जातीपातींचा अंत होणे शक्य नाही : विनायक मेटे

Vinayak Mete

टीम महाराष्ट्र देशा : समाजातील जातीपातींचा अंत होणे शक्य नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर मोठा वणवा पेटला असून अनेक ठिकाणी हिसाचार होताना पहायला मिळतंय. काही आंदोलकांनी तर आत्महत्या देखील केल्याने मराठा तरुणांच्या रोषाचा भडका उडाला आहे या पाश्वभूमीवर मराठा समाजाला शांत करण्याची गरज असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. मराठा तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी ?