‘राजकीय फटकारे’ व्यंगचित्र प्रदर्शन सोमवारपासून

पुणे: विदर्भ कार्टूनिस्ट असोसिएशन, लालित्य फाऊंडेशन आणि आर्टिस्टर तर्फे येत्या 11 ते 13 डिसेंबरपर्यंत ‘राजकीय फटकारे’ व्यंगचित्र प्रदर्शनाचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात आयोजित या व्यंगचित्र प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील राजेंद्र सरग, लहू काळे,शिवाजी गावडे यांच्यासह महाराष्ट्र व देशाच्या इतर राज्यातील विवेक मेहेत्रे, महेंद्र भावसार, प्रभाकर दिघेवार, अरविंद गाडेकर, सुरेश राऊत, सागर कुमार,अशोक सुतार, गणेश जोशी, गजानन घोंगडे, कप्तान, बाबू गंजेवार, धनाजी वाघमारे, अमोल गवळी, सुहास पालिमकर, चंद्रशेखर भालेराव,अनिल वालाड,हरीश दिवटे, चंद्रशेखर (जम्मू),अशोक बुलबुले, शेख मोहम्मद, सिद्धेश देवधर, प्रदीप दीप, तन्मय त्यागी, आशिष तिवारी, बी.व्ही. पांडुरंग राव, दिनेश धनगव्हाळ, भारत जगताप, संजय मोरे, सुरेश राहंगडाले, अजीत गौड, विष्णू अकुलवार, उमेश चारोळे, अनंत दराडे, धनराज गरड, गणेश काटकर, कुशल भट्टाचार्य (कोलकाता), राजेश कुमार दुबे (मध्य प्रदेश), जीवन नागोरी, कपिल घोलप, आशिष उजवणे, निलेश कानकिरड, सतीश उपाध्याय, गजेंद्र चंद्रशेखर,बीजय बिसवाल, अजय रायबोले या नामवंत व्यंगचित्रकारांनीही सहभाग नोंदवला आहे.

वर्तमान राजकारणांवर भाष्य करणारी, विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि महाराष्ट्र व देशभरातील बदलत्या राजकीय-सामाजिक घडामोडी दर्शविणारी व्यंगचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सामान्य माणसाच्या समस्येला वाचा फोडणारे विषय या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. श्रीहरी अणे यांच्या हस्ते 11 डिसेंबर ला सायंकाळी 5.30 वाजता नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून संदेश सिंघलकर, अत्तदीप रामटेके, सुदर्शन पाटील, संजय तिवारी आदी उपस्थित राहतील. रसिकांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य 13 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संजय मोरे, उमेश चारोळे, प्रसाद पिंपरीकर,सुरेश रहांगडे प्रयत्न करीत आहेत.

You might also like
Comments
Loading...