Entertainment – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Thu, 21 Feb 2019 14:43:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Entertainment – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314 आपल्या देशाची लायकी काय ते मी अनुभलंय, पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल https://maharashtradesha.com/i-have-seen-what-the-country-deserves/ Thu, 21 Feb 2019 10:42:52 +0000 https://maharashtradesha.com/?p=55669 टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४९ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता. इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात काम केलेली […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४९ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानची जगात लायकी काय आहे हे मला कळलंय, ते मी अनुभवलंय असं म्हणत सबा या व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आता सबाचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सबाने काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने पाकिस्तानींना जगात कशी वागणूक दिली जाते, पाकिस्तानींची लायकी काय आहे याबाबत सांगितले होते. ‘आपण पाकिस्तानी असल्याने पाकिस्तान झिंदाबादचा नारा देतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो. तेव्हा आपण पाकिस्तानी असल्यामुळे ज्या प्रकारे आपली तपासणी होते ते सांगूही शकत नाही. एकदा एका चित्रपटासाठी परदेशात गेले होते. तेव्हा चेकिंगच्यावेळी माझ्यासोबत असलेल्या भारतीय क्रूची फार तपासणी न करता त्यांना पाठवून दिलं. मला मात्रं त्यांनी बसवून ठेवलं. मी पाकिस्तानी म्हणून माझी ज्या प्रकारे तपासणी झाली ते फार लज्जास्पद होतं’, असं सांगत सबा ढसाढसा रडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55669
‘गली बॉय’मधील मुराद-सफ़ीनाचं नातं सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक https://maharashtradesha.com/murad-and-safina-is-one-of-the-best-chemistry-in-bollywood/ Wed, 20 Feb 2019 12:35:55 +0000 https://maharashtradesha.com/?p=55592 गली बॉय मध्ये दाखवलेलं मुराद आणि सफ़ीनाचं नातं हे मी आजवर बॉलीवूडमध्ये बघितलेल्या सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक आहे. एकमेकांशी अजिबात ओळख नसलेल्या स्वतंत्र एंटिटी सारखा बसमध्ये असलेला वावर आणि पुढच्याच क्षणाला सीट, इअरफोन शेअर करत एकमेकांच्या हातात हात घेऊन सहजतेने एकमेकांना अधिकाराने शेअर करणे हा सिन निव्वळ अफलातून आहे. ज्या कम्फर्ट लेव्हल ला पोचायला कुठल्याही […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
गली बॉय मध्ये दाखवलेलं मुराद आणि सफ़ीनाचं नातं हे मी आजवर बॉलीवूडमध्ये बघितलेल्या सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक आहे.

एकमेकांशी अजिबात ओळख नसलेल्या स्वतंत्र एंटिटी सारखा बसमध्ये असलेला वावर आणि पुढच्याच क्षणाला सीट, इअरफोन शेअर करत एकमेकांच्या हातात हात घेऊन सहजतेने एकमेकांना अधिकाराने शेअर करणे हा सिन निव्वळ अफलातून आहे. ज्या कम्फर्ट लेव्हल ला पोचायला कुठल्याही कपल ला वर्षानुवर्षे लागू शकतात, तिथे हे कुठले दिव्य करून पोचले असतील याची कल्पना फक्त त्या 90 सेकंदाच्या सिन मध्ये येते.

घरात बापाचं दुसरं लग्न अन पुढचा तमाशा हतबल होऊन बघिल्यावर मुराद रात्री गच्चीवर येतो आणि वही घेऊन भावना उतरवत बसतो. –

इस बस्ती में सारी पलके गीली क्यों है,
दिन पथरीले रातें ज़हरीली क्यों है
क्यों बेबस है, झुंझुलाया है जो भी यहाँ है
क्यों लगता है ये बस्ती एक अंधा कुंवा है

– सकाळी उठतो तेव्हा आपल्यासोबत, घरात जे काही झालं असेल ते शेअर करावं म्हणून सफ़ीना ला ‘ब्रिज वर ये’ असा मेसेज टाकतो. तिथे पोचल्यावर सफ़ीना ‘क्या हुआ?’ विचारते आणि हा काहीच नाही असं म्हणत मान टाकतो. अर्ध्या मिनिटाच्या त्या मूक संवादात ती त्याच्या ओठावर हलकेच ओठ ठेवून निघून जाते. मुराद रात्री कुठल्या परिस्थितीतुन गेला असेल हे सगळं कळलंय आणि तरीही आपण ठामपणे सोबत आहोत हे दाखवण्याचा याहून गोड मार्ग कुठला असेल.

बरं सफ़ीना ला कुठे बोलावं आणि कुठे नाही हे, कुठे मुराद ला बोलतं करावं आणि कुठे गप्प हे देखील नेमकं कळतं. – टॉयलेट च्या खिडकीतून ‘ती’ आणि खाली पायरीवर बसलेला ‘तो’. दिवसभरात माझ्यासोबत काय विशेष घडलं असेल हे कौतुकाने सांगण्यासाठी मुराद येऊन बसतो. त्याला एवढं खुश बघून ती उत्सुकतेने म्हणते, ‘सब शुरू से बता।’ त्याला विश्वास देते की तू जे स्वप्न बघतोय ते बिनधास्त कर, मी आहे सोबत. तिला स्वतःच्या प्रायोरिटीज अन स्वाभिमान सांभाळून सुद्धा मुराद ला कुठेही कमीपणा जाणवू द्यायचा नाहीये. ‘क्या चाहिए तेरे को लाईफ में?’ ह्या मुराद च्या प्रश्नावर ती उत्तर देते –

– ‘मेरा खुद का प्रैक्टिस, तेरे से शादी’
– ‘अच्छा? मैं सेकंड हूं क्या?’ – मुराद
– ‘ज़िंदगी में कुछ अच्छा मिले ना, तो चुपचाप ले लेने का.’

कितीही मधुर असले तरी गरम मऊ गुलाबजाम वर चमचा ठेवावा अन त्या चमच्याच्या वजनाने त्याचे दोन तुकडे व्हावे, असं प्रमाण फार क्वचित वेळा जुळून येतं. ते तयार करणारे हात नेहमीचे असले तरीही. नायक नायिकेचा एकमेकांबद्दल डोळ्यातून झिरपणारा विश्वास-कौतुक-प्रेम-अभिमान आणि जोडीला असे संवाद हे सगळं दिवास्वप्न वाटावं इतकं परफेक्ट जुळून आलय. विजय मौर्य चे संवाद इथे जान आणतात. ड्रायव्हर मुराद रात्रभर गाडीत थांबणार ह्या बद्दल हळहळ न करता त्याला तिथे मुव्ही बघायला मिळावा म्हणून स्वतःकडचा ipad अजिबात विचार न करता सफ़ीना कायमसाठी हातात देते. ओशाळून मुराद म्हणतो, ‘मैं तेरे को ऐसा कुछ नहीं दे सकता है.’

मुराद चा स्वाभिमान सांभाळत त्याला गप्प करण्यासाठी ती त्याच्या ओठांवर ओठ नेत बोलते,

– ‘मैं जैसी हूं वैसे रहने देता है तू, तेरे से महँगा और कुछ नहीं है मेरे लाईफ में!’

असं असलं तरी मुराद ला तिने कधीच गृहीत धरलेलं नाहीये. आणि हे नातं टिकवण्यासाठी ती वेळप्रसंगी काहीही करायला तयार आहे. मुराद च्या मागे असलेल्या एका मुलीसोबत मारामारी करायला, कुणाचं डोकं फोडायला ती अजिबात कचरत नाही. उलट कुठलाही गंड न बाळगता सांगते की, ‘तू शुकर कर उसकी गर्दन नहीं तोड़ी मैं. अभी एक ही लाईफ है, एक ही तू है, ऊपर से वो घुस रही है बीच में… गुस्सा नहीं आएगा क्या?’ मुराद ला दुसऱ्या मुलीसोबत काम करताना बघून सुद्धा तिचा जीव खाली वर होतो. मुराद कल्की सोबत म्युजिक ची तयारी करतोय हे समजल्यावर ती, ‘अब तू इससे कनेक्ट हो गया है, म्यूजिशियन हो गया है? और तेरा एग्झाम?’ असे विचारत जो चेहरा करते तो केवळ अवर्णनीय. 5-6 वर्षाच्या लहान मुलाला आपल्या घरात भाऊ येणार आणि आपल्यावरचं प्रेम कमी होणार असं जेव्हा समजणार असतं तेव्हा ते लहान मूल सुद्धा बिथरणार नाही इतकी सफ़ीना प्युअर मनाने तळमळते. मुराद सोबत थोडे खटके उडाल्यानंतर सुद्धा पुन्हा जवळ येण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न तिला करायचे आहे.मानपमान बाजूला ठेवून. ‘रॅप बॅटल’ मध्ये 2 राऊंड क्लियर झाल्यावर मुराद ला पुढे काय वाढून ठेवलय हे माहीत नाहीये. त्याला जवळ घेऊन सफ़ीना विश्वास देते,‘तेरे को जो करनेका है कर, मैं सर्जन बनने जा रही हूं. अपन मस्त जियेंगे.’

‘मुराद’ नावाचा अर्थ होतो – अभिलाषा. इच्छा. ‘सफ़ीना’ म्हणजे जहाज. बोट.

रणबीरला म्युजिक व्हिडिओ साठी मदत करणाऱ्या कल्की चं सिनेमातील नाव आहे ‘स्काय’. धारावी च्या वस्तीत अन मुराद ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय ते माहीत असून त्याच्यातला हट्टीपणा, निरागसपणा सफ़ीना ने शाबूत ठेवलाय. आकाश सोडताना तिला सफ़ीना चं महत्त्व सांगताना मुराद म्हणतो, – ‘सफ़ीना के बिना मेरा ज़िंदगी ऐसे होएगा, जैसे बिना बचपन के बड़ा हो गया.’ असा जोडीदार ज्यांना मिळतो ते नशीबवान. त्याला/तिला सोबत घेऊन ‘गली बॉय’ बघून या. ‘एका अंडरडॉग ने परिस्थितीशी झगडून मिळवलेलं यश’ हा ह्या महाकाव्याचा फक्त एक पापुद्रा आहे. आत जाणार तसं बरच काही मिळेल. मला अजून काय हातात लागलं.

– जितेंद्र घाटगे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55592
प्रत्येक ‘आनंदीसाठी गोपाळ’ जन्मावा ! https://maharashtradesha.com/birth-of-gopal-for-every-joy/ Wed, 20 Feb 2019 12:19:39 +0000 https://maharashtradesha.com/?p=55587 १३२ वर्षांपूर्वीचा हा प्रवास, एका व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त २२ वर्षांचा हा प्रवास. एक प्रवास आणि एकच ध्येय ! आताच्या काळात नाही जमत हे. ‘अनेक ध्येय ठेवले कि मग एक पूर्ण होतं,’ या भ्रमिष्ठ समजुतीला आपला अभिमान मानत आपल्यासारखे स्वप्न पाहायला सुरुवात करतात. आनंदीबाई वेगळ्या होत्या आणि त्यांच्याबरोबर गोपाळरावही! ‘अस्स काहीतरी व्हावंच लागतं, ज्यामुळे आपलं स्वप्न […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
१३२ वर्षांपूर्वीचा हा प्रवास,

एका व्यक्तीच्या आयुष्याचा फक्त २२ वर्षांचा हा प्रवास.
एक प्रवास आणि एकच ध्येय !
आताच्या काळात नाही जमत हे.
‘अनेक ध्येय ठेवले कि मग एक पूर्ण होतं,’ या भ्रमिष्ठ समजुतीला आपला अभिमान मानत आपल्यासारखे स्वप्न पाहायला सुरुवात करतात.
आनंदीबाई वेगळ्या होत्या आणि त्यांच्याबरोबर गोपाळरावही!
‘अस्स काहीतरी व्हावंच लागतं, ज्यामुळे आपलं स्वप्न आपल्याला मिळतं.’

आनंदीबाई भारतातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. पण या केवळ वाक्यावर त्यांचं कर्तृत्व मापलं तर चुकीचं ठरेल, त्याकरिता हा चित्रपट!

हि कथा जरी आनंदीबाई जोशींची असली तरी ती केवळ त्यांची नाही.
ती कथा मला जास्त करून गोपाळराव जोशींची वाटली. ब्राह्मण कुळात जन्मलेले भयंकर टोकाचे आडमुठे गृहस्थ!

आडमुठेपणा हा गोपाळरावांचा स्थायीभाव मानून चालले तरी तो चांगल्या विचारधारेला आणि योग्य दिशा देणारा स्थायीभाव होता.
चार दिवस शिवायचं नाही, पारावरचे सगळेच शहाणे कसे असतात, आपल्या स्वतःच्याच बायकोचा हात धरून मिरवण्यातही लोक नावे ठेवत, त्यावेळी गोपाळराव जसे आनंदीबाईंच्या हातात हात घालून दिमाखात लोकांना दाखवत चालतात, धर्मांतर करण्याचा विचार का करावा लागतो, लग्न करताना मुलाची प्रमुख अट कोणती होती ?, एकमेकांना सोडून न जाण्यासाठी बांधून ठेवलेली ती बाह्यतः बालिश वाटणारी खूणगाठ कित्ती मोठी साथ आणि विश्वास देते मनाला,
हे सीन, हि दृश्ये खूप सुंदर सहज पण नेमके मांडले, हाताळले. असे चित्रपट साकारताना कुठल्या धर्माला ठेच पोहोचू नये हे भान जपणे

सुंदर आहे तो क्षण, ज्यावेळी समुद्र किनारी तो निळा सदरा, डोक्यावर सफेद पगडी , आणि ते उपरण आणि शेजारी ती लाल तांबूस रंगाचे जरीचं लुगडं घातलेली, जरीच्या काठाची चोळी, कानात नाकात जुन्या घडणावळीतील मोत्याचे कानातले नि केसांच्या आंबाड्यात तो मोगऱ्याचा गजरा ‘ तिच्या ‘ हक्काचा गजरा. !
अजुन किती वाचायचं? म्हणत जेव्हा कंटाळवाण्या शब्दात आनंदीबाई बोलतात, तेव्हा त्या दोघांमधील संवाद सुरेख वाटतो.
ते म्हणतात,

‘ज्ञान हे या समुद्रासारखे असते, अथांग पसरलेल, जगभर…’
रुढींच तुटणे याचं सुंदर दृश्यातून दाखवले … जेव्हा गजरा घेऊन गोपाळराव आनंदीबाईंच्या केसांत तिथेच गाजरवाल्याच्या समोरच माळतात, हे माळून लाजणं हे आजही चारचौघात लज्जेचा विषय वाटतो. पण त्या काळात हे स्वतंत्र विचार गोपाळ रावांनी केले.

कास्टिंगबद्दल बोलताना,
मुख्य भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद म्हणजेच आनंदी गोपाळ. भाग्यश्रीची ओळख बालक-पालक चित्रपटाच्यावेळेची. तिच्या अभिनयाची लकब लवचिक आहे. भारी फिट झाली ती त्या भूमिकेसाठी.

भाग्यश्रीबद्दल जास्त बोलणे टाळते कारण जास्त आव्हानात्मक भूमिका हि गोपाळरावांची होती. अनेक भावनांचं अनेक रसायन त्या एका चेहऱ्यातील हावभावांतून दाखवायचे होते. भाग्यश्री (आनंदीबाई) हिला मात्र तिचा अल्लडपणा आणि मधील एका मोठ्या घटनेमुळे कणखरपणा या हावभावांचा अधिक वापर होता. त्यामुळे भाग्यश्री हिने सुरेख केलेच.

माझ्या दृष्टीने गोपाळ जोशी हे आव्हानात्मक वाटले. त्यांच्यासाठी हा प्रवास एक लढाई होती. आणि ती लढाई तितक्या ताकदीने स्क्रीनवर आणणे गरजेचे होते.
आणि अशावेळी मुख्य भूमिकेत ललित प्रभाकरला बघणे म्हणजे थोडासा किंतु मनात होता. कारण तो तरुण वयातील आणि तरुणीसाठीच्या भूमिका केलेला कलाकार होता. त्याचा दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलमधील रोलही तसा खूप भाव खाऊन गेला. मुलींचा क्रश म्हणून गॉड गोंडस हँडसम असलेला ललित गोपाळराव कसा साकारणार, याबाबत साशंक असणे स्वाभाविक होते. परंतु, त्याने अचूकपणे हे पात्र साकारत आणि खुलवत नेले.

त्याची भूमिका, त्याचा तिरसटपणा तर अंगावर तेव्हा येतो जेव्हा हा आडमुठे स्थायीभाव जेव्हा आनंदीबाई गरोदर असताना त्यांच्यावर ओरडले जाते नि मारले जाते. त्यावेळी त्याची चीड येते, राग येतो, कणव येते, तळमळ वाटते पण या सगळ्यात मोठ्ठ म्हणजे कडाडून राग येतो. आपली तळमळ खरी म्हणूनती चुकीच्यावेळी एखाद्यावर लादणे, चुकीचे हेही न्याय्य दर्शविले.

परंतु आधुनिक काळात अशा जुन्या व्यक्तींची व्यक्तिमत्वे आणि त्यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या काम करून साजरे केलेले हे सिनेमे, सुंदर वाटतात दृष्टीला. त्यासाठी त्या काळाचा फील आणण्यासाठी लागणाऱ्या मेहनतीची पूर्ण कल्पना नसली तरीहि अशा चित्रपटांत वापरलेली प्रकाशयोजना, फ्रेम, एडिटिंग, आधुनिकतेचा कणही दिसू नये याची घेतलेली काळजी हे तीन तासांत जज करून मोकळे होतो आपण, पण हेही आव्हान तंत्रज्ञानामुळे सुकर होऊ लागले. विशेष म्हणजे मला या अशा बायोपिकमध्ये चित्रपट चित्रीकरणासाठी वापरलेल्या जागा, तिथे वावरणाऱ्या लोकांचा पेहराव, त्या काळातील आपला भारत म्हणून जपलेली भौतिक वस्तूंची ठेवण हे पाहायला विशेष सुखदायक वाटतं.

भले, लेखकाला, दिग्दर्शकाला माहिती आहे कि, त्याचं हे लिखाण किंवा स्क्रीनवर दिसणारी चलचित्रेही त्या त्या काळात ज्या व्यक्तीची ती कथा आहे तिच्यासाठी इतकी सुखकर नव्हती. पण जुन्यातील गंमत नि प्रेक्षकांपर्यंत त्याच्या आतील संदेश पोहोचविण्याचा हा छान प्रयत्न ठरतो.
———————–

या कथेत वाटत जाते कि, जेव्हा अशा स्त्रिया मोठे नाव कमावतात, आपल्या पितृसत्ताक पुरुषाने जर अनाठायी ठरवूनच टाकले तर त्याच्यात केवढा पुरुषार्थ केवढी मर्दानगी आहे कि एक ‘आनंदी’ तो घडवू शकेल.
त्यांच्या डॉक्टर होण्याचं स्वप्न, स्वप्न का बनतं हे जेव्हा संवेदना जाग्या ठेऊन बघितलं जात तेव्हा चित्रपटाची तळतळ नि आनंदीबाईंनि त्यावेळी ठरवलेलं ते स्वप्न आजच्यासाठी किती महत्वाचं होतं हे कळत जातं.

चित्रपटांमधील गाणी हि त्या त्या परिस्थितीला अगदीच पूरक असतात. परंतु गीतांमध्ये सगळ्यात सुंदर गीत आणि त्याचं संगीत जे आवडलं ते म्हणजे
‘मैत्रीण माझी मीच मला अप्रूप माझे !

वाटा वाटा वाटा गं !
आणि ठेका येतो,
दर्या दर्या ग, उरात शंभर लाटा ग! 

लहानपणी नवऱ्याने लावलेली अभ्यासाची कडाडून शिस्त…हीच लहानपणीची सवय हळूहळू आनंदीबाईंना स्वतःच अस्तित्व शोधून देते. त्या दोघांचा हा प्रवास !

संस्कृती, परंपरा, रीती रिवाज, धर्म थोतांड, पक्षपाती शासन आणि शिक्षण व्यवस्था याना धरून अनेक चित्रपट बनविले जातात, हा चित्रपटही त्यातलाच. पण वेगळा दृष्टीकोन देतात या जिद्दी कथा !

हा गुंता सुटला तर एकमेकांची स्वप्न पुरी केली तर होतो संसार !
सुंदर समीकरण वाटले, दोघांची स्वप्न एकत्र सूत बांधतात, हा खरा संसार!
—————-

अंतास,
तो क्षण सुखाचा,
जेव्हा हे स्वप्न साकार होतं. आनंदीबाईंच्या हातात डॉक्टरकीची डिग्री येते. आणि गोपाळराव तिथे येतात, तो क्षण मौल्यवान, अगणित!
कडाडून भरून आलं, आवडलं, भावलं आणि याहूनही अधिक कदाचित!
एका स्वप्नामागे लागून त्या दोघांची धडपड, तो प्रवास, तो पाठलाग त्यातील पडणझडण आणि ते सगळं पूर्ण झाल्यांनंतर त्याने आनंदीबाईंना मिठीत घेणं जणू त्या स्वप्नाला कवेत घेणं होतं.
शेवट करताना तोच समुद्र, तोच पेहराव, त्याच लाटा आणि शेवटी एकमेकांची सोबत साथ, सुखकर !
—————-

फक्त चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने दाखवलेल्या सगळ्या यशस्वी महिला त्यांची नावे आणि त्यांचं कर्तृत्व हे इंग्रजी भाषेत टाकण्याऐवजी मराठीत टाकायला हवी होती. ती संकल्पना सुंदर आहे, पण प्रेक्षक हा बहुतकरून मराठी भाषिक असल्यामुळे त्यांना ते कळायला हवे, म्हणून वाटून गेले.
———-

फक्त मलाच जाणवले असेल, पण आनंदीबाई या कमी जाणवल्या, गोपाळरावांपेक्षा. हे कदाचित त्यावेळी तसेच घडलेही असेल. सत्य परिस्थिती, लेखकाचा या विषयातील व्यासंग आणि मुखतः या विषयाला हाताळतानाचा दृष्टिकोन. पण तरीही वाटते, गोपाळरावांची बाजू उजवी दाखवली जास्त?
असो, इतिहासातील संग्रहित सगळेच खोटे असते, नाहीतर सगळेच खरे मानावे, या एका समजुतीवर अशा ठेवणीतील चित्रपट पाहावीत.

– पूजा ढेरिंगे

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55587
प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब ; वाचा किरण गायकवाड ते भैय्यासाहेब पर्यन्तचा प्रवास https://maharashtradesha.com/kiran-gaikwad-news-lagir-zal-ji/ Wed, 20 Feb 2019 06:34:26 +0000 https://maharashtradesha.com/?p=55517 झी मराठी वरील  ‘लागिरं झालं जी’ मालिकेबरोबरच त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आज्या, शितली, जयडी, राहुल्याप्रमाणेच भैयासाहेब ही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतलीय. प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब. नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. अशाच काही खलनायकांच्या भूमिका लोकांच्या मनात घर करून जातात. असच किरण गायकवाड उर्फ ‘भैयासाहेब’ याने आपल्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तर […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
झी मराठी वरील  ‘लागिरं झालं जी’ मालिकेबरोबरच त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आज्या, शितली, जयडी, राहुल्याप्रमाणेच भैयासाहेब ही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतलीय. प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब.

नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. अशाच काही खलनायकांच्या भूमिका लोकांच्या मनात घर करून जातात. असच किरण गायकवाड उर्फ ‘भैयासाहेब’ याने आपल्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तर या भैय्यासाहेबांचा प्रवास कसा झाला आणि ते लागीर झालं जी पर्यंत कसे पोहचले?

किरण गायकवाड हा मुळचा पुण्याचा बालपणही पुण्याचं. प्राथमिक शिक्षणही पुण्यात झालं. पुण्याचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून त्यांनी एम कॉम च शिक्षण पूर्ण केलं. त्याला कधी अभिनयाची आवड होती अशातला काही भाग नाही किंवा पुढे जाऊन तो अभिनय क्षेत्रात जाईल असाही त्याला कधी वाटलं नव्हतं.

अभिनयाकडे वळणं…

इयत्ता ८ वीत असताना एका छोट्याशा नाटुकली मुले त्याला अभिनयाची गोडी लागली पण अभिनय क्षेत्राकडे त्याने करिअर म्हणून कधीच पहिले नव्हते. पण शाळेतील बनसोडे सरांनी त्याची पाठ थोपटली, ‘तू खूप चं नाटक करतोस त्यातच काहीतरी पुढे जाऊन कर’ त्यांच्या या वाक्यामुळे एकदारीतच किरणचा  अभिनय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. पण त्यावेळी आर्थिक परीस्थित नसल्याने त्याने महविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्याने महिंद्र कंपनीत कामाला सुरुवात केली.

किरणाच्या आयुष्याला कलाटणी लागली ती त्याचा आजाराने २०११ साली किरण खूप आजारी पडला आणि या आजारपणामुळे त्याला जॉबही सोडवा लागला. त्यावेळी आता काय करायचेह असा प्रश्न त्याचा समोर उभा राहील. पण त्याला बनसोडे सरांची कौतुकाची थाप आणि अभिनयाची आवड या दोन्ही गोष्टी आठवल्या. आणि त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

किरणने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राचा विचार करायला सुरुवात केली. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती.  किरणचा मोठा भाऊ पत्रकार. त्याने किरणला या क्षेत्रातील संघर्षाची कल्पना दिली.  त्यावेळी किरण डीजे म्हणून काम करत होता. त्यातूनच त्याला संगीताची आवड निर्माण झाली. मग तो म्युझिक शो आणि कंपोझिंग करून पैसे कमवू लागला.

 

अभिनयच्या क्षेत्रात संघर्ष हा आहेच. तो किरणलाही करावा लागला. अभिनय क्षेत्राकडे वळल्यानंतर प्रथम त्याला त्याचा भाषेवर आणि उच्चारांवर मेहनत घायवी लागली. तसेच अभिनयामुळे त्याला वाचनाची आवड लागली. त्यानंतर पथनाट्य, एकांकिका ते व्यावसायिक नाटक आणि मलिका अशा वेगवेगळ्या अभ्ण्याच्या छटा त्याला अनुभवायला मिळाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देऊन अनेक ठिकाणी काम करून त्याला खूप काही शिकायला मिळालं

‘लागीर झालं जी…’

एका प्रोजेक्टमध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम करत असताना किरणची शिवानी बावकर शी त्याची मैत्री झाली. आणि एकदा शिवानीने त्याचा कडून त्याचे फोटो मागून घेतले. तेव्हा शिवानी ‘लागिरं झालं जी’ मध्ये काम करत होती. तिने ते फोटो भैय्यासाहेब या भूमुकेसाठी तेजपालला दाखवले. पण त्यावेळी तेजपालला किरण या भूमिकेसाठी योग्य न वाटल्याने त्याने नकार दिला.

शिवानी प्रमाणे निखील चव्हाण (अज्या) हा देखी किरणचा मित्र एक दिवस किरण निखील सोबत शूट ला गेला तेव्हा तिथे तेजपालही होता तेव्हा त्याने किरणला ओळखलं शिवानीने फोटो दाखवल्याच सांगितलं आणि तिथे त्यांची नव्याने ओळख झाली. एके दिवशी तेजपालन किरणला एक छोटी ऑडिशन क्लिप बनवून पाठवायला सांगितली आणि ती क्लिप पाहून तेजपालने किरणला ‘लागिरं झालं जी’ मलिकेतील भैय्यासाहेब ही भूमिका तू करतोय अस सांगितलं. हि मालिका झी मराठीची आहे कळल्यानंतर किरण अधिकच खुश झाला. या आधी किरणने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘फुंतरु’ यासरख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या पण लागिरं झालं जी’ मलिकेतील भैय्यासाहेबाने त्याच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली.

भैय्यासाहेब हा ‘लागिरं झालं जी’ चा खलनायक. हर्षवर्धन हे त्याचं नाव पण लोक त्याला प्रेमाने ‘भैय्यासाहेब’ म्हणतात. हे तेजपालने किरणला नीट समजावून सांगितले. भैय्यासाहेब खलनायक असला तरी या पात्राच्या स्वभावाला वेगवेगळ्या छटा आहेत. तो थोडा मुडी आहे, थोडा प्रेमळ आहे. राजकारणी असला तरी समाजकार्य करण्याकडे त्याचा कल आहे. मालिकेच्या प्रत्येक पात्राबरोबर त्याचं एक वेगळ नात आहे, प्रत्येक बरोबर वागण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. त्याला राग आला कि तो त्याचा सवंगड्यांना मारतो त्यांना त्रास देतो, तेच दुसऱ्या क्षणाला त्यांना प्रेमानं जवळही करतो. स्वभाव थोडा विक्षिप्त असला तरी प्रेमळही आहे.

एक माणूस आणि दहा स्वभाव अशी व्यक्तिरेखा साकारताना त्याच्या प्रत्येक बाजूवर मेहनत घ्यावी लागते. किरण आणि भैय्यासाहेब हि दोन विरुध्द टोकं आहेत. भैय्यासाहेबाना खूप राग येतो मात्र किरण मुळात रंगीत नाही. त्याला राग आला तरी तो समोरच्याला प्रेमानं समजावून सांगतो. ‘भैय्यासाहेब हे गावातल मोठ प्रस्थ असल्यानं त्याचा रुबाब किरणला स्वतःमध्ये भिनवावा लागला. ही भूमिका साकारताना कुठेही अतिशयोक्ती होऊ नये ह्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते’ असे किरण सांगतो.

‘भैय्यासाहेब’ मुळे किरणला लोकांचं प्रेम मिळू लागलंय त्यामुळे ‘भैय्यासाहेब’ साकारताना किरणला स्वतची प्रतिमा जपावी लागते. हे सगळ करत असताना तो त्याचा आईला त्याच्या मित्रांना तसेच डीजे लाईफला खूप मिस करतो.

तसेच या वर्षीच्या झी मराठी २०१८ विशेष खलनायक भूमिकेचा पुरस्कार ही किरणने पटकवला आहे. तसेच त्याला या एका भूमिकेत न अडकता अजून अनेक भूमिका करायच्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55517
कमल हसनचं डोकं ठिकाणावर आहे का? पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला ‘आझाद कश्मीर’ https://maharashtradesha.com/kamal-hassans-new-controversial-statement/ Mon, 18 Feb 2019 08:19:50 +0000 https://maharashtradesha.com/?p=55365 टीम महाराष्ट्र देशा- चित्रपटातून राजकारणात आलेले  कमल हासन याचं कमल हसनचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. हासन यांनी अशा पद्धतीने गरळ ओकाल्याने नवीन वाद […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा- चित्रपटातून राजकारणात आलेले  कमल हासन याचं कमल हसनचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये पाकव्याप्त काश्मीरला ‘स्वतंत्र काश्मीर’ म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, असेही म्हटले आहे. हासन यांनी अशा पद्धतीने गरळ ओकाल्याने नवीन वाद ओढवण्याची शक्यता आहे.

चैन्नई येथे एका मुलाखतीत बोलताना हासन यांनी पाकव्याप्त कश्मीरचा उल्लेख केला ‘आझाद कश्मीर’ असा केला. सरकार काश्मीरमधील नागरिकांचे जनमत मिळवण्यास का घाबरते? असां सवाल उपस्थित केला. काश्मीरमध्ये जनमत संग्रह करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावे…ते असे का करत नाहीत? असं देखील ते म्हणाले.

पुढे बोलताना हासन म्हणाले,भारतीय लष्कर एखाद्या जुन्या फॅशनसारखं आहे. कश्मिरी तरुणांबरोबर बोलायला हवं. त्यांच ऐकायला हवं. पण सरकार त्याला घाबरतयं. त्यांना देशाची विभागणी करायची आहे. दुसरं काही नाही असा आरोपही हासन यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55365
व्हँलेंटाईननिमीत्ताने अदिती द्रविडचे ‘राधा’ गाणे लाँच https://maharashtradesha.com/aditi-dravid-launch-her-new-song-radha-on-valentine-day/ Thu, 14 Feb 2019 11:33:19 +0000 https://maharashtradesha.com/?p=55085 टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय. ‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते, ‘’उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘मी राधिका’ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय.

‘राधा’ गाण्याविषयी अदिती म्हणते, ‘’उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला रंगवताना भरतनाट्यम डान्सर असल्याचा फायदा मला झाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात राधा-कृष्णाचा प्रणय, प्रेमातला दूरावा, ताटा-तूट ह्यासंदर्भातल्या अनेक कथा आहेत. मी शास्त्रीय नृत्यांगना असल्याने मला ह्या कथा, त्यातले भाव आणि पदन्यास माहित होते. आणि त्यामूळेच राधा गाण्यात मी ते भाव उत्तमपध्दतीने साकारू शकले.”

आदिती पूढे सांगते, “ व्हँलेटाईन-डेला आपण प्रेमाच्या दिव्यत्वाविषयी बोलतो. प्रेमातली ही दैवी भावना ह्या गाण्याच्या शूटिंगवेळी अनुभवता आली. स्वत:ला विसरून दूस-यावर समर्पित भावनेने प्रेम करण्याची कल्पना मला नेहमीच आवडते. मी त्या ‘ओल्ड स्कुल लव्ह स्टोरी’ना मानते. आणि ह्या व्हिडीयोच्या शूटिंगच्या दरम्यान मला त्या समर्पित प्रेमातली उत्कटता अतरंगी स्पर्शून गेली. “

टायनी टॉकिज प्रस्तूत पियुष कुलकर्णी दिग्दर्शित हे मॅशअप सुवर्णा राठोडने गायले आहे, तर हे गाणे अभिनेत्रीवर चित्रीत झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55085
‘व्हॅलेंटाईन डे’ला आलं पूर्वी भावेचं हॉट, सेन्शुअस, सेक्सी फोटोशूट https://maharashtradesha.com/purvi-bhaves-special-photoshoot-on-valentine-day/ Thu, 14 Feb 2019 10:52:45 +0000 https://maharashtradesha.com/?p=55062 टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय. रेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री पूर्वी भावे आजवर तिच्या सोज्वळ आणि मराठमोळ्या लूकसाठी अनेकांना ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ वाटायची. पण पूर्वी भावे किती हॉट, सेक्सी, सल्ट्री, सेन्शुअस दिसू शकते, ते तिच्या सोशल मीडियावरून नुकत्याच रिविल झालेल्या ग्लॅमरस फोटोशूटवरून दिसून येतंय.

रेड सेक्सी सॅटिन वनपिसमध्ये दिसत असलेल्या पूर्वी भावेचा हा मेकओवर खास ‘व्हॅलेटाईन डे’ निमीत्ताने झाला आहे का, असं विचारल्यावर पूर्वी भावे म्हणाली, “खरं तर, खूप दिवसांपासून काहीतरी नवीन लूक ट्राय करायची इच्छा होती. मग विचार केला की, ‘व्हॅलेटाईन्स डे’ हे निमीत्त चांगलं आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची सुरूवात ‘लव्ह युवरसेल्फ’ने व्हायला हवी. म्हणून फोटोशूटची थीम सुध्दा रेडच ठेवली. थोडासा सेन्शुअस वाटणारा हा लूक क्लासी आणि एलिगंट सूध्दा दिसत असल्याने मला खूप आवडला.”

‘व्हॅलेंटाईन डे’ला झालेला पूर्वी भावेचा हा मेकओव्हर लक्षवेधक आहे. पूर्वी इंडियन आउटफिटमध्ये जेवढी सुंदर दिसते. तेवढीच ती वेस्टर्न आउफिटमध्ये ग्लॅमरस दिसू शकते, हे ह्या फोटोशूटने दाखवून दिलंय. पूर्वीच्या लूकवर तिचे चाहते आता नक्कीच फिदा होतील, हे वेगळं सांगायला नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55062
‘गडकरी’ हा लघुपट लवकरच प्रेश्रकांच्या भेटीला https://maharashtradesha.com/gadkari-short-film-will-soon/ Wed, 13 Feb 2019 14:17:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=55016 टीम महाराष्ट्र देशा : राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती सध्या प्रेश्रकांचा खूप आवडीचा विषय ठरत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवास आधारीत ‘नमो’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील ‘रा गा’ हा ही सिनेमा लवकरच सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे , दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या जीवनावरील ठाकरे सिनेमाला […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती सध्या प्रेश्रकांचा खूप आवडीचा विषय ठरत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवास आधारीत ‘नमो’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला , काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरील ‘रा गा’ हा ही सिनेमा लवकरच सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे , दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या जीवनावरील ठाकरे सिनेमाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ही सिनेमाला चांगले यश मिळाले.त्याच जोडीला आता नितीन गडकरींचा या जीवनावर आधारीत ‘गडकरी’ हा लघुपट प्रेश्रकांच्या भेटीला येत आहे. लहानपणापासून ते २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा राजकीय प्रवास या लघुपटातून प्रेश्रकांना दाखवण्यात येणार आहे.

लघुपट रुपेरी पडद्यावर नाही तर फक्त डिजीटल माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. ‘गडकरी’ या लघुपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे. आणि २८ फेब्रुवारीला तो युट्यूबवर अपलोड करण्यात येणार आहे. नयनराज प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी हा एक तासाचा लघुपट तयार केला आहे.राहुल चोपडा यांनी नितीन गडकरींची भूमिका साकारली आहे. प्रेश्रकांची किती पसंती गडकरी लघुपटास मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
55016
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा टीझर लाँच https://maharashtradesha.com/akshay-kumars-movie-kesari-teaser-launch/ Tue, 12 Feb 2019 11:59:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=54918 टीम महाराष्ट्र देशा – अक्षय कुमार आगामी केसरी हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सिनरसिकांमध्ये होत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये अक्षयने अविश्वसनीय सत्य कथा असे कॅप्शन देखील दिले आहे. युद्धासाठी […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा – अक्षय कुमार आगामी केसरी हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सिनरसिकांमध्ये होत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Instagram Photo

हा टीझर अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये अक्षयने अविश्वसनीय सत्य कथा असे कॅप्शन देखील दिले आहे. युद्धासाठी सज्ज असलेल्या सैन्याचा जोश या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54918
सई ताम्हणकर करतेय डिजीटल डिटॉक्स https://maharashtradesha.com/digital-detox-with-sai-tamhinkar/ Tue, 12 Feb 2019 11:01:52 +0000 https://maharashtradesha.com/?p=54901 टीम महाराष्ट्र देशा : मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे, ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे […]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
टीम महाराष्ट्र देशा : मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या डिजीटल डिटॉक्सवर आहे. मराठी सिनेसृष्टीत 2018 मध्ये आपले स्टाइलिश लूक्स असोत, की परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे, ह्या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकर सध्या सौशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणार आहे.

सई ताम्हणकरला ह्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबूक ह्यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचे ठरवले आहे.

सई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साढेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोवर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोवर्स फेसबुकवर आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करतेय.

सूत्रांच्या अनुसार, जेव्हा सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोवर्स मिळवण्याच्या जवळपास शोबिझमधले सेलिब्रिटी असतात. तेव्हा ते जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकून आपले फॉलोवर्स वाढवण्यावर भर देतात. मात्र सई नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. ही सईची एक बोल्ड मुव्ह म्हणायला हरकत नाही.

पण एक मात्र नक्की सईच्या ह्या निर्णयाने आता तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला असेल. एक महिन्यानंतर आता सई सोशल मीडियावर परतताना काही नवी सरप्राइजेस घेऊन येणार का? ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com

]]>
54901