Maharashatra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Maharashatra – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 शरद पवार माढ्यात तर सहकारमंत्री देशमुखांच्या माळशिरस गावभेटीने वातावरण तापले https://maharashtradesha.com/madha-loksabha-election-news-live-update-new/ Thu, 21 Feb 2019 14:26:12 +0000 https://maharashtradesha.com/?p=55708 माढा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत स्वतः स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजप देखील सज्ज झाली आहे. आज एका बाजूला पवार माढ्यात मेळावा घेत असताना दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी थेट मोहिते […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
माढा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत स्वतः स्वतःची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजप देखील सज्ज झाली आहे. आज एका बाजूला पवार माढ्यात मेळावा घेत असताना दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी थेट मोहिते पाटलांच्या माळशिरसमध्ये गाव भेटी दौरा केला आहे.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण या नाट्याचा पडदा अखेर आज उठला आहे. प्रभाकर देशमुख यांना पूढे करत विद्यमान खा. विजयदादांच्या तोंडून ‘पवार साहेब तुम्हीच लढा’ म्हणवून घेण्यात श्री पवार यशस्वी झाले आहेत. त्यानंतर आता मोहिते पाटील विरोधी शिंदे बंधू, बागल गट देखील पवारांच्या वळचनीला येऊन बसला आहे. त्यामुळे गेली चार – साडेचार वर्षे ज्यांच्यातून विस्तव देखील जात नव्हते ते नेते आता तुझ्या गळा माझ्या गळा गाताना दिसत आहेत.

एका बाजूला पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला तात्पुरता ब्रेक लावण्यात पवार यशस्वी झाल्याचं चित्र आहे. मात्र हे किती दिवस टिकणार सांगता येत नाही. दरम्यान, सध्या राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल असले तरी भाजपमध्ये मात्र घडामोडींना वेग आला आहे. 2009 च्या तुलनेत परिस्थिती बद्दलल्याने भाजपचे आत्मबळ वाढले आहे. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सारखा तगडा उमेदवार रणांगणात उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे.

आज शरद पवार हे माढ्यातील पिंपळनेर येथे कार्यकर्ता बैठक घेत असताना सुभाष देशमुख यांनी माळशिरस तालुक्यात गावभेट घेत चाचपणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55708
सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे – आदित्य ठाकरे https://maharashtradesha.com/aaditya-thakare-comment-on-youngster-health/ Thu, 21 Feb 2019 14:16:33 +0000 https://maharashtradesha.com/?p=55706 मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे जीवनातील ताणतणाव वाढत चालला आहे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर योग्य निदान होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी सारख्या आरोग्य सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मौखिक आरोग्य उत्तम असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याचा आपल्या आहार पद्धतींवर प्रभाव पडतो. आरोग्यवर्धिनी च्या माध्यमातून […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे जीवनातील ताणतणाव वाढत चालला आहे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर योग्य निदान होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी सारख्या आरोग्य सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मौखिक आरोग्य उत्तम असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याचा आपल्या आहार पद्धतींवर प्रभाव पडतो. आरोग्यवर्धिनी च्या माध्यमातून दंत व मुखरोग आरोग्य सेवा जनतेला मिळणार आहेत. सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आजार होऊन नयेत म्हणून म्हणून शाळांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आरोग्यवर्धिनी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री श्री. शिंदे तसेच श्री. ठाकरे यांनी हरिसाल, नंदुरबार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
राज्यातील आरोग्य सोयी सुविधा बळकटीकरणासाठी चालू आर्थिक वर्षात १ हजार १२ आरोग्य उपकेंद्रे, ग्रामीण भागातील ४७९ व शहरी भागातील १२५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ४ आकांक्षित गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार व इतर १५ भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे,अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, जळगांव जिल्ह्यातील येऊन ३१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतलेले आरोग्य अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रांवर औषधी व प्रयोगशालेय तपासण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

आरोग्यवर्धिनी या शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत राज्यामधील सर्व १० हजार ६६८ उपकेंद्रे, ६०५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ हजार ८२८ ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) रूपांतर करण्यात येणार आहे

आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा 

प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा
नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा
बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
कुटुंब नियोजन
संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रुगांची बाह्य रुग्ण तपासणी
संसर्ग जन्य रोग नियोजन व तपासणी
असंसर्गजन्य रोग व नियोजन व तपासणी
मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा
दंत व मुख आरोग्य सेवा
वाढत्या वयातील आजार व परिहरक उपचार
प्राथमिक उपचार
आपत्कालीन सेवा
आयुर्वेद व योग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55706
आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण आरोग्यसेवा –  एकनाथ शिंदे https://maharashtradesha.com/he-health-service-provided-to-the-general-public-through-healthcare-says-eknath-shinde/ Thu, 21 Feb 2019 14:10:46 +0000 https://maharashtradesha.com/?p=55703 मुंबई : सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या १३ प्रकारच्या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात हेल्थ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून 12 हजार आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून त्या माध्यमातून झोपडपट्टीमधील नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. काल ठाण्यात आपल्या दवाखान्याच्या 2 केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात 100 सेंटरसाठी मंजुरी मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली

मंत्री श्री. शिंदे म्हणाले, दुर्गम भागात उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आशा वर्कर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री खोतकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55703
राज्यात सुरू होणार आपला दवाखाना ; १०० युनिटला मंजुरी मिळाल्याची घोषणा https://maharashtradesha.com/health-ministers-announcement-of-100-units-sanctioned/ Thu, 21 Feb 2019 14:05:52 +0000 https://maharashtradesha.com/?p=55701 मुंबई : राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे. ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत राज्यातील १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक स्तरावर १३विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्या बरोबरच उपकेंद्रांचे बळकटीकरण […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे. ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत राज्यातील १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक स्तरावर १३विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्या बरोबरच उपकेंद्रांचे बळकटीकरण केले जाणार आहे. दरम्यान राज्यात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात येत असून केंद्र शासनाच्या माध्यमातून 100 युनिटला मंजुरी मिळाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी वस्त्रोद्योग,राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास,आरोग्य सेवा आयुक्त डॉ अनुप कुमार यादव, आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. कंदेवाड आदी उपस्थित होते. यावेळी पुलवामा येथील हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55701
५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान, सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही मतदान https://maharashtradesha.com/maharashtra-grampanchayat-election/ Thu, 21 Feb 2019 13:59:11 +0000 https://maharashtradesha.com/?p=55699 मुंबई : राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 13 मार्च 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे- 3,रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12,अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3,औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम-32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण-557.

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1,रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1, जळगाव- 2, अहमदगनर- 4,नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1,नांदेड- 6, उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6,बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55699
पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान https://maharashtradesha.com/voting-on-march-24-for-palghar-sindhkhedraja-and-lonar-municipal-council/ Thu, 21 Feb 2019 13:44:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=55697 मुंबई, दि. 21 : पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई, दि. 21 : पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55697
कोकण विभागातील कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे राज्यमंत्री चव्हाण यांचे निर्देश https://maharashtradesha.com/minister-of-state-for-chavan-directed-to-take-action-against-kunbi-community-demands/ Thu, 21 Feb 2019 13:41:53 +0000 https://maharashtradesha.com/?p=55694 मुंबई : कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करुन तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज आढावा घेतला. या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण महसूल […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करुन तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात आज आढावा घेतला.

या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ, पनवेल विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर, माजी आमदार डॉ. विनय नातू, कुणबी समाज संघटना अध्यक्ष भूषण बरे, विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे उपसचिव रवींद्र गुरव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, कोकणातील पाचही जिल्ह्यात कुणबी समाजाला जात प्रमाणपत्र मिळताना 1967 च्या वास्तव्याचा पुरावा मागितला जातो. ही अट दूर करण्यासाठी सातत्याने मागणी होत आहे. या संदर्भात राज्यातील इतर भागातील कुणबी समाजाचा समावेश ज्या प्रमाणे इतर मागास वर्ग म्हणून झाला आहे त्याच प्रमाणे कोकणातील कुणबी समाजाची नोंद व्हावी या साठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करून दाखले वाटपासाठी विशेष शिबीर आयोजित करुन हे दाखले देण्यात यावे असे आदेश त्यांनी दिले.

इतर मागासवर्गीय महामंडळांतर्गत कोकण विभागाकरिता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना झाली असून या महामंडळाचे भागभांडवल वाढविण्यासंदर्भातील निर्णय घ्यावा तसेच कोककणातील सिंधुदुर्ग, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील जमीन उपलब्धतेबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवून अशा जमिनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55694
युतीसाठी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो, हताश केजरीवालांचे काँग्रेसवर शरसंधान https://maharashtradesha.com/tired-of-congress-several-times-for-the-alliance/ Thu, 21 Feb 2019 13:34:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55692 टीम महाराष्ट्र देशा- भाजपचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण काँग्रेस प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये एका सभेत बोलताना हताश झालेल्या केजरीवाल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि आप […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा- भाजपचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण काँग्रेस प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमध्ये एका सभेत बोलताना हताश झालेल्या केजरीवाल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि आप दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांवर एकत्र लढल्यास मतांचे विभाजन होणार नाही. इतकंच नव्हे तर भाजपला दिल्लीत एकही जागा जिंकता येणार नाही, असा विश्वास केजरीवाल यांनी बोलून दाखविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55692
तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी; चार फोटो ट्विट करत सिद्धूंची मोदींवर टीका https://maharashtradesha.com/if-you-did-that-you-would-have-betrayed-it/ Thu, 21 Feb 2019 13:18:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55688 टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले होते. त्यानंतर भाजपाने सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर टीका केली आहे.या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले होते. त्यानंतर भाजपाने सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली.

त्यानंतर आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर टीका केली आहे.या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे.

सिद्धू महाले की, तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी, अशा शब्दांमध्ये सिद्धूंनी मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. ठार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55688
बलात्कार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे ‘डॉक्टर काँगो’… https://maharashtradesha.com/article-on-doctor-congo-written-by-vinit-vartak/ Thu, 21 Feb 2019 12:59:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=55685 विनीत वर्तक : जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की ‘युनायटेड नेशन’ च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
विनीत वर्तक : जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की ‘युनायटेड नेशन’ च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे जगात होणाऱ्या बलात्काराचं केंद्रबिंदू होतं. बलात्कार करताना पण त्यात आपण विचार करू शकत नाही इतकी कौर्याची सीमा गाठली जायची. झाडाला बांधून सगळ्यांनी एकदा, दोनदा नव्हे तर चार पाच दिवस केलेला बलात्कार असो वा स्त्रियांच्या जननेन्द्रियांना चटके देणं ते जाळणे असो वा बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी करणं असो बलात्काराच्या घटनांमध्ये पुरुषाच्या अमानुषता गाठलेल्या कौर्याने पूर्ण जग हादरून गेलं होतं.

ह्या सर्व घटना काँगो सारख्या देशात घडत असताना पूर्ण जग मूग गिळून गप्प होतं. लढाईत स्त्रीचा शस्त्र म्हणून केलेला वापर दिसत असतानासुद्धा जगाने डोळे मिटून घेतले होते. काँगो मधल्या क्रूरतेने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनाही लाज वाटेल इतकी मजल गाठली होती. काँगो मधल्या स्त्रियांना कोणीच वाली नव्हता; पण त्यांच्या ह्या अमानुष अत्याचाराला वैद्यकीय मापदंडातून, माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्यांनी वाचवलं ते म्हणजेच ज्यांना डॉक्टर काँगो म्हणलं जातं ते, अर्थात डॉक्टर ‘डेनिस मुकवेगे.’

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी काँगो युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५०,००० हून अधिक स्त्रियांना नुसतं वाचवलं नाही, तर त्यांना एक आयुष्याची एक नवीन पहाट दाखवली. डॉक्टर मुकवेगे हे इथवर थांबले नाहीत तर स्त्रियांवर होणाऱ्या ह्या अमानुष अत्याचाराला त्यांनी जागतिक पटलावर वाचा फोडली. स्त्रियांचा युद्धात शस्त्र म्हणून होणारा वापर त्यांनी युनायटेड नेशन ते इतर मार्गाने जगापुढे मांडला. हा वापर रोखण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी जगापुढे जेव्हा आपले अनुभव सांगितले तेव्हा माणूस इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो हे सिद्ध झालं. डॉक्टर मुकवेगे काँगो मधील स्त्रियांचा अत्याचार मांडताना म्हंटल होतं.

“There used to be a lot of gorillas in there, but now they’ve been replaced by much more savage beasts.”

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांचा जन्म १ मार्च १९५५ साली काँगो इथल्या ‘बुकावू’ इथे झाला. आपल्या नऊ भावंडाच्या मोठ्या कुटुंबात लहानपणीच ‘डेनिस मुकवेगे’ ह्यांनी आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेऊन डॉक्टर बनायचं ठरवलं होतं. आपल्या गावाच्या बाजूला असणाऱ्या ‘बुरांडी’ मधून त्यांनी मेडिसिन ची पदवी घेतली. पुढील पदवी त्यांनी फ्रान्स मधून गायनेकॉलॉजी मध्ये घेतली. १९९८ ला दुसरं काँगो युद्ध सुरु झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाची वाट धरली. ‘बुकावू’ मध्ये परत आल्यावर स्त्रियांवर झालेले अत्याचार बघून त्यांनी तिकडे ‘पांझी हॉस्पिटल’ ची स्थापना १९९९ साली केली. दिवसाला १७ तास काम करून ते दिवसाला १० पेक्षा जास्ती शस्त्रक्रिया अशा स्त्रियांवर करत होते ,ज्या तिथल्या पुरुषांच्या क्रूरतेच्या अत्याचाराला पाशवी लैंगिक अत्याचाराला बळी पडत होत्या. ह्या अमानुष अत्याचाराची पातळी इतकी खालची होती की ह्या स्त्रिया हॉस्पिटलमध्ये येताना विवस्त्र येत असतं तर कधी कधी अक्षरशः त्यांच्या जननेन्द्रियांतून रक्ताची धार वहात असे. डॉक्टर डेनिस मुकवेगे सांगतात की एकदा तर एका ३ वर्षाच्या मुलीवर केलेले अत्याचार बघून त्याचं मन विषण्ण झालं!

पांझी हॉस्पिटल हे नावाला हॉस्पिटल होतं. खाट, जमीन, व्हरांडा जिकडे मिळेल तशी जागा पकडून शस्त्रक्रिया होत होत्या. रक्त, लघवी, पसरलेली असताना त्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांचा आक्रोश!! ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी आपलं माणुसकीचं काम सुरु ठेवलं. ज्या ठिकाणचं वर्णन वाचून आपल्याला शब्द नकोसे वाटतील, भावना गोठ्तील त्या परिस्थितीत डॉक्टर डेनिस मुकवेगे दिवसाला १० पेक्षा जास्त अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांवर शस्त्रक्रिया करत होते. समोरचं मन विषण्ण करणारं दृश्य बघून कोणता डॉक्टर शांत डोक्याने आपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया करू शकेल ह्याचा विचार करताना मी निशब्द झालो.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“When the victims come, you can tell by the wounds where it happened, In Bunyakiri, they burn the women’s bottoms. In Fizi-Baraka, they are shot in the genitals. In Shabunda, it’s bayonets.”

“Some of these girls whose insides have been destroyed are so young that they don’t understand what happened to them,” “Why would you ever rape a 3-year-old?”

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या कामाची व्याप्ती वाढत जात होती. आजूबाजूच्या शहरातून ही ह्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागल्या. अत्याचार करणाऱ्या लोकांना हे सहन झालं नाही. त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मुलीला बंधक बनवून त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर गोळी झाडली. जमिनीवर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी युरोप मध्ये आश्रय घेतला. पण ह्या सगळ्याचा परिणाम पांझी इथल्या हॉस्पिटल वर झाला. तिथल्या स्त्रियांना कोणी वाली उरला नाही. पण बुकावू इथल्या स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांना परत येण्यासाठी साद घातली. सगळ्या स्त्रियांनी अननस आणि कांदा विकून त्या पैशातून त्यांच्या तिकिटाचा खर्च उचलला.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरवात केली. आता फक्त उपचारांवर न थांबता त्यांनी ह्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय मंचावर वाचा फोडली. त्यांच्या ह्या माणुसकीच्या कार्याची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. २००८ ला त्यांना ‘यु.एन. ह्युमन राईट्स’ तर २००९ मध्ये आफ्रिकन ऑफ दी इअर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०१६ ला ‘टाईम’ अंकाने जगातील सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. तर २०१८ साली त्यांना सर्वोच्च मानाच्या नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१८ ला नोबेल शांती पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा पण ते एका शस्त्रक्रियेत व्यस्त होते. त्यांच्या पांझी हॉस्पिटल मधून आजवर ८२,००० पेक्षा जास्त स्त्रियांवर उपचार केले गेले आहेत.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी ज्या परिस्थितीत स्त्रियांवर उपचार केले आहेत त्याचा विचारदेखील आपण करू शकत नाही. उपचार करणं इतकं भयावह असेल तर त्या स्त्रियांना च्या अमानुषतेला बळी पडावं लागलं असेल ते शब्दांपलीकडचं आहे. त्याचं कार्य वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था होते; तर ज्यांनी ते भोगलं असेल त्या स्त्रियांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. युद्धात बंदुकीतल्या गोळ्यांना पण पैसे लागतात, पण स्त्री ही फुकट असते ह्या पद्धतीने काँगोच्या युद्धात स्त्री चा वापर केला गेला. आज डॉक्टर मुकवेगे सारखे लोकं तिकडे नसते तर ह्यात मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची संख्या कैक पटीने वाढली तर असतीच पण हा अमानुष अत्याचार त्या देशात लपून राहिला असता. कोणतीही अपेक्षा न करता लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या ‘डॉक्टर काँगो’ अर्थात डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55685