मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यावर पुण्यात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह अजय देडे नामक व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 32 वर्षीय महिलेने अनैसर्गिक अत्याचार तसेच कौटुंबिक छळाची तक्रार केली आहे. याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महिलेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा म्हणून करुणा शर्मांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या महिलेचा पती अजय कुमार याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक त्रास दिला असल्याची फिर्यादी महिलेने दिली. अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर भूमाफिया तसेच अनेक गंभीर आरोप करुणा शर्मांनी केले होते. आता या प्रकरणी त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- विधान परिषद निवडणुकी संदर्भात भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची प्रतिक्रिया
- उद्योजक आनंद महिंद्रा यांची अग्नीवीरांसाठी मोठी घोषणा, म्हणाले…
- Dipali Syed VS Raj Thackeray : “राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील”, दिपाली सय्यद यांचा खोचक टोला
- “…हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते?”, संजय राऊतांचा सवाल
- Legislative Council elections : निवडणुकीपूर्वी भाजप उमेदवाराचे गणरायाला साकडे; ट्वीट करत म्हणाले..
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<