पारंपारिक शिक्षणाचा कंटाळा आलाय, मग बारावीनंतर खुणावणाऱ्या वेगळ्या वाटा.. वाचा

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावत आहे, निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना मतदार आपल्याला वोट देतील की नाही याची चिंता आहे. तर दुसऱ्या बाजूला बहुतांश घरामध्ये सध्या वेगळेच टेन्शन अनेकांना पडले आहे. ते म्हणजे १२ वी नंतर आपल्या मुलाला – मुलीला पुढच्या शिक्षणासाठी कोणता पर्याय निवडायचा.

आज २१ व्या शतकात केवळ पारंपारिक शिक्षण घेण हे एकप्रकारे आपणच आपली प्रगती रोखल्यासारखे होवू शकते. मग समोर शेकडो पर्याय आल्यानंतर त्यातील योग्य पर्याय कोणता हे कसं ठरवणार. यासाठी प्रत्येकाने खालील तीन प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधणे गरजेच आहे.

१. मला आयुष्यात नेमक काय बनायचं आहे.

२. ज्या कोर्सचा पर्याय मी निवडणार आहे, त्याला भविष्यात किती मागणी असू शकते

३. मी जे काही करेन त्या जोरावर आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होऊ शकेन का?

१२ वी नंतर खुल्या असणाऱ्या वेगळ्या १० वाटा

हॉटेल मॅनेजमेंट


भारत तसेच जगभरात आज हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्द आहेत. १२ वीनंतर आपण डिप्लोमा अथवा बॅचलर डिग्रीचा पर्याय निवडू शकता. शिक्षणपूर्ण केल्यानंतर मोठे हॉटेल्स, क्रुझ, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्यामध्ये रोजगाराची संधी मिळू शकते.

फॅशन डिझायनिंग


आज प्रत्येकाला फॅशनेबल कपडे घालण्याची आवड आहे. त्यामुळे फॅशन डिझायनिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्द होत आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला फॅशन जगताबद्दल आवड असयला हवी. या क्षेत्रात आल्यावर डिजाईन आणि स्टाइल या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. १२ वीनंतर आपण डिप्लोमा अथवा बॅचलर डिग्रीचा पर्याय निवडू शकता.

मर्चंट नेव्ही


तुम्हाला जगभरात भ्रमंती करण्याची आवड असेल तर मर्चंट नेव्ही हा पर्याय योग्य ठरू शकतो. यामध्ये १२ वीनंतर तुम्हाला डिप्लोमा अथवा बॅचलर डिग्रीचा पर्याय उपलब्द आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर मालवाहू जहाजापासून ते पर्यटनासाठी असणाऱ्या जहाजावर तुम्हाला नौकरी मिळू शकते. मर्चंट नेव्हीमध्ये जहाज नियंत्रण, कार्गो हँडलिंग अभियांत्रिकी, देखभाल अशा विविध खात्यांमध्ये जहाजांवर अधिकारी म्हणून करिअर करता येते.

जर्नालिझम


पत्रकारिता हा सध्या सर्वांचा कुतूहलाचा विषय आहे, तुम्हाला जास्तीत जास्त वेळ लोकांमध्ये राहून काम करण्याची आवड असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. १२ वी नंतर डिप्लोमा आणि डिग्रीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर वृत्तपत्र, रेडीओ, वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्द आहे.

आर्किटेक्चर


आर्किटेक्चर अभ्यासक्रम करण्यासाठी कौन्सिल ऑफ आíकटेक्चरच्या निकषानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी १० + २ असा नवीन अभ्यासक्रम गणित या विषयासह यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे अथवा ज्या विद्यार्थ्यांनी १० + ३ असा पदविका अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुण मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, ते विद्यार्थी आíकटेक्चरच्या प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिकदृष्टय़ा पात्र समजले जातात.