VIDEO – कचऱ्यामुळे कारने घेतला पेट !

औरंगाबाद – शहागंज परिसरातील मोहन टॉकीजच्या मागच्या बाजूस सोमवारी (ता. 12) इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याची माहिती परिसरातील नागरीकांनी दिली. या घटनेची सिटीचौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आज शहरातील कचऱ्याच्या समस्येला 25 दिवस झाले ,  मनीषा म्हैस्कर यांना येऊन दोन दिवस झाले तरी सुध्दा  महानगरपालिकेने कचरा समस्येबद्दल कोणतीही पावले उचलली  नसल्याचे समोर येत आहे.

पहाटे सराफा भागातील मोहन टाकीजच्या मागे असलेल्या कचेऱ्याला अचानक आग लागली. यामुळे कचऱ्याच्या बाजूलाच  उभी असलेली कारने  पेट घेतला व ती  जाळून खाक झाली. नागरिकांनी  बोलावलेल्या  अग्निशमन पथकाने आग विझवली. शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून,  शहरभर घाणीचे साम्राज्य पसरले  असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 6.25 च्या सुमारास परिसरातील नागरीकांनी अग्नीशमन विभागाला कार जळत असल्याची माहिती दिली. मात्र, अग्नीशमन बंब पोहोचेपर्यंत इंडिका कार (एमएच 20 बीवाय 4096) जळून खाक झाली होती. अग्नीशमन बंबाने आग आटोक्‍यात आणली. त्यात कारचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप कारण स्पष्टं होऊ शकले नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी कार उभी होती. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे कार जळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.