ग्रामसेवक संजय शिंदे आत्महत्येप्रकरणी गटविकास अधिकारी, कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

case registered against the group development officer and employee in Gramsevak Shindes suicide Incident

औरंगाबाद : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आज (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी बिडकीन पोलिसांत गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात सकाळपासूनच ठिय्या मांडून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांनीदेखील आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. यानंतर अखेर गुरुवारी संध्याकाळी बिडकीन ठाण्यात गटविकास अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत संजय शिंदे यांची पत्नी प्रतिभा संजय शिंदे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महत्वाच्या बातम्या