हाडी असे चित्र आपल्यापुढे उभे राहते. प्रत्येकाला आपल्या मुला- मुलीचा विवाह मोठ्या थाटात करण्याची इच्छा असते परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. याला कारण कधी दुष्काळ तर कधी गरीबी बनते. साधे लग्न म्हणलं तरी आज खर्चाचे आकडे लाखांत जातात. मात्र या सर्व गोष्टीना फाटा देत आपल्या भागातील प्रत्येक लेकीचं लग्न थाटामाटात करण्याचे व्रत घेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून 2006 मध्ये सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यास सुरुवात केली.

स्वतः बिकट परिस्थितीमध्ये कुकुट पालन केंद्रात साधी नौकरी केलेल्या सुभाष देशमुख यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 14 वर्षांपासून सामाजिक बांधिलकीचे व्रत जपले आहे. मागील 13 वर्षांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 31 सोहळ्यात 2515 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. सामुदायिक विवाहसोहळा असला तरी कोणत्याही शाही विवाहाला तो मागे पाडणारच ठरतो.

पारंपरिक प्रथेप्रमाणे सोहळ्यात वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, वधूंसाठी मणी-मंगळसूत्र व जोडवे-बिचवे,तसेच संसारोपयोगी साहित्य बालकृष्णाची मूर्ती दिली जाते.

आपल्याकडे केवळ नवरदेवाची वरात काढण्याची प्रथा आहे, मात्र देशमुख यांनी वधूला देखील मानाचे स्थान देत वधूवरांची संपूर्ण शहरातून वरात काढण्याची प्रथा सुरू केली.साग्रसंगीत पार पडणाऱ्या सोहळ्यामध्ये लाखो वऱ्हाडींसाठी पंचपक्वांन भोजन दिले.

विवाह बंधनात अडकणाऱ्या नववधूवारांना सामाजिक बांधिलकीचे व्रत देण्यासाठी सोहळ्यातच समुपदेशन आणि रक्तदानाचे आयोजन केले जाते. येत्या 30 डिसेंबर रोजी दुष्काळाशी सामना करत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 150 जोडपी विवाहबद्ध होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49798
‘दादा मी प्रेग्नंट आहे’; मुंबई-पुण्यात रस्त्यावर होर्डींग्स https://maharashtradesha.com/dada-i-am-pregnant-hurdings-on-the-road-in-mumbai-pune/ Fri, 30 Nov 2018 13:48:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=48534

दादर हे मुंबईतील गजबजलेलं ठिकाण. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी सतत माणसांची वर्दळ दिसून येते. कामाचा व्याप, बदलती जीवनशैली या साऱ्यामुळे सध्याच्या काळात माणसाला एकमेकांकडे पाहायला किंवा चार घटका बोलायलाही वेळ नाही. अशाच साऱ्या गर्दीमध्ये दादारमधील प्रभादेवी येथे लावलेलं एक होर्डींग नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. शहर आणि या शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले होर्डिंग हे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

दादर हे मुंबईतील गजबजलेलं ठिकाण. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी सतत माणसांची वर्दळ दिसून येते. कामाचा व्याप, बदलती जीवनशैली या साऱ्यामुळे सध्याच्या काळात माणसाला एकमेकांकडे पाहायला किंवा चार घटका बोलायलाही वेळ नाही. अशाच साऱ्या गर्दीमध्ये दादारमधील प्रभादेवी येथे लावलेलं एक होर्डींग नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे.

शहर आणि या शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले होर्डिंग हे आता जुनं समीकरण झालं आहे. त्यामुळे वाटेत येणाऱ्या अनेक होर्डींग्सकडे आपोआप दुर्लक्ष होतं. मात्र काही होर्डीग्स असे असतात.जे नागरिकांच्या उत्सुकता वाढवतात. तसंच दादरमधील ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ या नावाचं होर्डींग चांगलं गाजताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

48534