fbpx

दोन महिलांवर गुन्हा दाखल तर २९ मांजरे ताब्यात; मांजरांची निगा न राखल्याचा गुन्हा

cats

पुण्यामध्ये कधीकाय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पुणेकरांचे प्राणी प्रेम हे तर सर्वश्रुत आहे. त्यात मांजर आणि पुणेकर हा वाद जुना आहे. आताही असाच काहीसा प्रकार घडला असून कोंढाव्यात मांजराची निगा न राखल्याने दोन महिलांवर गुन्हा करण्यात आला आहे.

दीपिका कपूर आणि संगिता कपूर अस गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चक्क 29 मांजरी ताब्यात घेतल्या आहेत. या दोन्ही महिलांनी तब्बल 29 मांजरी घरामध्ये पाळल्या आहेत. मात्र या मांजरींची निगा राखली जात नव्हती. त्यामुळे अत्यत घाणेरड्या वातावरणात या मांजरींना रहाव लागत होते. शेजारील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 Comments

Click here to post a comment