पवार कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पुणे : फेसबुकच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप श्रीकृष्ण डापकर (रा. गांजपूर, ता. धारुर, जि. बीड) याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती तालुकाध्यक्ष राहुल वाबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. पवार कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी डापकर याच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधायक कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.