ममता बॅनर्जी यांना ”जिवंत किंवा मृत पकडा आणि एक कोटी मिळवा”

टीम महाराष्ट्र देश : पश्चिम बंगाल मध्ये राजकीय वाद हा दिवसेंदिवस चिघळत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘जिवंत किंवा मृत’ पकडण्यावर एका कोटीच बक्षीस देण्याबाबतचं एक पत्र समोर आलं आहे. या पत्रात ममता बॅनर्जी यांना जिवंत किंवा मृत पकडल्यास एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. कोलकाता येथील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या अपरुपा पोद्दार यांना पोस्टाने हे पत्र आलं आहे . हे पत्र मिळताच पोद्दार यांनी सीरमपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्याबरोबरच , या पत्रात ममता यांना ‘राक्षसी’ आणि ‘जिहादी’ म्हटलं गेलं आहे . एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या पत्रावर राजीव किल्ला नावाच्या व्यक्तीची सही आहे. त्याचबरोबर यावर एक पत्ता आणि तीन फोन क्रमांक देण्यात आले आहेत. या पत्रानुसार, ममता बॅनर्जी यांना पकडणाऱ्यांना एक कोटी रुपये देण्यात येईल, असंही या पत्रात म्हटलं आहे. पोलीस हे पत्र पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?