राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल

sexual harassment by teacher in paithan

राहुरी ,(प्रतिनिधी)राजेंद्र साळवे– राहुरी तालुक्यातील निंभरे गावात एका दलित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे . रामनारायन निवृत्ती सिनारे ,भास्कर नामदेव सिनारे ,योगेश भास्कर सिनारे,अनिकेत रामनारायन सिनारे,आशा रामनारायन सिनारे,सुशिला भास्कर सिनारे यांच्याविरोधात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे .
सविस्तर वृत्त असे की, निंभेरे या गावात सोनाबाई गंगाधर पाळंदे (वय -65) या वृध्द महीलेसह त्यांची मुले हे एकत्रीत राहत आहे.त्यांच्या जवळच आरोपी रामनाथ सिनारे व भास्कर सिनारे असे वस्ती करून राहतात.पाळंदे व सिनारे या दोघांच्या वस्तीमधे जाण्या येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे.ता.27 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान फिर्यादी सोनाबाई पाळंदे या स्वतःचे घरासमोर बसलेल्या होत्या.घरासमोरील कच्च्या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला असल्याने त्या रस्त्यावरून चालक प्रविण विधाते हा भास्कर नामदेव सिनारे यांच्या गायींसाठी टेम्पो या वाहनातुन चारा घेउन चालला होता.टेम्पोचे चाक या झालेल्या चिखलात खचले.याच गोष्टींचा राग धरून वरील व्यक्तींनी सोनाबाई गंगाधर पाळंदे जातीवाचक शिवीगाळ करून सोनाबाई पाळंदे यांची सुन सौ.प्रतिभा पाळंदे यांस मारहाण ,शिवीगाळ केली . तुम्ही आमच्या नादी लागला तर एकेकाचा खुन करू, तुमचे घर पाड़ुन टाकु, अशी धमकी देत तेथुन निघुन गेले.

स्वतः व त्यांची मुले राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी वरील गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्यासाठी ता.28 ऑगस्ट सकाळी 9 वाजाता गेले परंतु त्वरीत फिर्याद नोंदविली गेलीच नाही.पोलीसांनी दीवसभर बसउन ठेवले व सायंकाळी 6:30 वाजता फिर्याद नोंदवून घेण्यात आली . आरोपींविरोधात  गु.र.नं.323 / 17 प्रमाणे भा.द.वि.कलम 3(1)(10),143,147,323,504,506हा अ.जा.व अ.ज.या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पोलीस स्टेशनचा फार वाईट अनुभव आम्हा पाळंदे कुटुंबियास आल्याचे विजय पाळंदे यांनी महाराष्ट्र देशाच्या प्रतिनिधीस सांगीतले.