अस्मानी संकटानंतर कोल्हापूरकरांवर सुलतानी संकट; जमावबंदीचे आदेश

blank

टीम महाराष्ट्र देशा :गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. परंतु प्रशासनाने आता एक अजब निर्णय घेत कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे झालेले हाल पाहता जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने, उपोषण, आंदोलने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (1) अ ते फ आणि कलम ३७ (३ ) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, अद्यापही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बचावकार्य सुरु आहे. तसेच अद्याप लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्याच्या इतर भागातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

तसेच राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या