Share

Ashish Shelar | शेलारांच्या सुरक्षा रक्षकाला महिलेची मारहाण, गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

Ashish Shelar | मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलार विलेपार्ले येथे बैठकीसाठी जात असताना ही घटना घडली होती. शेलार यांचा ताफा सिग्नंलहून जात असताना सुरक्षेतील गाडीने एका दुचाकीला धडक दिली होती. ही दुचाकी एक महिला चालवत होती. त्यानंतर दुचाकीवरील महिलेने सुरक्षा रक्षकांना मारहाण करत शिवीगाळ केली होती.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्रात गदारोळ पाहायला मिळाला. एका महिलेला रस्त्यातून बाजूला केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान शेलारांच्या सुरक्षा रक्षकाला एका महिलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयाने अवनला १५ हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. आव्हाड यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

माहितीनुसार, भाजप नेत्या रिदा रशीद यांनी मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे रिदा या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षाही आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics