Health – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Tue, 18 Dec 2018 11:07:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.1 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Health – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 चौकशीचा फार्स कशाला, थेट अटक करा;नवाब मलिक यांची मागणी https://maharashtradesha.com/nawab-malik-on-esic-hospital-issue/ Tue, 18 Dec 2018 10:21:51 +0000 https://maharashtradesha.com/?p=49736 devendra fadnvis and nawab malik

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र चौकशी करण्याची गरज नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कामगार रुग्णालयाचे डायरेक्टर जनरलच या घटनेला जबाबदार आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
devendra fadnvis and nawab malik

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र चौकशी करण्याची गरज नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कामगार रुग्णालयाचे डायरेक्टर जनरलच या घटनेला जबाबदार आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान,मुंबईतील अंधेरी इथल्या इ.एस.आय.सी.च्या कामगार रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा आता 8 झाला आहे. यात जखमी झालेल्या इतर 176 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
49736
वंध्यत्व म्हणजे काय ? वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते? मुल होण्यासाठी किती वर्षे वाट बघावी? https://maharashtradesha.com/how-many-years-should-wait-for-a-child/ Thu, 29 Nov 2018 11:12:38 +0000 https://maharashtradesha.com/?p=48523

वंध्यत्व म्हणजे काय ? मुल न होण्याचा अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात. ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टीलिटी म्हणतात व ज्या स्त्रीला एकदा मुल झाले असताना , पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकारला सेकंडरी इन्फर्टीलिटीअसे म्हणतात. वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते? स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंधातून गर्भाची निर्मिती […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

वंध्यत्व म्हणजे काय ?

मुल न होण्याचा अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात. ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टीलिटी म्हणतात व ज्या स्त्रीला एकदा मुल झाले असताना , पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकारला सेकंडरी इन्फर्टीलिटीअसे म्हणतात.

वंध्यत्वाची समस्या किती जोडप्यांमध्ये असते?

स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंधातून गर्भाची निर्मिती होते. हाच गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रुजतो, वाढतो व ९ महिन्यानंतर बाळाच्या जन्म होतो. ह्या अगदी नैसर्गिक क्रियेमध्ये कोठेतरी अडथळा अथवा विकार असल्यास किंवा उत्पन्न झाल्यास गर्भधारणा होत नाही. सर्वसाधारणपणे १०% जोडप्यांमध्ये ही समस्या असते व त्यांच्या वाट्याला वंध्यत्व येते, जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization) च्या अनुमानाप्रमाणे संपूर्ण जगभरात वंध्यत्वाची समस्या ६००-८०० लाख जोडपी आहेत.

मुल होण्यासाठी किती वर्षे वाट बघावी?

स्त्री पुरुष यांच्यात लैंगिक संबंध आला कि, लगेच दिवस राहतात असे नाही किंबहुना दिवस राहण्याची नैसर्गिक शक्यता दर महिन्या जेम तेम १५- २०% च असते. त्यामुळे बहुतेक जोडप्यांना मुल होण्यसाठी काही महिने प्रयत्न करावे लागतात. अति उत्तम प्रजनन क्षमता असणाऱ्या जोडप्याला सुद्धा दिवस राहण्यासाठी ५ ते ६ महिन्यांचा काळ लागतो व एका वर्ष अखेरीस ८०% – ९०% जोडप्याच्या प्रयत्नांना यश येते व स्त्रीला दिवस जातात एका वर्षच्या प्रयत्नांनंतर सुद्धा जर दिवस राहत नसतील तर डॉक्टरांच्या तपासणी व सल्ल्याची गरज असते.

मुल होण्यासाठी फक्त पत्नीनीच तपासणी केली तर चालेल का ?

नाही, कारण मुल न होण्यासाठी पुरुषांमधील २५% कारणे असू शकतात व २५% जोडप्यांमध्ये दोघांमध्ये दोष आढळतात. त्यामुळे पती पत्नीने एकत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

गर्भ कसा निर्माण होतो ?

गर्भ निर्मितीसाठी प्रामुख्याने तीन गोष्टी लागतात १) पुरुष बीज(SPERM) २) स्त्री बीज(OVUM, EGG) ३) पुरुष – स्त्री बीजाचे मिलन, पुरुष व स्त्री बीजाचे मिलन गर्भनलिकेत मध्ये होते व त्यामधून निर्माण झालेला गर्भ गर्भाशयात सरकावला जावून गर्भाशयात रुजतो. गर्भाशयात त्याचे पोषण होवून वाढतो आणि संपूर्ण वाढ झाल्यास बाळाचा जन्म होतो.

स्त्री व पुरुष यांच्यातील दोष शोधण्यासाठी कोणत्या तपासण्या डॉक्टर करतात?

स्त्री व पुरुष: दोघांची संपूर्ण वैद्यकीय व लैंगिक माहिती व शारीरिक तपासणी, लॅबोरेटरी तपासण्या – Hemogram, Urine,VDRL,HbsAg, BSL-F &PP, Blood Gruop दोघांची तपासणी करावी लागते.

स्त्री – गर्भाशय गर्भनलिका व स्त्रीबीजकोश यांच्या तपासण्या (Evaluation of Uterus, Tubes, Ovarien & Peritonial Factors), व्हजायनल सोनोग्राफी (Vaginal Sonography) गर्भाशय स्त्रीबीजकोष ब स्त्रीबीजाच्या वाढीसंबंधी तपासणी व्हीडीओ हिस्ट्रोस्कोपी (Video Laproscopy), गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजकोष , कोष व पोटातील इतर अवयवांची तपासणी .

पुरुष – वीर्य तपासणी (semen anlaysis), सोनोग्राफी (scrotal sonography), डॉपलर तपासणी(dopppler), रक्तातील हार्मोन्स तपासणी(Harmonal Test FSH, LH,Prolactin,Testosterone), पुरुषबीजाकोषाच्या तुकड्याची तपासणी (Testicular Biopsy). (पुरुषांच्या वीर्याची तपासणी करताना खालील सुचना महत्वाच्या आहेत. १) वीर्य तपासणी आधी ३ ते ४ दिवस संबंध ठवू नये.२) निर्जंतुक बाटलीमध्ये वीर्य गोळा करणे.३) अर्ध्या तासाच्या आत वीर्य लॅबोरेटरीमध्ये पोहचणे आवश्यक)

IUI (Intra Uterine Insemination) म्हणजे काय ?

यात गर्भ पिशवीच्या आत वीर्य Canula ने सोडले जाते. स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या किंवा इंजेक्शन देवून अंडाशयात अंडी तयार करतात. त्याची फॉलीक्युलर स्टडी करून IUI केले जाते. पतीच्या शुक्र जंतूची संख्या कमी असल्यास या पद्धतीमुळे फायदा होवून गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.

टेस्ट ट्यूब बेबी (IVF) म्हजे काय?

टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात. पाळीच्या २० व्या दिवसापासून इंजेक्शन सुरु होतात. जी रोज २० ते २५ दिवस घ्यावी लागतात, मध्ये एक पाळी येते व दुसऱ्या दिवसापासून स्त्री बीजकोशात स्त्री बीज तयार होण्यासाठी इंजेक्शन सुरु होतात. पाळीच्या ९ व्या दिवसापासून फॉलीक्युलर स्टडी करून स्त्री बीजकोशातील फॉलीक्युल्सची वाढ १८ मि. मि पेक्षा जास्त झाल्यावर इंजेक्शन देवून ३६ तासांनी तयार झालेले स्त्री बीज स्त्री बीजकोशातून सोनोग्राफीच्या सहाय्याने सुईने बाहेर काढतात. स्त्री बीज व पुरुष बीज यांचे IVF लॅबमध्येमिलन घडवून आणले जाते व तयार झालेला गर्भ तीन दिवसांनंतर गर्भाशयात सोडला जातो. ९ महिने त्याची वाढ होते व नंतर बाल जन्माला येते.

साधारणपणे खालील निदान असेल तर टेस्ट ट्यूब बेबी (IVF) या प्रक्रियेची गरज लागू शकते.

१) दोन्हीही गर्भनलिका बंद असणे किंवा गर्भनलिकेला जंतुसंसर्ग होणे.

२) Grade III अथवा Grade IV Endometriosis चा आजार असणे.

३) पुरुष बीजांची संख्या अतिशय कमी असणे.

४) वारंवार IUI प्रक्रिया करूनही गर्भ न राहणे.

डॉ. राहुल वीर.(MBBS,DGO,DNB)
ज्योतिबानगर , काळेवाडी पुणे.
संपर्क:-84 32 32 1414
97 65 46 7271

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
48523
शाकाहाराच्या शपथेची ‘गोल्डन बुक’मध्ये नोंद https://maharashtradesha.com/the-statement-of-the-vegetarian-oath-of-golden-book/ Tue, 09 Oct 2018 07:25:12 +0000 https://maharashtradesha.com/?p=47275

पुणे : शाकाहार, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतल्याची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ॐ गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : शाकाहार, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतल्याची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ॐ गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी ९३,५५० लोकांना शाकाहाराची शपथ दिली होती. एकाचवेळी जवळपास लाख लोकांनी शाकाहाराचा संकल्प करण्याच्या या घटनेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. सादर कार्यक्रमाला जगभरातील २०० पेक्षा अधिक संत उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘शाकाहारासाठी केलेल्या या संकल्पाची नोंद जागतिक स्तरावर झाल्यामुळे आनंद वाटतो. सुखी जीवनासाठी शाकाहार आणि व्यसनमुक्ती अतिशय गरजेची आहे. धार्मिक उत्सवात आपण व्यसनमुक्ती व शाकाहाराचे पालन करतो. विज्ञानानेही शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आहार असल्याचे सिद्ध केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शाकाहाराला पर्याय नाही. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील.’

फॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47275
पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही; केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाकडून खुलासा https://maharashtradesha.com/central-government/ Wed, 03 Oct 2018 13:22:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=47068

ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान, उद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, भारतामध्ये जागतिक […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान, उद्या दिल्ली येथे याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार पोलिओच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करत असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 45 ठिकाणांहून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. देशातील पाच मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये ते तपासण्यात आले असून सांडपाण्यासोबतच विष्ठा नमुने देखील नियमितपणे तपासण्यात येतात. दरवर्षी साधारणतः 75 हजार विष्ठा नमुने तपासण्यात येतात.

पोलिओ लसीकरणांतर्गत करण्यात आलेल्या लसीकरणामुळे बालकांना कुठल्याही प्रकारच्या जोखीमीचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत असून ज्या कंपनीच्या पोलिओ लसीच्या उत्पादनात हा विषाणू आढळून आला त्याचा वापर केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात थांबविण्यात आला आहे.

भारतामध्ये शेवटचा पोलिओ रुग्ण दि.13 जानेवारी 2011 मध्ये सापडला होता त्यानंतर तीन वर्ष एकही रुग्ण दाखल झाला नाही, त्यामुळे 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले. मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात सांडपाणी व विष्ठा नमुन्यांमध्ये पोलिओच्या टाईप टू चे विषाणू सापडले. याबाबत केलेल्या छाननीअंती हे विषाणू पोलिओ टाईप 2 लसीमध्ये मध्ये आढळल्याचे निदर्शनास आले आहे. जगा मधून टाईप टू असलेली पोलिओ लस वापरण्याचे एप्रिल 2016 पासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नियमित लसीकरण कार्यक्रम तसेच पोलिओ लसीकरण मोहीमांमध्ये t OPV (ज्यामध्ये पोलिओचे टाईप एक-दोन-तीन विषाणू असतात) या लसी ऐवजी b OPV (ज्यामध्ये पोलिओचे टाइप 1 व 3 विषाणू असतात) ही लस वापरण्यात येत आहे. t OPV मध्ये असलेल्या तीन प्रकारच्या विषाणूंमुळे टाईप एक, दोन आणि तीन या वाइल्ड विषाणूंपासून बालकांचे संरक्षण होते. b OPV या लसी मध्ये दोन प्रकारचे विषाणू असतात आणि त्यामुळे टाइप 1 आणि 3 या वाईल्ड पोलिओ विषाणूंपासून संरक्षण मिळते. जागतिक स्तरावर टाइप 2 या वाइल्ड पोलिओ विषाणूचे निर्मूलन झाल्यानंतर b OPV लस वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार देशात पोलिओच्या लसीकरण मोहिमा b OPV लसीचा वापर करून राबविण्यात येत आहेत. 2018 मध्ये दोन राष्ट्रीय मोहिमा व इतर मोहिमा राबविल्या गेल्या आहेत. त्यामध्ये बी ओपीव्हीचा (तोंडावाटे) वापर करण्यात आला.

टाईप टू पोलिओ विषाणू आढळल्यानंतर केंद्र शासनाच्या चमूने तपासणी केलेली असून त्यात एका कंपनीने तयार केलेल्या b OPV च्या कुप्यांमध्ये टाईप दोन प्रकारच्या लसीत विषाणू आढळून आला. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीचा वापर थांबण्याचा निर्णय 10 सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यानुसार राज्यातही दिनांक 11 सप्टेंबर पासून या लसीचा वापर थांबविण्यात आलेला आहे. केंद्र शासन हा विषय जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने गांभीर्याने हाताळत आहे. राज्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
47068
मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली ? :महेश झगडे https://maharashtradesha.com/pharmasist-against-online-medicine/ Fri, 28 Sep 2018 04:27:42 +0000 https://maharashtradesha.com/?p=46813

पुणे : भारतातातील औषध बाजार हा १ लाख २० हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली ? असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी आज विचारला . ‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘ऑन लाईन औषध विक्री -योग्य की अयोग्य ‘या गाजत असलेल्या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : भारतातातील औषध बाजार हा १ लाख २० हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली ? असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी आज विचारला .

‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘ऑन लाईन औषध विक्री -योग्य की अयोग्य ‘या गाजत असलेल्या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . गुरुवार, दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हे चर्चासत्र पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे झाले ,त्यात झगडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले .

महेश झगडे म्हणाले ,’औषध विक्री आणि त्याबाबाबतचे कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही . ऑनलाईन औषध विक्री ला परवानगी देण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते . गुटखा वाईट असून तो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो ,हे कळायला ३० वर्षे गेली ,ऑनलाईन औषध विक्रीच्या बाबतीत ३० वर्षांनी तसेच काही दुष्परिणाम ऐकायला मिळाल्यास तेव्हा काय करणार ? कोटयावधी प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन कशी तपासणार ? या प्रश्नी औषध विक्रेत्या संघटना ,नागरिक ,ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या असून रुग्णांच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांची तर वानवाच आहे ‘अशी खंत झगडे यांनी व्यक्त केली .
हे चर्चासत्र उच्चस्तरीय सरकारी आस्थापनांनी का आयोजित केले नाही ? असा सवालही त्यांनी केला . अन्न आणि औषध प्रशासन तसेच संबंधित सरकारी संस्था या विकलांग झालेल्या संस्था आहेत ,असेही ते म्हणाले .‘पुणे महानगर परिषद‘चे निमंत्रक गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले . महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले .

यावेळी या चर्चासत्रात माजी आयुक्त (अन्न औषध प्रशासन ) महेश झगडे, हदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, जनरल प्रॅक्टीशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर,सायबर क्राईम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पेठ कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ऑनलाईन औषध विक्रेते ईझी फार्मा चे संचालक अनिकेत बोरा, आऊटसोर्सिंग प्रायव्हेट एस. वाय.एस. लॉजिक लिमिटेड चे संचालक समीर गोडबोले यांचा सहभाग होता .

औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील म्हणाले ,’समाजाचे आरोग्य ऑनलाईन औषध विक्री मुळे बिघडणार असून यासंबंधी औषध विक्रेत्यांचा २८ तारखेचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले .

सूर्यकांत पाठक म्हणाले ,’ऑनलाईन विक्रीच्या निमित्ताने परकीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करीत असून मूठभरांच्या हातात तसेच अंबानी -अदाणींच्या हातात सर्व सत्ता द्यायची आहे का ? त्यातून त्यांनी पुढे किमती वाढविल्यास कोण रोखणार ? ऑनलाईन मुळे बेरोजगारीही वाढेल याचा धोका आहे .

डॉ . ऋतुपर्ण शिंदे म्हणाले ,’फार्मासिस्ट हे व्यावसायिक तज्ज्ञ असतात त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवता येतो . मात्र ,डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन ला चोरूनही ऑनलाईन खरेदी शक्य असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे . ऑनलाईन खरेदीतून रुग्णाला कमी पैशात औषधे मिळणार असतील तर विरोध नाही मात्र त्यांची विश्वासार्हता तपासावी लागणार आहे .

ऑनलाईन औषध विक्री प्रतिनिधी अनिकेत बोरा म्हणाले ,’ज्या ग्राहकांना जुनाट विकार आहेत आणि दरमहा ठरलेली औषधे घ्यावी लागतात,अशाना ऑनलाईन चा फायदा होऊ शकतो . खात्रीने ,ठरलेल्या वेळी औषधे मिळतील . ऑनलाईन विक्रेते देखील शासनाकडूनच प्रमाणित असतात ,आणि प्रशिक्षित असतात ,याकडेही त्यांनी लक्ष वेधले .

वैजनाथ जागुष्टे म्हणाले ,’तातडीच्या औषध सेवेसाठी शेजारच्या औषध विक्री दुकानाशिवाय पर्याय नाही . ऑनलाईन विक्रेते बेकायदेशीरपणे ,विना प्रस्क्रिप्शन औषधे भरमसाठ सवलतीत विकण्याची श्यक्यता नाकारता येत नाही ‘

चर्चासत्राचे संयोजन समिती सदस्य गणेश सातपुते (अध्यक्ष),महेश पाटील (कार्याध्यक्ष), संतोष पाटील (उपाध्यक्ष), किरण बराटे (उपाध्यक्ष), योगेश खैरे (योगेश खैरे), केदार कोडोलीकर (सरचिटणीस), संजय दिवेकर (खजिनदार), अनिरुद्ध खांडेकर (सहखजिनदार), दत्तात्रय जगताप (चिटणीस),  राजेश तोंडे (चिटणीस) उपस्थित होते .औषध विक्री क्षेत्रातील मान्यवर ,विक्रेते तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46813
भाजपा प्रणित औषध विक्रेत्यांच्या संघटनेचा ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात एल्गार… https://maharashtradesha.com/mla-narendra-pawar-news/ Wed, 26 Sep 2018 05:22:11 +0000 https://maharashtradesha.com/?p=46740

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्ष प्रणित अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. सध्या ऑनलाइन व्यवसाय तेजीत आहे.ग्राहकांना घर बसल्या सर्व वस्तू अगदी सहज उपलब्ध होत […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय जनता पक्ष प्रणित अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने एका बैठकीचे आयोजन काल करण्यात आले होते.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात लढा तीव्र करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

सध्या ऑनलाइन व्यवसाय तेजीत आहे.ग्राहकांना घर बसल्या सर्व वस्तू अगदी सहज उपलब्ध होत आहेत.त्याच धर्तीवर गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन औषध विक्रीचा व्यवसायही तेजीत आहे.कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना,कुठलेही नियम न पळता सर्रासपणे ऑनलाईन औषध विक्री करण्यात येत आहे.बऱ्याचदा याचा गैरवापर होताना दिसत असून बंदी असणारी औषधे,उत्तेजक औषधे आणि चक्क ड्रग्स ही या व्यवसायाआडून विक्री होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे.या ऑनलाईन विक्रीवर शासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याने अनेकदा लहान मुले,तरुण आरोग्यास घातक अशी ओषधे घरपोच मागवतात त्यामुळे ती अगदी सहजगत्या उपलब्ध होतात.त्यामुळेच समाजस्वाथ्याच्या दृष्टीने ऑनलाइन औषध विक्री अत्यन्त घातक असून शासनाने तात्काळ यावर लगाम घालावा अशी सर्वानुमते मागणी या बैठकीत उपस्थित असणाऱ्या औषध विक्रेत्यांनी केली.काही औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी या विरोधात येत्या 28 सप्टेंबर रोजी आपली दुकाने बंद ठेऊन शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.मात्र आमदार नरेंद्र पवार यांनी याला कडाडून विरोध दर्शविला आहे.

ऑनलाईन औषध विक्री च्या विरोधात लढा योग्य आहे.मात्र औषधे ही अत्यंत जीवनावश्यक वस्तू आहे.औषधे ही जीवन मरणाचा प्रश्न असल्याने आपली दुकाने बंद ठेवली आणि एखाद्या रुग्णास तातडीचे औषध मिळाले नाही तर त्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळणे अयोग्य असल्याचे परखड पणे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.एखादा बंद असेल किंवा एखाद्या ठिकाणी ताणावाचे वातावरण असेल किंवा अगदी दंगलसदृश्य स्थिती असेल तेव्हाही औषधविक्रीची दुकाने सुरू असतात कारण ही अत्यंत तातडीची आणि जीवनावश्यक महत्वाची अशी सेवा आहे.त्यामुळेच औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेऊ नये असे आवाहन आमदार नरेंद्र पवार यांनी केलं.आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे.त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल.या प्रश्नी औषध विक्रेत्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण या लढाईत सामील असल्याचा विश्वासही त्यांनी औषध विक्रेत्यांना दिला.लवकरच या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची भेट घेणार असल्याचंही आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं.

आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसम्पर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सहअध्यक्ष तुषार मोरे,जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल महाडिक,विनीत मोरे,प्रताप टुमकर आणि डॉ.श्याम पोटदुखे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि औषध विक्रेते उपस्थित होते..
दरम्यान आमदार नरेंद्र पवार यांनी दुकाने बंद न ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला औषध विक्रेत्यांनीही प्रतिसाद दिला असून अंबरनाथ केमिस्ट असोसिएशनने या लढ्यात सामील होऊन दुकाने बंद न ठेवण्याचे निश्चित केले आहे..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46740
‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’ : आठवले https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-funny-poem-on-girish-bapat/ Mon, 24 Sep 2018 05:20:13 +0000 https://maharashtradesha.com/?p=46679

पुणे : आपल्या विनोदी आणि शीघ्र कवितांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची काल एका कार्यक्रमात आपल्या शैलीत स्तुती केली. ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट अशी २ ओळींची कविता करत आठवले यांनी बापट यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

पुणे : आपल्या विनोदी आणि शीघ्र कवितांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची काल एका कार्यक्रमात आपल्या शैलीत स्तुती केली. ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट अशी २ ओळींची कविता करत आठवले यांनी बापट यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे.

काल जिल्हाधिकारी कार्यालयात आठवले आणि गिरीश बापट यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’ चा लाभ गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
कार्यक्रमास खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, डॉ. अमोल म्हस्के आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, औषधांऐवजी, पैशांअभावी एखाद्याचा मृत्यू होऊ नये,यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेमुळे राज्यातील 83 लाख 72 हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गरीबांच्या भल्यासाठी ही योजना असून आपण सर्वांनी गरीबांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी गरीब आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शासनाच्या योजना असल्याचे सांगून गरीबांपर्यंत या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन केले. आपल्या यशामागे‘एक कार्यकर्ता- दहा लाभार्थी’ हे सूत्र असल्याचे नमूद करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी एकदिलाने काम करावे, हे एक मिशन आहे,असे समजून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. गरीब माणंसाची सेवा केली तर त्यासारखा आनंद व सुख कशातही नाही, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम होणार असून गरीब माणसांसाठी आशा निर्माण करणारी योजना आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार 83 लाख 72 हजार लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात 4 लक्ष 57 हजार 28 कुटुंबांना त्याचा लाभ मिळेल. त्यामध्ये शहरातील 2 लाख 77 हजार 633 तर ग्रामीण भागातील 1 लाख 79 हजार 395 कुटुंबांचा समावेश आहे. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थी डाटा एंट्रीचे राज्यात सर्वात चांगले काम पुणे जिल्ह्यात झाले असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर यांनी सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असल्याचे सांगितले. प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यात आयुष्मान भारत योजनेसोबतच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रितरित्या राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

• केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी आपल्या काही भावना काव्यातून व्यक्त केल्या. पालकमंत्री गिरीश बापटांविषयी ते म्हणाले, ‘ज्यांचा स्वभाव नाही तापट, त्यांचे नाव आहे गिरीश बापट’
• ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’बाबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, ‘तू आता बरा होशील सजना, कारण सुरु झाली आहे प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, भारतकी यह है योजना आयुष्मान, सारे देश का है उसपे ध्यान, गरीबो के भलाई का है एनडीए के पास ग्यान,इसलिए प्रधानमंत्री मोदी है सारे देशकी शान’

हात जोडून विनंती करतो शांततेत आंदोलन करा – बापट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46679
मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडली; एम्समध्ये दाखल https://maharashtradesha.com/today-manohar-parrikar-to-shifted-in-delhis-aiims-hospital/ Sat, 15 Sep 2018 06:43:21 +0000 https://maharashtradesha.com/?p=46241

टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज विशेष विमानाने पर्रिकर दिल्लीला रवाना झाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. पर्रिकर यांना शुक्रवारी कोंडोलीम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर पर्रीकर ६ सप्टेंबरलाच अमेरिकेतून उपचार घेऊन पणजीला परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज विशेष विमानाने पर्रिकर दिल्लीला रवाना झाले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. पर्रिकर यांना शुक्रवारी कोंडोलीम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनोहर पर्रीकर ६ सप्टेंबरलाच अमेरिकेतून उपचार घेऊन पणजीला परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सरकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते अशीही माहिती समोर आली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46241
डायबेटीस आणि जीवनशैली यांचे महत्व सांगणारा वाचनीय लेख https://maharashtradesha.com/diabetes-and-lifestyle/ Fri, 14 Sep 2018 10:44:36 +0000 https://maharashtradesha.com/?p=46213 Diabetes and Lifestyle

जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाल्यापासून गेल्या ४० – ५० वर्षात जीवनशैलीशी संबंधित रोगांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषतः डायबेटीस बाबत भारत जगात अग्रगण्य ठरणार आहे. अर्थातच ही गोष्ट भारताला नक्कीच भूषणावह नाही. परंतु जीवनशैलीच्या मुळापर्यंत जावून ती बदलवून, या रोगाला रोखण्याची मानसिकता कोणाचीच नाही. नाही म्हणायला या संधीचा फायदा घेऊन आपली औषधे खपविण्यासाठी औषधी कंपन्यांनी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
Diabetes and Lifestyle

जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाल्यापासून गेल्या ४० – ५० वर्षात जीवनशैलीशी संबंधित रोगांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषतः डायबेटीस बाबत भारत जगात अग्रगण्य ठरणार आहे. अर्थातच ही गोष्ट भारताला नक्कीच भूषणावह नाही. परंतु जीवनशैलीच्या मुळापर्यंत जावून ती बदलवून, या रोगाला रोखण्याची मानसिकता कोणाचीच नाही. नाही म्हणायला या संधीचा फायदा घेऊन आपली औषधे खपविण्यासाठी औषधी कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या जाहिरातींचा भडीमार जोरात चालू आहे.
लवकर निदान करून आधुनिक वैद्यकाच्या औषधाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली, म्हणजे आपण डायबेटीस वर विजय मिळवला, अशीच सर्वसामान्यांची धारणा आहे. त्यामुळे रक्तातील साखरेच्या आकड्यांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी डायबेटीस आतून शरीर पोखरतच राहतो आणि डोळे, किडनी यासारख्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होऊन अनेक उपद्रवांना सामोरे जावे लागते. तांत्रिक उपचारांनी आधुनिक वैद्यक हे उपद्रव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि त्यालाच योग्य उपचार असे समाज आणि वैद्यक व्यावसायिकही समजतात. यापेक्षा आणखी शोकांतिका काय असू शकते? तेंव्हा समाजाची मानसिकता बदलणे हेच या ठिकाणी मोठे आव्हान आहे.
वास्तविक मानवप्राणीच एक असा निघाला की ज्याने निसर्गावर कुरघोडी केली आणि निसर्गानियमात स्वतः तर ढवळाढवळ केलीच, पण अन्य पशु, पक्षी, वनस्पती यांनाही त्याचे परिणाम भोगायला लावले. विजेच्या शोधाने आणि वापराने रात्रीचा दिवस झाला. रात्री उशीरा जेवणे, उशीरापर्यंत जागे राहणे, उशीरा झोपणे, सकाळी सूर्योदयानंतर उशीरा उठणे या गोष्टी समाजाच्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत, की यात आपले काहीतरी चुकते आहे, याची जाणीवच राहिलेली नाही.

याही पेक्षा मोठी कुरघोडी म्हणजे पारंपारिक, नैसर्गिक शेतीतील आमूलाग्र बदल ! हजारो वर्षे नैसर्गिक पद्धतीने शेती केली जात होती. वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी यांचा त्यात समतोल साधला जात होता. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने याच्या मुळावरच घाव घातला गेला. तथाकथित दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायींची संकरित जात निर्माण करण्यात आली. अशा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून कन्सर, डायबेटीस, ऑटिझम यासारखे आजार वाढू लागले. शेतीतील  तंत्रज्ञानामुळे बैलांची गरज राहिली नाही. सेंद्रीय खतांचा ओघ आटला. त्याला पर्याय म्हणून रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर सुरु झाला आणि सर्व सृष्टी विषमय झाली!

फार थोड्या लोकांना यातून होणाऱ्या विनाशाची जाणीव झाली. त्यातून पर्यावरणवादाची चळवळ उभी राहिली. परंतु अजूनही बहुतांश समाज या बाबतीत अडाणी आणि उदास आहे. हे सर्व चित्र बदलावयाचे असेल, तर पुन्हा नैसर्गिक जीवनशैलीकडेच वळावे लागेल.

वैद्य दिलीप गाडगीळ – 07767999336 / 07767999335

महत्त्वाचे – 

आरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय

आरोग्यम् धनसंपदा : आयुर्वेद सर्वांसाठी

Rainy Season And Ayurveda : आला पावसाळा तब्येत सांभाळा !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
46213
पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार https://maharashtradesha.com/manohar-parrikar-will-leave-america-medical-treatment/ Wed, 29 Aug 2018 05:53:20 +0000 https://maharashtradesha.com/?p=45563

टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेत जाणार आहेत. येत्या 24 तासांमध्ये पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे. मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते, मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर 22 जुलैला सायंकाळी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>

टीम महाराष्ट्र देशा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेत जाणार आहेत. येत्या 24 तासांमध्ये पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते, मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत.

मुख्यमंत्री पर्रीकर 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले.

दुसऱ्या दिवशी त्यांना कोन्सटीपेशन झाले. तसेच उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मनोहर पर्रिकरांच्या विरुद्ध तरुणींची मोहीम; हो आम्ही बिअर पितो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
45563