संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंवर कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे: भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदी कायदा अंतर्गत पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार

काल भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्थभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भिम अनुयायी आले होते. याच दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान मृतांच्या परिवाराला 10 लाख रुपये मदतीची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. तसेच याची सीआयडी चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

उद्या महाराष्ट्र बंदची हाक

दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकरवादी संघटनांकडून देण्यात आली आहे.