India – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 India – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान https://maharashtradesha.com/voting-on-march-24-for-palghar-sindhkhedraja-and-lonar-municipal-council/ Thu, 21 Feb 2019 13:44:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=55697 मुंबई, दि. 21 : पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई, दि. 21 : पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55697
युतीसाठी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो, हताश केजरीवालांचे काँग्रेसवर शरसंधान https://maharashtradesha.com/tired-of-congress-several-times-for-the-alliance/ Thu, 21 Feb 2019 13:34:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55692 टीम महाराष्ट्र देशा- भाजपचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण काँग्रेस प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये एका सभेत बोलताना हताश झालेल्या केजरीवाल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि आप […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा- भाजपचा पराभव करण्याचा निश्चय केलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘युतीसाठी मी काँग्रेसला अनेकदा विनवण्या करून थकलो. पण काँग्रेस प्रतिसादच देत नाही,’ अशी खंत केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीमध्ये एका सभेत बोलताना हताश झालेल्या केजरीवाल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.काँग्रेस आणि आप दिल्लीतील सात लोकसभेच्या जागांवर एकत्र लढल्यास मतांचे विभाजन होणार नाही. इतकंच नव्हे तर भाजपला दिल्लीत एकही जागा जिंकता येणार नाही, असा विश्वास केजरीवाल यांनी बोलून दाखविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55692
तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी; चार फोटो ट्विट करत सिद्धूंची मोदींवर टीका https://maharashtradesha.com/if-you-did-that-you-would-have-betrayed-it/ Thu, 21 Feb 2019 13:18:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55688 टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले होते. त्यानंतर भाजपाने सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर टीका केली आहे.या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले होते. त्यानंतर भाजपाने सिद्धू यांच्यावर सडकून टीका केली.

त्यानंतर आता या टीकेला सिद्धूंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर टीका केली आहे.या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे.

सिद्धू महाले की, तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी, अशा शब्दांमध्ये सिद्धूंनी मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी चार फोटो जोडले आहेत. यात त्यांनी मोदींना टॅगदेखील केलं आहे. तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही, असं सिद्धूंनी म्हटलं आहे. ठार केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55688
बलात्कार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे ‘डॉक्टर काँगो’… https://maharashtradesha.com/article-on-doctor-congo-written-by-vinit-vartak/ Thu, 21 Feb 2019 12:59:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=55685 विनीत वर्तक : जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की ‘युनायटेड नेशन’ च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
विनीत वर्तक : जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला. इथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचं स्वरूप इतकं मोठं होतं की ‘युनायटेड नेशन’ च्या काही अधिकाऱ्यांच्या मते काँगो हे जगात होणाऱ्या बलात्काराचं केंद्रबिंदू होतं. बलात्कार करताना पण त्यात आपण विचार करू शकत नाही इतकी कौर्याची सीमा गाठली जायची. झाडाला बांधून सगळ्यांनी एकदा, दोनदा नव्हे तर चार पाच दिवस केलेला बलात्कार असो वा स्त्रियांच्या जननेन्द्रियांना चटके देणं ते जाळणे असो वा बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी करणं असो बलात्काराच्या घटनांमध्ये पुरुषाच्या अमानुषता गाठलेल्या कौर्याने पूर्ण जग हादरून गेलं होतं.

ह्या सर्व घटना काँगो सारख्या देशात घडत असताना पूर्ण जग मूग गिळून गप्प होतं. लढाईत स्त्रीचा शस्त्र म्हणून केलेला वापर दिसत असतानासुद्धा जगाने डोळे मिटून घेतले होते. काँगो मधल्या क्रूरतेने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टींनाही लाज वाटेल इतकी मजल गाठली होती. काँगो मधल्या स्त्रियांना कोणीच वाली नव्हता; पण त्यांच्या ह्या अमानुष अत्याचाराला वैद्यकीय मापदंडातून, माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्यांनी वाचवलं ते म्हणजेच ज्यांना डॉक्टर काँगो म्हणलं जातं ते, अर्थात डॉक्टर ‘डेनिस मुकवेगे.’

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी काँगो युद्धात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ५०,००० हून अधिक स्त्रियांना नुसतं वाचवलं नाही, तर त्यांना एक आयुष्याची एक नवीन पहाट दाखवली. डॉक्टर मुकवेगे हे इथवर थांबले नाहीत तर स्त्रियांवर होणाऱ्या ह्या अमानुष अत्याचाराला त्यांनी जागतिक पटलावर वाचा फोडली. स्त्रियांचा युद्धात शस्त्र म्हणून होणारा वापर त्यांनी युनायटेड नेशन ते इतर मार्गाने जगापुढे मांडला. हा वापर रोखण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी जगापुढे जेव्हा आपले अनुभव सांगितले तेव्हा माणूस इतक्या नीच पातळीला जाऊ शकतो हे सिद्ध झालं. डॉक्टर मुकवेगे काँगो मधील स्त्रियांचा अत्याचार मांडताना म्हंटल होतं.

“There used to be a lot of gorillas in there, but now they’ve been replaced by much more savage beasts.”

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांचा जन्म १ मार्च १९५५ साली काँगो इथल्या ‘बुकावू’ इथे झाला. आपल्या नऊ भावंडाच्या मोठ्या कुटुंबात लहानपणीच ‘डेनिस मुकवेगे’ ह्यांनी आपल्या वडिलांकडून स्फूर्ती घेऊन डॉक्टर बनायचं ठरवलं होतं. आपल्या गावाच्या बाजूला असणाऱ्या ‘बुरांडी’ मधून त्यांनी मेडिसिन ची पदवी घेतली. पुढील पदवी त्यांनी फ्रान्स मधून गायनेकॉलॉजी मध्ये घेतली. १९९८ ला दुसरं काँगो युद्ध सुरु झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशाची वाट धरली. ‘बुकावू’ मध्ये परत आल्यावर स्त्रियांवर झालेले अत्याचार बघून त्यांनी तिकडे ‘पांझी हॉस्पिटल’ ची स्थापना १९९९ साली केली. दिवसाला १७ तास काम करून ते दिवसाला १० पेक्षा जास्ती शस्त्रक्रिया अशा स्त्रियांवर करत होते ,ज्या तिथल्या पुरुषांच्या क्रूरतेच्या अत्याचाराला पाशवी लैंगिक अत्याचाराला बळी पडत होत्या. ह्या अमानुष अत्याचाराची पातळी इतकी खालची होती की ह्या स्त्रिया हॉस्पिटलमध्ये येताना विवस्त्र येत असतं तर कधी कधी अक्षरशः त्यांच्या जननेन्द्रियांतून रक्ताची धार वहात असे. डॉक्टर डेनिस मुकवेगे सांगतात की एकदा तर एका ३ वर्षाच्या मुलीवर केलेले अत्याचार बघून त्याचं मन विषण्ण झालं!

पांझी हॉस्पिटल हे नावाला हॉस्पिटल होतं. खाट, जमीन, व्हरांडा जिकडे मिळेल तशी जागा पकडून शस्त्रक्रिया होत होत्या. रक्त, लघवी, पसरलेली असताना त्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांचा आक्रोश!! ह्या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी आपलं माणुसकीचं काम सुरु ठेवलं. ज्या ठिकाणचं वर्णन वाचून आपल्याला शब्द नकोसे वाटतील, भावना गोठ्तील त्या परिस्थितीत डॉक्टर डेनिस मुकवेगे दिवसाला १० पेक्षा जास्त अशा अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांवर शस्त्रक्रिया करत होते. समोरचं मन विषण्ण करणारं दृश्य बघून कोणता डॉक्टर शांत डोक्याने आपल्याला उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये शस्त्रक्रिया करू शकेल ह्याचा विचार करताना मी निशब्द झालो.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“When the victims come, you can tell by the wounds where it happened, In Bunyakiri, they burn the women’s bottoms. In Fizi-Baraka, they are shot in the genitals. In Shabunda, it’s bayonets.”

“Some of these girls whose insides have been destroyed are so young that they don’t understand what happened to them,” “Why would you ever rape a 3-year-old?”

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांच्या कामाची व्याप्ती वाढत जात होती. आजूबाजूच्या शहरातून ही ह्या अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागल्या. अत्याचार करणाऱ्या लोकांना हे सहन झालं नाही. त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या मुलीला बंधक बनवून त्यांनी डॉक्टर मुकवेगे ह्यांच्यावर गोळी झाडली. जमिनीवर पडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर त्यांनी काही काळासाठी युरोप मध्ये आश्रय घेतला. पण ह्या सगळ्याचा परिणाम पांझी इथल्या हॉस्पिटल वर झाला. तिथल्या स्त्रियांना कोणी वाली उरला नाही. पण बुकावू इथल्या स्त्रियांनी एकत्र येऊन त्यांना परत येण्यासाठी साद घातली. सगळ्या स्त्रियांनी अननस आणि कांदा विकून त्या पैशातून त्यांच्या तिकिटाचा खर्च उचलला.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाला सुरवात केली. आता फक्त उपचारांवर न थांबता त्यांनी ह्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय मंचावर वाचा फोडली. त्यांच्या ह्या माणुसकीच्या कार्याची दखल आंतराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. २००८ ला त्यांना ‘यु.एन. ह्युमन राईट्स’ तर २००९ मध्ये आफ्रिकन ऑफ दी इअर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २०१६ ला ‘टाईम’ अंकाने जगातील सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. तर २०१८ साली त्यांना सर्वोच्च मानाच्या नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१८ ला नोबेल शांती पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा पण ते एका शस्त्रक्रियेत व्यस्त होते. त्यांच्या पांझी हॉस्पिटल मधून आजवर ८२,००० पेक्षा जास्त स्त्रियांवर उपचार केले गेले आहेत.

डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांनी ज्या परिस्थितीत स्त्रियांवर उपचार केले आहेत त्याचा विचारदेखील आपण करू शकत नाही. उपचार करणं इतकं भयावह असेल तर त्या स्त्रियांना च्या अमानुषतेला बळी पडावं लागलं असेल ते शब्दांपलीकडचं आहे. त्याचं कार्य वाचताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी अशी अवस्था होते; तर ज्यांनी ते भोगलं असेल त्या स्त्रियांच्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. युद्धात बंदुकीतल्या गोळ्यांना पण पैसे लागतात, पण स्त्री ही फुकट असते ह्या पद्धतीने काँगोच्या युद्धात स्त्री चा वापर केला गेला. आज डॉक्टर मुकवेगे सारखे लोकं तिकडे नसते तर ह्यात मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची संख्या कैक पटीने वाढली तर असतीच पण हा अमानुष अत्याचार त्या देशात लपून राहिला असता. कोणतीही अपेक्षा न करता लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या ‘डॉक्टर काँगो’ अर्थात डॉक्टर डेनिस मुकवेगे ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55685
पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत; ६० दिवस पुरेल एवढाच पैसा शिल्लक https://maharashtradesha.com/pakistans-economy-is-in-bankruptcy/ Thu, 21 Feb 2019 12:13:16 +0000 https://maharashtradesha.com/?p=55678 टीम महाराष्ट्र देशा – भारताचा शेजारी आणि सातत्याने जम्मू-कश्मीर प्रश्नावरून कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचा गेल्या 70 वर्षात आर्थिक विकास झालेलाच नाही. पाकिस्तानची आजची परिस्थिती इतकी बिकट आहे की विदेशातून आयात करण्यासाठी फक्त 60 दिवस पूरेल एवढच परदेशी चलन उरलेले आहे. पाकिस्तानला विदेशी मदत मिळाली नाही, तर येत्या दोन महिन्यात दिवाळखोरीची स्थिती येवू शकते. जवळ जवळ जगातील सर्व […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – भारताचा शेजारी आणि सातत्याने जम्मू-कश्मीर प्रश्नावरून कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचा गेल्या 70 वर्षात आर्थिक विकास झालेलाच नाही. पाकिस्तानची आजची परिस्थिती इतकी बिकट आहे की विदेशातून आयात करण्यासाठी फक्त 60 दिवस पूरेल एवढच परदेशी चलन उरलेले आहे. पाकिस्तानला विदेशी मदत मिळाली नाही, तर येत्या दोन महिन्यात दिवाळखोरीची स्थिती येवू शकते.

जवळ जवळ जगातील सर्व दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना पोसणारा पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. उद्योगाला अनुकूल नसणारे वातावरण, राजकीय अस्थिरता, दहशतवाद, कट्टरतावाद यामुळं पाकिस्तानची सगळी शक्ती ही दहशतवादी संघटनांना पोसण्यात खर्च होते.

राजकीय अस्थिरता आणि दहशतवादामुळे पाकिस्तानात विदेशी गुंतवणूक येत नाही. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प आहे. तर कमालीची गरीबी असल्याने करांमधूनही फार पैसे जमा होत नाही. त्यामुळे पाकिस्तानला विदेशी मदतीवर कायम अवलंबून राहावं लागतं. गेली अनेक दशक अमेरिकेच्या पैशावर आणि आता चीनच्या पैशावर पाकिस्तान आलेला दिवस काढतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55678
‘काश्मीर समस्येचे जनक पंडीत नेहरु’ https://maharashtradesha.com/pandit-nehru-father-of-kashmir-problem/ Thu, 21 Feb 2019 10:56:03 +0000 https://maharashtradesha.com/?p=55673 टीम महाराष्ट्र देशा – जम्मू-काश्मीर समस्येमुळं सातत्याने दहशतवादी हल्ले होतात. त्या जम्मू-काश्मीर समस्येचे जनक हे दुसरं तिसरं कोणी नसून पंडीत जवाहरलाल नेहरु हे आहेत, त्यांच्यामुळेच काश्मीरचा प्रश्न कायम आहे, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ते आंध्र प्रदेशमधील सभेत बोलत होते. अमित शहा म्हणले, सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान झाले असते […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – जम्मू-काश्मीर समस्येमुळं सातत्याने दहशतवादी हल्ले होतात. त्या जम्मू-काश्मीर समस्येचे जनक हे दुसरं तिसरं कोणी नसून पंडीत जवाहरलाल नेहरु हे आहेत, त्यांच्यामुळेच काश्मीरचा प्रश्न कायम आहे, असे म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ते आंध्र प्रदेशमधील सभेत बोलत होते.

अमित शहा म्हणले, सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर काश्मीर समस्या सुटली असतीआंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे, पण भारताच्या पंतप्रधानांवर नाही, अशी टीका अमित शहा यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर केली आहे.

राजकीय फायद्यासाठी राजकारणाची पातळी सोडू नका, असं आवाहन अमित शहा यांनी चंद्राबाबू नायडूंना केलं आहे. जम्मू-काश्मीर समस्येचे जनक हे दुसरं तिसरं कोणी नसून पंडीत जवाहरलाल नेहरु हे आहेत, असे अमित शहा म्हणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55673
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दोडतले https://maharashtradesha.com/balasaheb-dodatley-as-the-chairman-of-the-development-corporation/ Thu, 21 Feb 2019 07:13:29 +0000 https://maharashtradesha.com/?p=55638 मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब प्रभाकर दोडतले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. तसा शासकीय निर्णय राज्य सरकारने काढला आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळावर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब प्रभाकर दोडतले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. तसा शासकीय निर्णय राज्य सरकारने काढला आहे.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दोडतले यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

बाळासाहेब दोडतले हे अगदी लहान वयापासूनच ना. श्री. महादेव जानकर साहेब यांच्यासोबत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते मुळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवाशी आहेत. ना.श्री. महादेव जानकर साहेबांचे अत्यंत विश्वासू असलेले दोडतले यांच्यामुळे निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देणार: दोडतले
“पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या खूप चांगल्या योजना राज्य सरकार राबवत आहे. समाजातील तळागाळातील सामान्य व्यक्तीला महामंडळाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55638
मेह्बुबांचं पाक प्रेम आलं उफाळून,म्हणाल्या इम्रान खान यांना ‘एक संधी’ देणे गरजेचे https://maharashtradesha.com/mehboobs-love-for-pakistan-came-alive/ Wed, 20 Feb 2019 13:40:26 +0000 https://maharashtradesha.com/?p=55597 मेहबूबा म्हणतात ‘नया है वो’,इम्रान खानला एक संधी द्या टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला आतरराष्ट्रीय पाठींबा वाढत असताना भारतातील काही नेत्यांना पुन्हा पाकड्यांचा पुळका आला आहे. भारताने पाकिस्तानला पठाणकोट दहशतवादी हल्ला, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले असतानाही त्या देशाने काहीही कारवाई केली नाही हे खरे आहे, […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
मेहबूबा म्हणतात ‘नया है वो’,इम्रान खानला एक संधी द्या

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला आतरराष्ट्रीय पाठींबा वाढत असताना भारतातील काही नेत्यांना पुन्हा पाकड्यांचा पुळका आला आहे. भारताने पाकिस्तानला पठाणकोट दहशतवादी हल्ला, तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्याचे पुरावे दिले असतानाही त्या देशाने काहीही कारवाई केली नाही हे खरे आहे, मात्र असे असले तरी इम्रान खान हे नवे पंतप्रधान असल्याने त्यांना संधी देणे गरजेचे आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री,पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे.

तर दुसऱ्या बाजूला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायलने भारताला बिनशर्त मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. महत्वाचं म्हणजे या मदतीमध्ये कुठलीही मर्यादा नसेल. भारताला लागेल तितकी मदत आणि सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे इस्त्रायलचे नवनियुक्त राजदूत डॉ. रॉन मल्का यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने मोक्याच्या क्षणी भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे.

दरम्यान,मुफ्ती यांनी पाकिस्तानवर प्रेम करणे सोडून द्यावे, त्या भारताचे खात असल्याने त्यानी भारताचेच गुणगान गावे, अस्तनीतील साप बनू नये, असा टोलाही गिरिराज सिंह यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55597
‘गली बॉय’मधील मुराद-सफ़ीनाचं नातं सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक https://maharashtradesha.com/murad-and-safina-is-one-of-the-best-chemistry-in-bollywood/ Wed, 20 Feb 2019 12:35:55 +0000 https://maharashtradesha.com/?p=55592 गली बॉय मध्ये दाखवलेलं मुराद आणि सफ़ीनाचं नातं हे मी आजवर बॉलीवूडमध्ये बघितलेल्या सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक आहे. एकमेकांशी अजिबात ओळख नसलेल्या स्वतंत्र एंटिटी सारखा बसमध्ये असलेला वावर आणि पुढच्याच क्षणाला सीट, इअरफोन शेअर करत एकमेकांच्या हातात हात घेऊन सहजतेने एकमेकांना अधिकाराने शेअर करणे हा सिन निव्वळ अफलातून आहे. ज्या कम्फर्ट लेव्हल ला पोचायला कुठल्याही […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
गली बॉय मध्ये दाखवलेलं मुराद आणि सफ़ीनाचं नातं हे मी आजवर बॉलीवूडमध्ये बघितलेल्या सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक आहे.

एकमेकांशी अजिबात ओळख नसलेल्या स्वतंत्र एंटिटी सारखा बसमध्ये असलेला वावर आणि पुढच्याच क्षणाला सीट, इअरफोन शेअर करत एकमेकांच्या हातात हात घेऊन सहजतेने एकमेकांना अधिकाराने शेअर करणे हा सिन निव्वळ अफलातून आहे. ज्या कम्फर्ट लेव्हल ला पोचायला कुठल्याही कपल ला वर्षानुवर्षे लागू शकतात, तिथे हे कुठले दिव्य करून पोचले असतील याची कल्पना फक्त त्या 90 सेकंदाच्या सिन मध्ये येते.

घरात बापाचं दुसरं लग्न अन पुढचा तमाशा हतबल होऊन बघिल्यावर मुराद रात्री गच्चीवर येतो आणि वही घेऊन भावना उतरवत बसतो. –

इस बस्ती में सारी पलके गीली क्यों है,
दिन पथरीले रातें ज़हरीली क्यों है
क्यों बेबस है, झुंझुलाया है जो भी यहाँ है
क्यों लगता है ये बस्ती एक अंधा कुंवा है

– सकाळी उठतो तेव्हा आपल्यासोबत, घरात जे काही झालं असेल ते शेअर करावं म्हणून सफ़ीना ला ‘ब्रिज वर ये’ असा मेसेज टाकतो. तिथे पोचल्यावर सफ़ीना ‘क्या हुआ?’ विचारते आणि हा काहीच नाही असं म्हणत मान टाकतो. अर्ध्या मिनिटाच्या त्या मूक संवादात ती त्याच्या ओठावर हलकेच ओठ ठेवून निघून जाते. मुराद रात्री कुठल्या परिस्थितीतुन गेला असेल हे सगळं कळलंय आणि तरीही आपण ठामपणे सोबत आहोत हे दाखवण्याचा याहून गोड मार्ग कुठला असेल.

बरं सफ़ीना ला कुठे बोलावं आणि कुठे नाही हे, कुठे मुराद ला बोलतं करावं आणि कुठे गप्प हे देखील नेमकं कळतं. – टॉयलेट च्या खिडकीतून ‘ती’ आणि खाली पायरीवर बसलेला ‘तो’. दिवसभरात माझ्यासोबत काय विशेष घडलं असेल हे कौतुकाने सांगण्यासाठी मुराद येऊन बसतो. त्याला एवढं खुश बघून ती उत्सुकतेने म्हणते, ‘सब शुरू से बता।’ त्याला विश्वास देते की तू जे स्वप्न बघतोय ते बिनधास्त कर, मी आहे सोबत. तिला स्वतःच्या प्रायोरिटीज अन स्वाभिमान सांभाळून सुद्धा मुराद ला कुठेही कमीपणा जाणवू द्यायचा नाहीये. ‘क्या चाहिए तेरे को लाईफ में?’ ह्या मुराद च्या प्रश्नावर ती उत्तर देते –

– ‘मेरा खुद का प्रैक्टिस, तेरे से शादी’
– ‘अच्छा? मैं सेकंड हूं क्या?’ – मुराद
– ‘ज़िंदगी में कुछ अच्छा मिले ना, तो चुपचाप ले लेने का.’

कितीही मधुर असले तरी गरम मऊ गुलाबजाम वर चमचा ठेवावा अन त्या चमच्याच्या वजनाने त्याचे दोन तुकडे व्हावे, असं प्रमाण फार क्वचित वेळा जुळून येतं. ते तयार करणारे हात नेहमीचे असले तरीही. नायक नायिकेचा एकमेकांबद्दल डोळ्यातून झिरपणारा विश्वास-कौतुक-प्रेम-अभिमान आणि जोडीला असे संवाद हे सगळं दिवास्वप्न वाटावं इतकं परफेक्ट जुळून आलय. विजय मौर्य चे संवाद इथे जान आणतात. ड्रायव्हर मुराद रात्रभर गाडीत थांबणार ह्या बद्दल हळहळ न करता त्याला तिथे मुव्ही बघायला मिळावा म्हणून स्वतःकडचा ipad अजिबात विचार न करता सफ़ीना कायमसाठी हातात देते. ओशाळून मुराद म्हणतो, ‘मैं तेरे को ऐसा कुछ नहीं दे सकता है.’

मुराद चा स्वाभिमान सांभाळत त्याला गप्प करण्यासाठी ती त्याच्या ओठांवर ओठ नेत बोलते,

– ‘मैं जैसी हूं वैसे रहने देता है तू, तेरे से महँगा और कुछ नहीं है मेरे लाईफ में!’

असं असलं तरी मुराद ला तिने कधीच गृहीत धरलेलं नाहीये. आणि हे नातं टिकवण्यासाठी ती वेळप्रसंगी काहीही करायला तयार आहे. मुराद च्या मागे असलेल्या एका मुलीसोबत मारामारी करायला, कुणाचं डोकं फोडायला ती अजिबात कचरत नाही. उलट कुठलाही गंड न बाळगता सांगते की, ‘तू शुकर कर उसकी गर्दन नहीं तोड़ी मैं. अभी एक ही लाईफ है, एक ही तू है, ऊपर से वो घुस रही है बीच में… गुस्सा नहीं आएगा क्या?’ मुराद ला दुसऱ्या मुलीसोबत काम करताना बघून सुद्धा तिचा जीव खाली वर होतो. मुराद कल्की सोबत म्युजिक ची तयारी करतोय हे समजल्यावर ती, ‘अब तू इससे कनेक्ट हो गया है, म्यूजिशियन हो गया है? और तेरा एग्झाम?’ असे विचारत जो चेहरा करते तो केवळ अवर्णनीय. 5-6 वर्षाच्या लहान मुलाला आपल्या घरात भाऊ येणार आणि आपल्यावरचं प्रेम कमी होणार असं जेव्हा समजणार असतं तेव्हा ते लहान मूल सुद्धा बिथरणार नाही इतकी सफ़ीना प्युअर मनाने तळमळते. मुराद सोबत थोडे खटके उडाल्यानंतर सुद्धा पुन्हा जवळ येण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न तिला करायचे आहे.मानपमान बाजूला ठेवून. ‘रॅप बॅटल’ मध्ये 2 राऊंड क्लियर झाल्यावर मुराद ला पुढे काय वाढून ठेवलय हे माहीत नाहीये. त्याला जवळ घेऊन सफ़ीना विश्वास देते,‘तेरे को जो करनेका है कर, मैं सर्जन बनने जा रही हूं. अपन मस्त जियेंगे.’

‘मुराद’ नावाचा अर्थ होतो – अभिलाषा. इच्छा. ‘सफ़ीना’ म्हणजे जहाज. बोट.

रणबीरला म्युजिक व्हिडिओ साठी मदत करणाऱ्या कल्की चं सिनेमातील नाव आहे ‘स्काय’. धारावी च्या वस्तीत अन मुराद ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय ते माहीत असून त्याच्यातला हट्टीपणा, निरागसपणा सफ़ीना ने शाबूत ठेवलाय. आकाश सोडताना तिला सफ़ीना चं महत्त्व सांगताना मुराद म्हणतो, – ‘सफ़ीना के बिना मेरा ज़िंदगी ऐसे होएगा, जैसे बिना बचपन के बड़ा हो गया.’ असा जोडीदार ज्यांना मिळतो ते नशीबवान. त्याला/तिला सोबत घेऊन ‘गली बॉय’ बघून या. ‘एका अंडरडॉग ने परिस्थितीशी झगडून मिळवलेलं यश’ हा ह्या महाकाव्याचा फक्त एक पापुद्रा आहे. आत जाणार तसं बरच काही मिळेल. मला अजून काय हातात लागलं.

– जितेंद्र घाटगे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55592
सुप्रीम कोर्टाचा झटका …तर अनिल अंबानी तुरुंगात ! https://maharashtradesha.com/while-anil-ambani-is-in-jail/ Wed, 20 Feb 2019 11:56:46 +0000 https://maharashtradesha.com/?p=55584 टीम महाराष्ट्र देशा – रिलायन्स कम्युनिकेशन्सनं चार आठवड्यात थकवलेले ४५३ कोटी रुपये अनिल अंबानी यांनी भरावेत अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. देशातील दूरसंचार जाळे वापरण्यासंदर्भातील व्यवहारापोटी थकीत रक्कम व व्याज मिळून ५५० कोटी रुपये संदर्भात एरिक्सनने रिलायन्स कम्युनिकेशन्सला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. न्या. आर. एफ. नरिमन […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – रिलायन्स कम्युनिकेशन्सनं चार आठवड्यात थकवलेले ४५३ कोटी रुपये अनिल अंबानी यांनी भरावेत अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यास तयार रहावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

देशातील दूरसंचार जाळे वापरण्यासंदर्भातील व्यवहारापोटी थकीत रक्कम व व्याज मिळून ५५० कोटी रुपये संदर्भात एरिक्सनने रिलायन्स कम्युनिकेशन्सला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. न्या. आर. एफ. नरिमन आणि न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. एरिक्सन इंडियाच्या वतीने बाजूने विधिज्ज्ञ दुष्यंत दवे यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधातील दावा लावून धरला. कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी एरिक्सनच्या वकिलांचा मुद्दा सुनावणी दरम्यान अव्हेरला होता. या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.

कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्यूनिकेशन्सच्या दोन अधिकाऱ्यांना दोषी ठरवले. याशिवाय समुहातील तीन कंपन्यांना एक कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. चार आठवड्यांमध्ये हे पैसे बँकेत जमा करावे किंवा कंपनीच्या प्रमुखाला तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55584