पिस्तुलाचा धाक दाखवत 10 लाखांची रोकड लुटली

धुळे : येथील अवधान शिवारातील एमआयडीसीमध्ये मध्यरात्री तिघांनी शेंगदाणा कंपनीत पिस्तुलचा धाक दाखवून बळजबरीने 10 लाखाची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. आरडाओरड करुनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सकाळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी भेट दिली.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत अवधान एमआयडीसीमध्ये कानसिंग प्रेमसिंग राजपुरोहित (रा. गुडानाल ता.शिवाना जि. बाडमेर) यांच्या मालकीचे भवानी ट्रेडर्स कंपनी आहे़ या कंपनीमार्फत शेंगा खरेदी करुन त्याचे शेंगदाणे बनवून विक्री करण्याचे काम केले जाते.

bagdure

या कंपनीत सुजानसिंग वगताजी राजपुरोहित हे व्यवस्थापक असून त्यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार काल मध्यरात्री कंपनीत झोपलेले असताना 20 ते 25 वयोगटातील तीन जण आले. त्यांनी कंपनीचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला. दरवाजा कोण वाजवितो आहे, हे पाहण्यासाठी खिडकी खोलून पाहिले असता तिघांपैकी एकाने पिस्तुलचा धाक दाखवित दरवाजा उघडण्याचे सांगितले. दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता थेट गोळीही झाडण्यात आली. दरवाजा तोडून या तिघांनी आत प्रवेश केला.

तिजोरीत ठेवलेले 10 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. त्यांच्यातील एकाने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत

You might also like
Comments
Loading...