`कॅशलेस` व्यवहारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबणार- मुख्यमंत्री

कृषि सेवा केंद्रांना मार्च 2017 अखेर 10 हजार पीओएस मशीन

देशातील काळा पैसा बाहेर काढून अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी केंद्र शासनाने 500 व 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाचा पुढचा टप्पा हा देशातील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करणे आहे. त्याची सुरूवात देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांपासून सुरू झाली. कृषी निविष्ठा खरेदी करताना कॅशलेस पद्धत वापरल्यास शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक निश्चितच थांबणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांनी रोखरहित व्यवहार करण्यासाठी कृषि निविष्ठा विक्री केंद्रांना पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन पुरविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज `रामगिरी` येथे कृषि केंद्र चालकांना पीओएस मशीनचे वाटप करून करण्यात आला.

You might also like
Comments
Loading...