fbpx

पुलवामा आणि २६/११ च्या हल्ल्याला संघचं जबाबदार म्हणणाऱ्या गायीकेवर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा :  पुलवामा आणि २६/११ च्या हल्ल्याला संघचं जबाबदार असल्याचे वक्तव्य करणारी पंजाबी गायिका हार्ड कौरवर वाराणसीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसीतील केंट पोलिसांत अधिवक्ता शशांक शेखर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून हार्ड कौरवर आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गायिका हार्ड कौरने मुंबईमधील २६/११ चा हल्ला आणि पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केल्यानंतर सरदार पटेलांनी तुमच्यावर बंदी आणली होती. भारताच्या निर्मितीनंतर अनेकांचा बळी या जातीयवादी पक्षाने घेतला आहे, असे कौर हिने म्हंटले होते.

इतकेच नव्हे तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत हे आरोप केले, तर खालच्या पातळीची टीकाही केली. दरम्यान, अधिवक्ता शशांक शेखर त्रिपाठी यांनी हार्ड कौरच्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अभद्र व अवमानकारक पोस्टमुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

विशेष म्हणजे, कलम 153 ए, 124 ए 500, 505 व 66 आयटी अॅक्टअंतर्गत हार्ड कौरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर शशांक शेखर त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री, पीएमओ, डीजीपी, एडीजी सर्वांना संदर्भातील तक्रार पाठवली असल्याचे म्हंटले आहे. केवळ पत्राद्वारेचं नव्हे तर ईमेलही केला असल्याचे म्हंटले आहे.