पाचवीच्या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांचा अवमान, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

अमरावती – इयत्ता पाचवीच्या हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील मधुबन प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. याप्रकरणी मधुबन प्रकाशन आणि लेखिका डॉ. अनुराधा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रेमी संघटनांनी केली आहे.

शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर छिंदमला अखेर अटक

शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर शिवप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. हिंदी भाषेतील व्याकरण वाटिका-5 या पुस्तकातील ‘रचनात्मक गतविधिया’ या धड्यातील परिच्छेद चार आणि पाचमध्ये शिवाजी महाराजांबद्दल हा अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक बाजारात आणि ऑनलाईन स्वरुपात उपबल्ध आहे.

याबाबत सचिन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.हे पुस्तक इंटरनेटवरुन हटविण्यात यावे. तसेच शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करु नये अशी मागणीही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटा आणि अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे.

शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणेच साजरी व्हावी – राज ठाकरे

You might also like
Comments
Loading...