योगी आदित्यनाथ यांच्याशी प्रतिकात्मक विवाह करणाऱ्या ‘त्या’ महिलेवर राजद्रोहाचा गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा; अंगणवाडी सेवकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी प्रतिकात्मक विवाह करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अंगणवाडी महिला कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या नीतू सिंह यांनी आंदोलना दरम्यान हा विवाह केला होता. दरम्यान न्यायालयाने नीतू सिंह यांची रवानगी कोठडीत केली आहे.

Loading...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण योगी आदित्यनाथ यांना १२० दिवसांची मुदत दिली होती. मात्र नऊ महिने झाले तरी काहीच झाले नसल्याने आपण त्यांच्या फोटोसोबत विवाह केल्याच नीतू सिंह यांनी सांगितले होते.Loading…


Loading…

Loading...