जम्मू काश्मीरमध्ये कारमध्ये स्फोट ; जवळूनच जात होता CRPF चा ताफा !

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे  कारमध्ये स्फोट झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा हल्ला नसल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी किंवा जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं किरकोळ नुकसान झाल्याचे समजत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.