माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणीचे नाट्य ताजेच असताना सोनई-करजगावसह १८ गावांच्या पाणी योजनेवरून करण्यात आलेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनाच्या तब्बल चार दिवस उशीराने माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वचपा काढण्यासाठी तसेच गडाखांची राजकीय कोंडी करून त्यांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवण्यासाठीच आंदोलनाला चार दिवस उलटून गेल्यानंतर राजकीय दबावातून उशीराने गुन्हा दाखल करण्यात आल्याची उलटसुलट चर्चा तालुक्यात रंगली आहे.

नेवासा तालुक्यातील पिण्याच्या असो वा शेतीच्या पाण्याचा प्रश्न, सत्तेवर असतानाही आणि नसतानाही शंकरराव गडाख नेहमीच आक्रमक व आग्रही राहिल्याचा इतिहास आहे. पाटपाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे केलेली आंदोलने राज्यभरात गाजलेली आहेत. त्यामुळेच पाणी प्रश्नांची जाण असलेला आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची आंदोलने लोकशाही मार्गाने व शांततेत पार पडूनही त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी तालुक्यातील काही राजकीय शक्ती प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.

Loading...

त्यातूनच वडाळा बहिरोबा येथील आंदोलन प्रकरणी राजकीय दबावातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी वॉरंट बजावले असता पोलीस यंत्रणेने त्यांना पकडण्यासाठी अवलंबिलेली शोध मोहीम व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानाच्या झडती प्रकरणाने जिल्हा हादरला होता. या प्रकरणामुळे गडाखांचे राजकीय खच्चीकरण होण्याचा संबंधीतांचा अंदाज असल्याचे समजते.

त्यातच मागील आठवड्यात सोनई-करजगावसह 18 गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्नावरून या सर्व गावांच्या ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्ता रोको करून प्रशासनाला घाम फोडला होता. मागील अनुभवावरून गडाख शहाणपणा दाखवतील व प्रत्यक्ष आंदोलन करण्यापासून परावृत्त होतील हा संबंधीतांचा अंदाज या आंदोलनाने पुरता फोल ठरल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हे आंदोलन झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर मोठी राजकीय खलबते करण्यात येऊन गडाख यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर परत गुन्हा दाखल करण्याचा दबाव पोलीस यंत्रणेवर टाकण्यात आल्याची प्रशासकीय पातळीवर दबक्या आवाजात चर्चा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्यावर आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांची मोठी राजकीय कोंडी करून त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून ठेवण्यात संबंधितांना यश मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. या नव्याने गुन्हा दाखल झाल्याने गडाख बॅकफूटवर जाऊन बऱ्याच प्रमाणात शांत होतील अशी अटकळ बांधून त्यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्याची खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा आहे.

सोनई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार गडाख यांच्यासह दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले, यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम १४३ , १४९ , ३४१ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१ ) (३ ) / १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण