सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्यासाठी बेळगावात गेलेल्या धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : सीमाभागातील मराठी लोकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काल बेळगावात दाखल झाले. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे बेळगावात पोहोचले. कर्नाटक सरकारचे बेळगावमध्ये मंगळवारपासून अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी संबोधित केलं.

गेली साठवर्षाहून अधिक काळ बेळगाव सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतरही बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी झालेला नाही, हे दुर्दैव आहे. या लढ्याला आता तरुणांनी हाती घ्यावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

Loading...

मात्र , महामेळाव्यासाठी परवानगी मागूनही न देणाऱ्या कर्नाटकी पोलीस प्रशासनाने खरा रंग दाखवला आहे. महामेळाव्याला परवानगीच नसताना तो घेतला असे कारण देत महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मुंडेंसह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवाळी अधिवेशन सुरु असताना संबंधित जागेच्या मालकाकडून, तसेच संबंधित सरकारी कार्यालयातून परवानगी आवश्यक होती, मात्र ती घेतली नाही असा आरोप धनंजय मुंडेंसह सर्वांवर आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात