fbpx

जातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू! : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी बढती करण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहेत. तसेच यंदा लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कोरेगाव-भीमा प्रकरणावर या घटनेमागचे अदृश्य हात सापडले तर त्यांची होळी करु असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्या दरम्यान काही ठिकाणी हिंसाचार सुद्धा झाला होता. आज या प्रकरणावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले,जातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू. कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात कोणाचे आहेत सर्वांना माहित आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करु. संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले याचं श्रेय घेण्यावरुन सुरु असलेला वाद पाहून दुख झालं. कोरेगाव-भीमामधील घटना मन विषण्ण करणारी होती. तसेच आजही आपण भांडलो तर आज जो कोणी औरंगजेब टपून बसला असेल तो मराठी माणसाचे तुकडे करेल. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे अस ते म्हणाले.